postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #शेवग्याच्या पानाची भाजी# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #शेवग्याच्या पानाची भाजी# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Saturday 28 September 2019

खाद्यसंस्कृती - शेवग्याच्या पानाची भाजी



नमस्कार

उद्या जन्माष्टमी आहे. श्री कृष्णच्या नैवेद्यासाठी आज ही रेसिपी सांगणार आहे. शेवग्याच्या पानाची भाजी

साहित्य:-
१जुडी शेवग्याची पाने
१वाटी खवलेला नारळ
४-५ हिरव्या मिरच्या
मीठ
पाव चमचा साखर
तेल

कृती :-
१) शेवग्याची पाने छान स्वच्छ करून धुऊन बारीक चिरून घेणे
२) एका कढईत १चमचा तेल घ्यावे . तेल गरम झाले की त्यात मिरच्या घालाव्यात, लगेच चिरलेली भाजी घालावआणि परतून घ्यावी.एक वाफ आली की त्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालावी आणि परत एकदा परतून घ्यावी . ही भाजी पटकन शिजते . भाजीतलं पाणी आळलं की खोबरं घालावं. एक दोन वेळा भाजी परतायची आणि लगेच गॅस बंद करावा.

टीप:-
१) नैवेद्यासाठी भाजी आहे म्हणून मी ह्यात कांदा लसूण वापरला नाही .
एरवी कार्याची असेल तर त्यात कांदा लसूण वापरावा
२) भाजीत खोबरं घातल्यावर जास्त परतु नये 



 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com