postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - भोगीची भाजी





नमस्कार 



 तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा
आज खूप दिवसांनी मी ही पोस्ट करत आहे
आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल रेसिपी
भोगीची भाजी

साहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड वाटी)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी
१ वाटी गाजराचे मध्यम तुकडे
१/२ वाटी ओले चणे
१/४ वाटी भिजवलेले शेंगदाणे
१/४ वाटी पावट्याचे दाणे
५-६ तुकडे शेवगा शेंगेचे
★फोडणीसाठी -
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहोरी
१/२ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
१/२ चमचा लाल तिखट
१/४ चमचे जिरे
३-४ कढीपत्ताची पाने
२ चमचे भाजलेले तिळाचा कूट
२ चमचे मसाला
२ चमचे चिंचेचा दाट कोळ
१ - १ १/२ चमचा किसलेला गूळ
१/४ वाटी ओलं खोबरं
मीठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंचेचा कोळ आणि मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या आधी थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment