postbox media

Saturday 28 September 2019

खाद्यसंस्कृती - भाताची खीर



नमस्कार


श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या असे बोलतात . पूर्वी घरोघरी पिठोरीची पूजा केली जात असे . वंशवृद्धी साठी ही पूजा केली जाते .
पिठोरी अमावास्याचं दुसरं नाव मातृदिन .
आई आमची सर्वप्रथम गुरू
तिच्याच मूळे आमचे अस्तित्व सुरु.....
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीसाठीचा खास नैवेद्य
आज आपण बघूया भाताची खीर.

साहित्य:-
१/२ लिटर दूध
४-५ चमचे तांदूळ ( बासमती तांदूळ/तुकडा/कणी )
१/२ वाटी साखर
वेलची पूड
३-४ काड्या केशर
बेदाणे
काजू तुकडा
बदाम बारीक काप केलेले

कृती:-
१) तांदूळ धुवून १५ मिनिटे निथळत ठेवावे
२) एका पातेल्यात दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे आणि थोडया थोड्या वेळाने ढवळत राहावे .
मंद आचेवर तांदूळ शिजे पर्यंत शिजवावे .
३) तांदूळ शिजला की त्यात साखर,काजू,बदामकाप,बेदाणे घालावेत आणि २-३ उकळी येऊ द्या.
४) त्यात वेलचीची पूड आणि केशर घालावं.
भाताची खीर तयार

टीप:-
१) बासमती तांदळा ने खीर चविष्ट बनते.
२) खीर रवाळ हवे असेल तर तांदूळ थोडे तुपावर परतून मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यावे.





मायरा वैभव जगताप

#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment