postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती #बिटाची पुरी# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #खाद्यसंस्कृती #बिटाची पुरी# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - बिटाची पुरी

बिटाची पुरी

नमस्कार मंडळींनो बीट म्हटलं की सगळ्यांची नाक मुरडतात
विशेषतः लहान मुलं आज अशीच एक बीटाची हेल्दी रेसिपी सांगणार आहे की ती झटपट बनते पणआणि सगळ्यांना आवडेल. विशेष म्हणजे मुलं पण आवडीने खातील.

साहित्य :
१ कप बीट
२ कप गव्हाचे पीठ
१/२चमचा जिरं
१/४चमचा ओवा
१चमचा आलं लसूण पेस्ट
मीठ
पाणी
तेल तळण्यासाठी

कृती:-
१) बीट किसून घेऊन मिक्सर मध्ये घालावे त्यात जिरं आणि ओवा घालावा आणि वाटून घ्यावे

२) एका परातीत गव्हाचे पीठ घ्यावे त्यात वाटलेले मिश्रण ,आलं लसूण पेस्ट, मीठ आणि पाणी घालून पीठ चांगले मळुन घ्यावे.पीठ थोडंस घट्ट असावे .

३) १०-१५ मिनिटे झाकुन ठेवा.

४) मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून तेलात तळून घ्याव्या.(लहान मुलांना द्याच्या असतील तर छोट्या पुऱ्या कराव्यात)

५) टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावी .




वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com