postbox media

Saturday 28 September 2019

खाद्यसंस्कृती - उकडीचे मोदक



https://www.aapalimayra.blogspot.com/






नमस्कार



उकडीचे मोदक

उदया आपल्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे .
बाप्पाला मोदक हे खूप प्रिय आहेत तर,आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक.

साहित्य:-
१खवलेला नारळ
१ वाटी गुळ
२-३ वाट्या तांदुळाची पीठ (बासमती / आंबेमोहोर)
१चमचा वेलची पूड
१/२ चमचा जायफळाची पूड
१ चमचा तूप
तेल
पाणी

कृती:-
१) एका भांड्यात २वाट्या पाणी घालून उकळून घ्यावे त्यात १/२ चमचा तेल किंवा तूप घालावे नंतर तांदळाचे पीठ घालून हलक्या हाताने पीठ एकत्र करून घ्यावे . भांड्यावर झाकण ठेवून ऐक वाफ काढावी
२) दुसऱ्या बाजूला एक कढईत १चमचा तूप घालावे .
तूप वितळले की त्यात खोबरं आणि गूळ घालावे आणि मंद आचेवर सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे .
३) गूळ वितळला की गॅस बंद करावा (मिश्रण कोरडे करूनये आणि खोबरं पण करपवू नये )
त्यात वेलची आणि जायफळ पूड घालावी .
४) उकड काढलेलं पीठ परातीत घेऊन त्यातली थोडी वाफ निघून गेल्यावर थोडं तेल आणि पाणी घालून चांगला मळून घ्या. (पिठाचे गुठळ्या राहता कामा नये).
५) पिठाचा मध्यम आकाराच्या एक गोळा घेऊन त्याची पारी करावी. त्यात चमचाभर सारण घालून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सगळ्या चुण्या एकत्र करून मोदक बंद करावा.
६) मोदक पात्रात थोडे पाणी घ्यावे त्यावर चाळणी ठेवुन त्यावर एक सुती कपडा किंवा केळीचे पान ठेवावे त्यावर मोदक सुटसुटीत ठेवावे ,एकावर एक ठेऊ नये .
७) मोदक पत्रावर झाकण ठेऊन १५ मिनिटे वाफवावे.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 




#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - खमंग काकडी





नमस्कार 


आजचा आपली रेसिपी आहे खमंग काकडी .
ही अगदी नावाप्रमाणेच खमंग आहे आणि पटकन होणारी आहे .

साहित्य:-
२किसलेल्या काकड्या
१वाटी शेंगदाण्याचा कूट
१वाटी दही
४-५ पाने कडीपत्ता
२मिरच्या बारीक चिरलेल्या
कोथिंबीर
१/२ चमचा साखर
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
चिमूटभर हिंग
मीठ
तेल

कृती:-
१) एका कढईत २चमचे तेल घालून तेल चांगले तापल्यावर त्यात राई, जिरं,कडीपत्ता, हिंग,साखर,मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून फोडणी करून घ्यावी,लगेच गॅस बंद करावा फोडणी थोडी थंड झाली की त्यात दही घालावे .
फोडणी आणि दही एकत्र करावे .

२) किसलेली काकडी ,शेंगदाण्याचाकूट आणि कोथिंबीर घालून सगळं हलक्या हाताने एकजीव करावे
आपली खमंग काकडी तयार 






मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 


#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - पंचामृत





नमस्कार




घरात कोणतंही देवाधर्माचं कार्य असलं की बनवले जाते चविष्ट असे पंचामृत .
पंचामृताचं रोज जरी सेवन केले तरी ते आपल्या शरीराला लाभदायक आहे .विशेष करून गरोदर स्त्रीयांनसाठी.

साहित्य:-
२वाटी दुध
३चमचे दही
१चमचा तूप
३चमचे साखर
२चमचे मध

कृती:-
एका भांड्यात दुध,दही, साखर,तुप आणि मध घ्यावे.
हे सगळे मिश्रण एकजीव करावे
नैवेद्य दाखवण्या आधी त्यात तुळशी चे पान घालावे.
आपलं पंचामृत तयार 




मायरा वैभव जगताप  

https://www.aapalimayra.blogspot.com/ 


#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - फोडणीची कोशिंबीर









नमस्कार 




आज मी तुम्हाला सांगणार आहे फोडणीची कोशिंबीर

साहित्य:-
१ गाजर किसलेलं
१ काकडी किसलेली
१ बारीक चिरलेली मिरची
४-५ कडीपत्ता ची पाने
कोथिंबीर
१/२ राई
१/२ चमचा जिरं
२-३चिमटी साखर
१/२ वाटी शेंगदाण्याचा कूट
मीठ
हिंग
दही
तेल

कृती:-
१) किसलेलं गाजर, काकडी,मिरची,दही, शेंगदाण्याचा कूट,मीठ, कोथिंबीर, साखर सगळे एकजीव करून घावे

२) एका बाजूला३-४ चमचे तेल गरम करत ठेवायचे. तेल गरम झाले की त्यात राई, जिरं,कडीपत्ता, हिंग आणि थोडी कोथिंबीर घालून फोडणी करावी आणि मिश्रणात घालावे आणि एकजीव करावे

फोडणीची कोथिंबीर तयार







मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/



#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes


https://www.postboxmedia.wordpress.com


खाद्यसंस्कृती - वालाचे बिरडं




नमस्कार




आज श्रावणातील शेवटचा शनिवार आज ची आपली खास रेसिपी आहे वालाचे बिरडं . सणासुवरी किंवा कोणत्याही शुभकार्यात जेवण बिरड्याशिवाय अपूर्णच .

पूर्वतयारी:
बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मूग या कडधान्यापासून बिरड केली जातात. पण सगळ्यात लोकप्रिय आहे ते "वालाचे बिरडे". कडवे वाल हे बिरड्यासाठी उत्तम समझले जातात.
दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा जर बिरडे शनिवारी करायचे असेल तर गुरुवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
साधारण वाल रात्रभर कोमट पाण्यात किंवा १०तास तरी भिजत ठेवावे.
सकाळी पाणी काढून टाकून धुवून घ्यावे. वाल एका
सुती कापडात बांधून ठेवावे. हे गाठोडं एका भांड्यात किंवा डब्यात ठेऊन उबदार जागी ठेवावे .वालाला मोड येण्यासाठी साधारण १८ ते २० तास लागतात. (उष्ण हवामान असेल तर लवकर मोड येतात आणि थंड हवामान असेल तर मोड यायला वेळ लागतो. )
मोड आलेले वाल सोलण्याच्या वेळी त्यात कोमट पाणी घालावे म्हणजे ते पटापट सोलले जातात .बोटाच्या चिमटीत दाबून साले काढावीत.

साहित्य:
२ वाटी मोड आणून सोललेले वाल
१/२वाटी खवलेला नारळ
१चमचा जिरं
१/२चमचा राई
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
२-३ चमचे मालवणी मसाला
२-३ कोकम
५-६ कडीपत्ता ची पाने
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ इंच आल्याचा तुकडा
गुळ
तेल
मीठ

कृती:-
१) मोड आलेले वाल प्रथम स्वच्छ धुवून पाण्यामध्येये ठेवावे
( पाण्यात वाल ठेवले तर त्याचा रंग बदलत नाही पाण्याचा बाहेर ठेवले तर ते काळे पडतात)

२) एका कढईत ४-५चमचे तेल घ्यावे . तेल गरम झाले की त्यात राई,जिरं,हिंग, कडीपत्ता ची फोडणी करून घ्यावी.

३) मिक्सर मध्ये खोबरे,थोडसं जिरं, आलं, थोडी कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून वाटावे

४) फोडणी च्या कढईत हळद ,मालवणी मसाला घालावा आणि त्यावर वाटण घालावे थोडं परतावे त्यात सोललेले वाल घालावे पाणी घालून कढईवर झाकण ठेवून १-२ वाफ काढावी
५) वाल साधारण शिजले की त्यात कोकम , मीठ,गूळ घालावे.आणि ५-७ मिनिटं शिजून द्यावे .

६) ५-७ मिनिटांनी गॅस बंद केल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी

टीप:-

१) नैवेद्यासाठी वालाच बिरड असल्याने ह्यात कांदा लसूण वापरलेला नाही
२) कोकम वाल शिजल्यावर घालावे नाहीतर कोकमाचा आंबट पणामुळे वाल शिजणारा नाहीत
३) बटाटा आवडत असेल तर त्यात घातला तरी चालेल.



 वैभव जगताप 





#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - भाताची खीर



नमस्कार


श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या असे बोलतात . पूर्वी घरोघरी पिठोरीची पूजा केली जात असे . वंशवृद्धी साठी ही पूजा केली जाते .
पिठोरी अमावास्याचं दुसरं नाव मातृदिन .
आई आमची सर्वप्रथम गुरू
तिच्याच मूळे आमचे अस्तित्व सुरु.....
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीसाठीचा खास नैवेद्य
आज आपण बघूया भाताची खीर.

साहित्य:-
१/२ लिटर दूध
४-५ चमचे तांदूळ ( बासमती तांदूळ/तुकडा/कणी )
१/२ वाटी साखर
वेलची पूड
३-४ काड्या केशर
बेदाणे
काजू तुकडा
बदाम बारीक काप केलेले

कृती:-
१) तांदूळ धुवून १५ मिनिटे निथळत ठेवावे
२) एका पातेल्यात दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे आणि थोडया थोड्या वेळाने ढवळत राहावे .
मंद आचेवर तांदूळ शिजे पर्यंत शिजवावे .
३) तांदूळ शिजला की त्यात साखर,काजू,बदामकाप,बेदाणे घालावेत आणि २-३ उकळी येऊ द्या.
४) त्यात वेलचीची पूड आणि केशर घालावं.
भाताची खीर तयार

टीप:-
१) बासमती तांदळा ने खीर चविष्ट बनते.
२) खीर रवाळ हवे असेल तर तांदूळ थोडे तुपावर परतून मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यावे.





मायरा वैभव जगताप

#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - मधुर पोहे



मधुर पोहे

नमस्कार 



आज जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोस्तोव. आज घरोघरी श्री कृष्णाची मोठ्या भक्ती भावाने पुजा केली जाते
श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्या मैत्री आणि सुदामाचे पोहे ही कहाणी तर आपल्याला माहीत आहे. श्रीकृष्णाच्या आवडीचे दही पोहे .
आज पोह्याची पण थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मधुर पोहे

साहित्य :-
१ वाटी पोहे
१वाटी खवलेला नारळ
१/२ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/२ वाटी गुळ
वेलची पूड
जायफळ पूड
काजू

कृती:-
१) एका कढईत थोडं खोबरं परतून घ्या त्यात गुळ घाला
गुळवितळला की डेसिकेटेड कोकोनट आणि काजू घालून २-३वेळा परता.
२) त्यात पोहे घालून , वेलची आणि जायफळ पूड घालावी सगळं मिश्रण एकजीव करावे
मधुरपोहे तयार
नमस्कार मंडळींनो
आज जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोस्तोव. आज घरोघरी श्री कृष्णाची मोठ्या भक्ती भावाने पुजा केली जाते
श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्या मैत्री आणि सुदामाचे पोहे ही कहाणी तर आपल्याला माहीत आहे. श्रीकृष्णाच्या आवडीचे दही पोहे .
आज पोह्याची पण थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मधुर पोहे

साहित्य :-
१ वाटी पोहे
१वाटी खवलेला नारळ
१/२ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/२ वाटी गुळ
वेलची पूड
जायफळ पूड
काजू

कृती:-
१) एका कढईत थोडं खोबरं परतून घ्या त्यात गुळ घाला
गुळवितळला की डेसिकेटेड कोकोनट आणि काजू घालून २-३वेळा परता.
२) त्यात पोहे घालून , वेलची आणि जायफळ पूड घालावी सगळं मिश्रण एकजीव करावे
मधुरपोहे तया.


वैभव जगताप  
वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - शेवग्याच्या पानाची भाजी



नमस्कार

उद्या जन्माष्टमी आहे. श्री कृष्णच्या नैवेद्यासाठी आज ही रेसिपी सांगणार आहे. शेवग्याच्या पानाची भाजी

साहित्य:-
१जुडी शेवग्याची पाने
१वाटी खवलेला नारळ
४-५ हिरव्या मिरच्या
मीठ
पाव चमचा साखर
तेल

कृती :-
१) शेवग्याची पाने छान स्वच्छ करून धुऊन बारीक चिरून घेणे
२) एका कढईत १चमचा तेल घ्यावे . तेल गरम झाले की त्यात मिरच्या घालाव्यात, लगेच चिरलेली भाजी घालावआणि परतून घ्यावी.एक वाफ आली की त्यात चवीपुरते मीठ आणि साखर घालावी आणि परत एकदा परतून घ्यावी . ही भाजी पटकन शिजते . भाजीतलं पाणी आळलं की खोबरं घालावं. एक दोन वेळा भाजी परतायची आणि लगेच गॅस बंद करावा.

टीप:-
१) नैवेद्यासाठी भाजी आहे म्हणून मी ह्यात कांदा लसूण वापरला नाही .
एरवी कार्याची असेल तर त्यात कांदा लसूण वापरावा
२) भाजीत खोबरं घातल्यावर जास्त परतु नये 



 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

देव देश धर्म - अपरिचित दत्तस्थाने









अपरिचित दत्तस्थाने

संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते




*श्री क्षेत्र कडगंची*





औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात, पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत, जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय..
संपूर्ण देशामध्ये शेकडो श्रीदत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावांत एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्रीदत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थानमाहात्म्यामुळे ही दत्तक्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्रीक्षेत्र माहूर, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इ. क्षेत्रे सर्वाना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्त क्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदा. कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पीठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकरमहाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनसूया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इ. या ठिकाणी निवास आणि भोजनाची नि:शुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र पारायण, दत्तयाग इ. विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्त क्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे –

श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे चार पट्टशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्रीशैल्यम येथे पाताळगंगेजवळही हे चौघे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी चार शेवंतीची फुले पाठवली ती या चार शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे चौघेजण म्हणजे श्रीसायंदेव, श्रीनंदिनामा, श्रीनरहरी आणि श्रीसिद्धमुनी हे होते. यातील श्रीसायंदेव हे कडगंची या गावचे. कडगंची हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायंदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील पाचव्या पिढीतील सरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंची येथे लिहून झाला. श्री सायंदेवाची पुढील वंशावळी अशी आहे, श्रीसायंदेव – श्रीनागनाथ – श्रीदेवराव – श्रीगंगाधर – श्रीसरस्वती. श्रीगुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथाचे लिखाण कडगंची या ठिकाणी झाले. त्यामुळे याचे स्थानमाहात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्रीदत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्रीदत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली, ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र कडगंची हे आहे. म्हणूनच याला श्रीदत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल.श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी श्रीसायंदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनियमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे.
गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्रीगुरूंच्या चरित्रातील कथानामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यांसमोर ठेवून श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्रीदत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी नि:शुल्क भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्रीगुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्याचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.
संपर्क : शिवशरणाप्पा श्रीसायंदेव दत्तक्षेत्र संस्थान श्रीक्षेत्र कडगंची
ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक. 










*श्रीक्षेत्र बाळेकुंद्री*



बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर १५ कि. मी. अंतरावर बाळेकुंद्री या नावाचे एक गाव आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील ( इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वाना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.
श्रीपंत म्हणतात, ‘अनुभव प्रथम, नंतर वेदांत शास्त्रे वगैरेंचे अवलोकन’. अवधूतमार्ग सर्व समावेशक कसा याबाबत श्रीपंत म्हणतात, अवधूतमार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करून घेणे, तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पाडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरू असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी-अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच. अवधूतमार्ग म्हणजे अद्वैतानुभव. अवधूतांना मुक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी. म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना ‘गुरुपुत्र’ म्हणत. असा ‘जिव्हाळा-प्रेम’ हा या पंथाचा आत्मा आहे. हा पंथ शुद्ध प्रेमावर व अंत:करण शुद्धीवर भर देणारा असल्याने ‘ओम नम: शिवाय’चा जप, एकतारीवर भजन एवढीच साधना अवधूत पंथामध्ये आहे. किंबहुना श्रीपंतांनी अध्यात्मातील ‘साधना’ या शब्दाचे भयच काढून टाकले.
‘जसा मन आहेस तसा मीळ’ (जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा असा अर्थ ) हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादुकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. ‘नीतीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल राहा. भिक्षा मागू नये. लोकांना त्रास देऊ नये. संन्यासी बनू नका. संसारात राहूनही परमार्थ करा. असा कर्म – मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे.
श्रीपंतमहाराजांनी निर्माण केलेले विपुल वाङ्मय आज उपलब्ध आहे.
१. श्रीदत्तप्रेमलहरी २. श्रींची पत्रे ३. भक्तालाप ४. स्फुटलेख ५. बोधवाणी ६. बाळबोधामृतसार ७. भक्तोद्गार अथवा प्रेमभेट ८. आत्मज्योती-अनुभववल्ली-ब्रह्मोपदेश ९. प्रेमतरंग याव्यतिरिक्त ‘परमानुभवप्रकाश‘, ‘श्रीपंत महाराजांचे चरित्र’, ‘श्रीपंत गुरुचरित्र पोथी’, श्रीपंत बंधू गोविंददादा यांनी श्रीपंथांच्या सन्निध आलेले उत्कट अनुभव लिहिलेले ‘गोविंदाची कहाणी’ इ. बोधपर वाङ्मय उपलब्ध आहे. श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे.
संपर्क : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव.







*श्रीक्षेत्र माणगाव*



श्रीदत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिव्राजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींचे (थोरले महाराज) कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पीठापूर (आंध्र प्रदेश) आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्रीनृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. त्यांची संकल्पशक्ती, त्याग, ज्ञान, ईश्वरनिष्ठा, श्रीदत्ताज्ञापालननिष्ठा हे सर्वच अलौकिक आहे. त्यांनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी, मोजक्या वस्त्र-वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास केला. त्यांच्या भ्रमणात देवदेवता, पवित्र तीर्थे यांचे सान्निध्य व परमानंदाचा अनुभव असे. सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन, प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे.
श्रीस्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा थोरल्या महाराजांनीच निर्माण केली आहे. भारतीय तत्त्वज्ञान, चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील. अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. ‘हे मी लिहिले’ असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात, तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्र, सप्तशतीगुरुचरित्र, त्रिशती गुरुकाव्य, श्रीदत्तपुराण, श्रीदत्त माहात्म्य, श्रीदत्तचंपू, शिक्षात्रयम (कुमारशिक्षा, युवाशिक्षा, वृद्धाशिक्षा) तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षिक जोतिषाची स्वत:ची अशी पद्धत तयार केली. तसेच स्त्री शिक्षा, लघुमननुसार (मराठी), माघमाहात्म्य (मराठी) हे ग्रंथ मराठीत तयार केले. याचबरोबर श्रीघोरात्कष्टोधरण स्तोत्र, पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्य उपासनाक्रम, श्रीदत्तात्रेय षोड्शावतार चरित्र, श्रीसत्यदत्तपूजा व कथा लिहिल्या आहेत.
नृसिंहवाडीला गेले असता तेथे गोविंदस्वामी या ज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्रीदत्त संप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेवशास्त्रींना लाभला.
‘उत्तरेस जा’ या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात त्यांनी २३ चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती व्रतवैकल्ये, पदे आदींची श्रीदत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यासाश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत अध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्त्वस्पर्शी सिद्धकवी, उत्कृष्ट वक्ता, सिद्ध हठयोगी व उत्कट दत्तभक्त होते.
अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली. श्रीस्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये कुडाळ आणि सावंतवाडीजवळ आहे. येथे भव्य दत्तमंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्त निवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे.
संपर्क : श्रीदत्त मंदिर, माणगांव,
पो. माणगांव, व्हाया सावंतवाडी,
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र




*श्रीक्षेत्र कारंजा*





श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे. याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशीम जिल्ह्य़ामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून २५ कि.मी. वर आहे. या ठिकाणी १९३४ साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्रीगुरुमंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्रीदत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. वऱ्हाडात कारंजा नगरातील (हल्ली लाडाचे कारंजे) अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्याच्या पोटी पुत्र जन्माला आला. त्याचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हेच ‘श्रीनृसिंह सरस्वतीस्वामी’ होत. जन्माला आल्याबरोबर या बालकाच्या मुखातून ‘ॐ’काराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्रीदत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला, असे मानले जाते.
कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमन्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मीळता होती. ऋषिमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंजमुनी यानी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुकादेवी करंजमुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्राचे माहात्म्य वर्णन केले. वसिष्ठ-शक्ति-संवादातून यमुना-महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदूमती कुंडात आहेत. (बेंबळपार नाव्याने सध्या हे कुंड प्रसिद्ध आहे.) गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती (बेंबळानदी) या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना-महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्यांने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी श्रद्धा आहे.
करंजमुनींच्या कृपा प्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला ‘शेषांकित क्षेत्र’ असेही नाव पडले आहे, असे सांगितले जाते.
कारंजा येथील गुरूमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर आठ वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात, तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेविलेल्या चौरंगावर उघडय़ा डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करे तोपर्यंत त्या उघडय़ा ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे, ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. संपर्क : श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान, कारंजा, जि. वाशीम




*श्रीक्षेत्र कुरवपूर*



श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनीदेखील वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली आहे.
कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे, तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ – जितामित्रबेट, नारगड्डि (नारबेट) आणि कुरुगड्डी या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरुगड्डीच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपादस्वामी राहात असत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता, त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही. वडिलांचे निधन झाल्यावर त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला निघाली. तेव्हा असे सांगितले जाते की श्रीपादांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला ज्ञानसंपन्न केले.
दुसरी कथा एका धोब्याची सांगितली जाते. तो रोज न चुकता श्रीपादांना नदीवर येताना साष्टांग नमस्कार घालीत असे. असे काही वर्षे झाल्यावर एकदा स्वामी त्याला बोलले- ‘तू दररोज न चुकता संधी साधून नमस्कार करतोस; यासाठी किती तरी कष्ट घेतोस. आता सुखाने राज्य करीत राहा.’ असे म्हणून स्वामी निघून गेले. काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतू आला तेव्हा त्या भागाचा म्लेंछ राजा नौकाविहारासाठी मोठय़ा थाटामाटाने आला. त्याचा डामडौल देहभान विसरून पाहणाऱ्या रजकाला स्वामी महाराजांनी विचारले, ‘हे रजका, मनात काय विचार चालले आहेत?’ धोबी म्हणाला, ‘कोणाच्या गुरूच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे? असले सुख मला का मिळत नाही म्हणून मन उद्दिग्न झाले आहे.’ तेव्हा श्रीपादस्वामीं म्हणाले, ‘जन्मल्यापासून तू गरीब. असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस. यासाठी तू राज्यसुख अनुभवायास पाहिजे. ते तू आताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी?’ रजक म्हणाला ‘स्वामी आता मला राज्य नको. मी म्हातारा झालो. मला पुढच्या जन्मी राजा करा.’ पुढील जन्मी तो बीदरचा राजा झाला आणि त्याची श्रीनृसिंहस्वामीरूपातील स्वामींबरोबर भेट झाली. त्याला मागील जन्म आठवला आणि त्याने महाराजांची सेवा केली, असे सांगितले जाते.
कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपादस्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सूर्यनमस्कार घालीत असत. कर्नाटकामध्ये रायचूर जवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैद्राबाद रस्त्यावर मक्तल गावाजवळून कुरवपूर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून छोटी नाव म्हणजे बुट्टीने कुरवपूर याठिकाणी जावे लागते. कुरवपूरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहेत. मंदिराच्या बाजूला काही अंतरावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. येथून जवळच मंथनगुडी हे एक दत्त क्षेत्र आहे.
कुरवपूर या ठिकाणी नित्य पूजा-अर्चा, अभिषेक आणि अनुष्ठाने इ विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्टय़ आहे. हे स्थान अतिशय प्राचीन आहे.




*श्रीक्षेत्र नारेश्वर*

 


बडोद्यापासून ६० कि.मी. अंतरावर श्रीक्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्रीरंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्रीदत्त संप्रदायाचा फार मोठय़ा प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वराचे माहात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षांपूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारोशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की, मी जमिनीत गाडला गेलो आहे. मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारो शंकरांनी ती पिंड बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे भयाण अरण्य होते. हिंस्र श्वापदांची तेथे वस्ती होती. दहा गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास धजत नव्हता. एकांतस्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज-भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणांमुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे.
नर्मदाकाठ, गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे हे तीर्थक्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे ते तीर्थ जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुलिंब नम्र होऊन त्याच्या फांद्यांची वाढ वर (उध्र्व) न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत, असे मानले जाते.
इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे त्या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत, असे संगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते. त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोधरा या ठिकाणी राहात होते. महाराजांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता.
थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, ‘‘बाळ तू कुणाचा?’’ बाळ म्हणाला, ‘‘तुमचाच.’’ स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरू-शिष्यांची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्टय़ा पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. नारेश्वर जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ गरुडेश्वर, त्यांनी चातुर्मास केलेले तिलकवाडा, श्रीक्षेत्र अनुसया आणि प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले भालोद ही महत्त्वाची दत्तस्थाने आहेत.
रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या ५२ श्लोकांवर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्त पूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधीवृक्ष-निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.
संपर्क : श्री अवधूत निवास ट्रस्ट, मु. नारेश्वर, पो. सयार व्हाया अंकलेश्वर जि. बडोदा




वैभव जगताप
वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - रव्याच्या पाटोळ्या




नमस्कार, 


आजची आपली रेसिपी आहे रव्याच्या पाटोळ्या.

साहित्य :-
१ वाटी खवलेला नारळ
१/२ वाटी गूळ
१ मध्यम काकडीचा किस
१पेला रवा
खसखस
ड्रायफ्रुट ची पूड
१/२ छोटा चमचा वेलचीपूड
जायफळ
तेल
तूप

कृती:-
१) एका पातेल्यात काकडीचा किस, चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी घालून ५मिनिटे शिजवावे . त्यात रवा घालून त्याची उकड काढावी
२) एका परातीत १/२ चमचा तेल घेऊन त्यात ही उकड घालून चांगले मळून घ्यावी.
३) एका कढईत तूप,खोबरे आणि गुळ घालून चव बनवावी .
त्यात वेलचीपूड, जायफळ पूड, खसखस, ड्रायफ्रुट पूड घालावी. मिश्रण एकजीव करून घेणं.
४) एक केळीचे पान मध्यम आकारात कापून घ्यावे(साधारण ४ तुकडे करावेत)
५) केळीच्या पानावर पाणी आणि तेल लावून पीठ थापून घावे आणि त्यावर खोबऱ्याचं सारण घालून कारंजी प्रमाणे पानासहित दुमडावे
६) एका स्टिमर किंवा कुकर मध्ये पाणी घालून त्याच्यावर चाळण ठेऊन उकडून घ्यावे.





मायरा वैभव जगताप 
www.aapalimayra.blogspot.com 



खाद्यसंस्कृती - चंपाकळी



नमस्कार, 




आजची आपली एक गोडाची रेसिपी आहे पण नेहमी पेक्षा थोडी वेगळी आहे . लहान मुलं देखील आवडीने हा पदार्थ खातील.
आजची आपली रेसिपी आहे चंपाकळी (चंपाकली)

साहित्य:-

२वाटी मैदा
१वाटी साखर
१/२चमचा वेलची पावडर
पाणी
तेल

कृती :-
१) एक परातीत मैदा घावा.
त्यात २चमचे तेलाचे मोहन घालावे आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे. १० ते १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे .

२) पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुरी सारखे लाटून घ्यावे

३) लाटलेल्या पुरीच्या मधोमध सुरीने उभ्या चिरा द्याव्यात
नंतर ते गुंडाळून घेऊन कडेने बंद करावे .

४) गरम तेलात मंद आचेवर तळावे

५) ऐका पातेल्यात साखर घ्या .
साखर बुडेल त्याचा थोडं जास्त पाणी घ्या आणि त्याचा पाक बनवा
६) पाक थोडा गार झाला की आपल्या चंपाकळी पाकातून घोळवून घावे
आपल्या चंपाकली तयार.






वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com


खाद्यसंस्कृती - नमकीन



नमस्कार,

रोज रोज संध्याकाळी चहा सोबत काय खायला करायच हा प्रश्नच पडतो. म्हणून आज तुम्हाला एक चटपटीत रेसिपी सांगणार आहे .
आजची आपली रेसिपी आहे नमकीन.

साहित्य:-
१कप मैदा
१/२ चमचा ओवा
चवीपुरते मीठ
चाट मसाला
पिठी साखर
पाणी
तेल

कृती:-
१) एका परातीत मैदा घ्यावा त्यात चवी नुसार मीठ घालावे ( नेहमी पेक्षा थोडा कमी )

२) २मोठे चमचे तेल कडकडीत गरम करावे त्यात ओवा टाकावा आणि ते तेलाचे मोहन मैदामध्ये घालावे आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे.१०-१५ मिनिटे मळलेलं पीठ झाकून ठेवावे

३) एक छोटा गोळा घेऊन त्याची चपाती लाटावी आणि मग लांब लांब पट्टया कापाव्यात

४) गरम तेलात तळून घ्यावे
थोडे गार झाले की त्यावर चाट मसाला आणि थोडी पिठी साखर घालावी .

टीप:
१) अजून तिखट पाहिजे असेल तर पिठात मिरची पावडर घातली तरी चालेल.



माही वैभव जगताप  

www.aapalimahi.blogspot.com 

खाद्यसंस्कृती - कॉर्न पकोडा



कॉर्न पकोडा

हल्ली बाजारात मका(स्वीट कॉर्न) सहज बघायला मिळतो.आज मक्यापासून एक वेगळी डिश बघणार आहोत .

साहित्य:
२ कप स्वीट कॉर्न
१कप बेसन
२ चमचे तांदूळ पीठ
१/२चमचाओवा
१/२ चमचा धणे जिरं पूड
१/२ चमचा हळद
१/२ चमचा लालतिखट
१/२ चमचा चाट मसाला
१/२ कप कोथिंबीर
चिमूटभर सोडा
१मध्यम आकाराचा कांदा(बारीक चरलेला)
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मक्याचे दाणे मिक्सर मध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये)

२) भरडलेल्या दाण्यात बेसन,कांदा,तांदळाचेपीठ,धणेजिरेपुड,ओवा ,चाट मसाला, हळद, लाल तिखट , सोडा,कोथिंबीर घालून मिक्स करावे. पीठ दाटसर भिजवावे.
३) एका कढईत तेल गरम करून . चमच्याने लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
सॉस सोबत सर्व्ह करावी.

टीपा:
१) लालतिखट ऐवजीआवडत असेल तर हिरवी मिरची घालू शकतात.



वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - नारळाच्या वड्या



नमस्कार,

सन आयलय गो नारली पुनवे चा
मनी आनंद मायेना आगरी-कोल्यानच्या दुनियेला...
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबांधनाच्या शुभेच्छा💐💐
नारळी भात तर आपण अगोदर बघितलाच आहे आज आपण नारळी पौर्णिमा साठी खास पदार्थ बघणार आहोत, नारळाच्या वड्या

साहित्य:
१ खवलेला नारळ ( पांढरे खोबरे घेणे)
२ वाट्या साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) कढईमध्ये २ ते ३ चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.

२) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा. ४-५ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल त्यात अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागेल.

३) एका ताटाला तूप लावून घ्यावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे आणि पसरून घ्यावे थोडं जाडसर पसरावे .

७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात.

टिप:
१) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.




 वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - पनीर डिलाईट



पनीर डिलाईट

नमस्कार,


मैत्री ठरवून कधीच होत नाही हा मैत्रीचा फायदा आहे,
आणि मैत्रीला कोणताही नियम नाही हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे .
माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणीना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !!💐
आज आपण झटपट बनणारी गोडाची रेसिपी बघणार आहोत की त्यात आपला गॅस चा अजिबात वापर करायचा नाही.आज आपण बघणार आहोत पनीर डीलाईट

साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
१ कप डेसिकेटेड कोकोनट
१ कप पिठी साखर
१/२ चमचा वेलची पावडर

कृती :
१) एका भांड्यात पनीर किसून घ्यावे आणि ते हलक्या हाताने मळावे

२) त्यात डेसिकेटेड कोकोनट ,पिठी साखर आणि वेलची घालावी आणि सगळे मिश्रण एकजीव करावे

३) त्याचे लाडू वळून परत डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावे म्हणजे लाडू एकमेकांना चिकटणार नाही .
फ्रीज मध्येये १५ मिनिटे सेट करायला ठेवावे .
झटपट लाडू तयार

टीप:
१) २-३ दिवस हे लाडू फ्रिज मध्ये राहू शकतात.
२) हे लाडू उपवासाला पण खाऊ शकतात.


https://www.postboxmedia.wordpress.com

वैभव जगताप

खाद्यसंस्कृती - पाकातल्या पुऱ्या

पाकातल्या पुऱ्या

श्रावण महिना म्हंटलं तर दररोज गोडाची पंगत बसते.
रोज काय गोड बनवायचं हेच कळत नाही.
आज तुम्हाला मी अशीच एक झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहे पकातल्या पुऱ्या
साहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल (मोहनासाठी)
चिमूटभर मिठ
१/२ टिस्पून वेलची पावडर
४-५ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ कप पाणी

कृती:
१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावेआणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावं. १ तास तसेच झाकून ठेवावे.

२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशराच्या काड्या आणि वेलची पावडर पाकात घालून मिक्स करावे.
३) मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. ४-५ मिनीटांनी पुर्‍या पाकात टाकाव्यात.५-१० मिनीटे पुऱ्या पाकात मुरू द्याव्यात. नंतर एक ताटात पाघळवत ठेवाव्यात.

टीप:
१) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तूपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.




 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - बिटाची पुरी

बिटाची पुरी

नमस्कार मंडळींनो बीट म्हटलं की सगळ्यांची नाक मुरडतात
विशेषतः लहान मुलं आज अशीच एक बीटाची हेल्दी रेसिपी सांगणार आहे की ती झटपट बनते पणआणि सगळ्यांना आवडेल. विशेष म्हणजे मुलं पण आवडीने खातील.

साहित्य :
१ कप बीट
२ कप गव्हाचे पीठ
१/२चमचा जिरं
१/४चमचा ओवा
१चमचा आलं लसूण पेस्ट
मीठ
पाणी
तेल तळण्यासाठी

कृती:-
१) बीट किसून घेऊन मिक्सर मध्ये घालावे त्यात जिरं आणि ओवा घालावा आणि वाटून घ्यावे

२) एका परातीत गव्हाचे पीठ घ्यावे त्यात वाटलेले मिश्रण ,आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून पीठ चांगले मळुन घ्यावे.पीठ थोडंस घट्ट असावे .

