postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती ## सण #संस्कृती. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती ## सण #संस्कृती. Show all posts

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - कोथिंबीर वडी


कोथिंबीरवडी

नमस्कार मंडळीनो रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला आता काहीतरी तिखट बनवूया
आज आपण बनवूया कोथिंबीर वडी

साहित्य :-
कोथिंबीर साफ करून बारीक चिरलेली २ कप
बेसन १कप
१मोठा चमचा तांदुळ पीठ
१चमचा (tsp) आलं पेस्ट
१ चमचा (tsp) लसूण पेस्ट
१/२ चमचा(tsp) लाल मिरची पावडर
१/२चमचा (tsp) हळद
१हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ चमचा(tsp)धणे जिरं पावडर
१ चमचा (tsp)तीळ
१/२ चमचा ओवा (आवडत असल्यास)
१/४चमचा (tsp)गरम मसाला
चवीनुसार मीठ
१चमचा (tps) लिंबाचा रस
१/४कप पाणी (जसे लागेल तसे)
तळण्यासाठी तेल

कृती :
१) एका परातीत कोथिंबीर घेऊन त्यात बेसन,तांदूळपीठ, लालतिखट,हळद,आलं लसूण पेस्ट ,गरम मसाला,लिंबूरस,ओवा,धणे जिरं पावडर, तिळ, मीठ
घालावे आणि हे मिश्रण एकत्र करावे.
२) गरज वाटल्यास थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या
३) हाताला थोडं तेल लावून या मिश्रणाचे गोल गुंडाळी करून घ्या .
४) हा रोल मोदकपात्र किंवा कुकर मध्ये ठेऊन १५ ते २० मिनिटं वाफवून घ्या.
५) वाफवून थोडं गार झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या कराव्यात आणि तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळाव्यात.

टिप:-
१) मी इथे मिश्रणाचा रोल केला पण तुम्हाला पाहिजे असेल तर एका डिशला तेलाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण घालून पसरवावे . वाफवून झाले की त्याचा वड्या पाडाव्यात.
२) बेसन च्या ऐवजी तुम्ही चणाडाळ किंवा मूग डाळपण
घेऊ शकतात.
डाळ ४-५तास भिजत घालावी नंतर मिक्सर मध्ये घालून वाटून घ्यावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.
३) कोथिंबीर साफ केल्यावर त्याचे देठ टाकू नका ते बारीक चिरून दुसऱ्या पदार्थाच्या वाटणात त्याचा वापर करता येऊ शकतो.
४) वड्या मधली थोडी वाफ निघून गेली की वड्या कापाव्यात . गरम असताना कापल्या तर त्या तुटतात.


वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com