postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती #पाकातल्या पुऱ्या. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती #पाकातल्या पुऱ्या. Show all posts

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - पाकातल्या पुऱ्या

पाकातल्या पुऱ्या

श्रावण महिना म्हंटलं तर दररोज गोडाची पंगत बसते.
रोज काय गोड बनवायचं हेच कळत नाही.
आज तुम्हाला मी अशीच एक झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहे पकातल्या पुऱ्या
साहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल (मोहनासाठी)
चिमूटभर मिठ
१/२ टिस्पून वेलची पावडर
४-५ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ कप पाणी

कृती:
१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावेआणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावं. १ तास तसेच झाकून ठेवावे.

२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशराच्या काड्या आणि वेलची पावडर पाकात घालून मिक्स करावे.
३) मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. ४-५ मिनीटांनी पुर्‍या पाकात टाकाव्यात.५-१० मिनीटे पुऱ्या पाकात मुरू द्याव्यात. नंतर एक ताटात पाघळवत ठेवाव्यात.

टीप:
१) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तूपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.




 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com