३) १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा.

४) मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून तेलात तळून घ्याव्या.(लहान मुलांना द्याच्या असतील तर छोट्या पुऱ्या कराव्यात)

५) टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावी .




वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - कोथिंबीर वडी


कोथिंबीरवडी

नमस्कार मंडळीनो रोज गोड गोड खाऊन कंटाळा आला आता काहीतरी तिखट बनवूया
आज आपण बनवूया कोथिंबीर वडी

साहित्य :-
कोथिंबीर साफ करून बारीक चिरलेली २ कप
बेसन १कप
१मोठा चमचा तांदुळ पीठ
१चमचा (tsp) आलं पेस्ट
१ चमचा (tsp) लसूण पेस्ट
१/२ चमचा(tsp) लाल मिरची पावडर
१/२चमचा (tsp) हळद
१हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ चमचा(tsp)धणे जिरं पावडर
१ चमचा (tsp)तीळ
१/२ चमचा ओवा (आवडत असल्यास)
१/४चमचा (tsp)गरम मसाला
चवीनुसार मीठ
१चमचा (tps) लिंबाचा रस
१/४कप पाणी (जसे लागेल तसे)
तळण्यासाठी तेल

कृती :
१) एका परातीत कोथिंबीर घेऊन त्यात बेसन,तांदूळपीठ, लालतिखट,हळद,आलं लसूण पेस्ट ,गरम मसाला,लिंबूरस,ओवा,धणे जिरं पावडर, तिळ, मीठ
घालावे आणि हे मिश्रण एकत्र करावे.
२) गरज वाटल्यास थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या
३) हाताला थोडं तेल लावून या मिश्रणाचे गोल गुंडाळी करून घ्या .
४) हा रोल मोदकपात्र किंवा कुकर मध्ये ठेऊन १५ ते २० मिनिटं वाफवून घ्या.
५) वाफवून थोडं गार झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या कराव्यात आणि तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळाव्यात.

टिप:-
१) मी इथे मिश्रणाचा रोल केला पण तुम्हाला पाहिजे असेल तर एका डिशला तेलाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण घालून पसरवावे . वाफवून झाले की त्याचा वड्या पाडाव्यात.
२) बेसन च्या ऐवजी तुम्ही चणाडाळ किंवा मूग डाळपण
घेऊ शकतात.
डाळ ४-५तास भिजत घालावी नंतर मिक्सर मध्ये घालून वाटून घ्यावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.
३) कोथिंबीर साफ केल्यावर त्याचे देठ टाकू नका ते बारीक चिरून दुसऱ्या पदार्थाच्या वाटणात त्याचा वापर करता येऊ शकतो.
४) वड्या मधली थोडी वाफ निघून गेली की वड्या कापाव्यात . गरम असताना कापल्या तर त्या तुटतात.


वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - नारळाचे लाडू


नमस्कार,
नारळी पौर्णिमा आता जवळ आली असल्याने आजची आपली दुसरी रेसिपी बघूया नारळाचे लाडू.

साहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ (नारळाचा पांढरा भाग (खोबरे)घ्यावे)
दिड कप साखर
३ ते ४ टेस्पून तूप
१ कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पूड
थोडीशी जायफळ पूड
बेदाणे
केशर

कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ते ५ मिनीटे कोरडाच भाजावा. सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही.
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे आणि १०-१५मिनिटे तसेच राहू देणे.
३) ऐका कढई मध्ये तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. १० ते १२ मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि ५ते ६ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच रवा-नारळाचे मिश्रण पाकात ओतावे आणि मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड ,थोडी जायफळ पूड आणि चिमुट भर केशर घालावा .मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि त्याचे लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.

टीप:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत.
७-८ दिवस टिकतात.



 वैभव जगताप 


https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - लापशी रवा

नमस्कार 
आज आपण बघुया लापशी

साहित्य:
१ कप दलिया किंवा लापशी रवा
३/४ कप किसलेला गूळ
२ चमचे तूप
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ कप पाणी
१/४ कप गरम दूध
१/४चमचा वेलची पूड
चिमूटभर मिठ
३ चमचे काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप
१ चमचा बेदाणे

कृती:
१) २ चमचे तूप कढईत गरम करावे. त्यात लापशी रवा खमंग भाजून घ्यावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे.
२) रवा भाजताना दुसर्‍या गॅसवर ३ कप पाणी गरम करावे. त्यात चिमूटभर मिठ घालावे.
३) रवा चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी आणि दूध घालावे. निट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर २ वाफा काढाव्यात. ताजा नारळ घालून मिक्स करावे.
४) रवा शिजल्यावर किसलेला गूळ घालून ढवळावे. गूळ वितळला कि बेदाणे घालावे.
५) झाकण लावून मध्यम आचेवर वाफ काढावी. वेलचीपूड घालून मिक्स करावे.
गरम गरम सर्व्ह करावा.

  
https://www.postboxmedia.wordpress.com