postbox media

Friday 4 October 2019

'तहान' आणी 'ब्रॅंडीग'





'तहान' आणी 'ब्रॅंडीग' !!

भर दुपारची वेळ,सुर्य माथ्यावर आल्यामुळे पाउले तशी झपाझप पडत होती.मध्येच डोळ्यावरचा चष्मा काढुन घाम पुसत पुण्हा रुमालाची घडी करुन खिशात ठेवून मार्गक्रमन करु लागलो.काही वेळातच रस्त्यालगतच्या इमारतीच्या बांधकामाच्या दिशेने पाउले सावकाश टाकत पुढे निघालो.रस्त्यापर्यंत खडी पसरली होती.त्यातुन चिखल मिश्रीत पाणी वाट काढत पुढे नाल्यात जात होते.सुर्याच्या प्रखर उष्णतेने बांधकामाच्या सळ्या चांगल्याच तापल्या होत्या.सिमेंटच्या टराटर गोणी फाटत होत्या. रेती,खडी,सिमेंट एकत्र करुन मिश्रन तयार करनारी मशीन घोंघ आवाज करत होती.बांधकामावरचे मजुर प्रत्येक मजल्यावर उभे राहुन सळ्या आणी तत्सम बांधकामाचे सामान वर खाली नेत होते.गरम गरम सळ्या त्या कटाकट कापुन तशाच वर घेवून ने आण चालु होती.असल्या रखरखत्या उण्हात त्या बांधकामाच्या ठिकाणी कसली तरी शिवीगाळ ऐकु आली म्हणुन जरा थांबुन मी त्या दिशेने पुढे गेलो. तर घडले असे होते की एका मजुराला या असल्या उण्हात खुप तहान लागली होती म्हणुन तो खाली आला तिथे समोर धुळीने माखलेल्या पांढरया रंगाच्या प्लास्टीक खुर्चीवर एक 'बिसलेरी' ची अर्ध्या पेक्षा जास्त रिकामी झालेली बाटली होती. बहुतेक उण्हामुळे पाणी गरम झाले असावे तरी सुद्धा ती त्याने तहान भागवावी या हेतुने उचलली.इतक्यात तिथल्या कामावरच्या मुकादमाने दम देत त्या मजुराला शिवीगाळ करायला सुरुवात केली. उण्हात तापलेली ती बाटली त्याने तोंडाला सुद्धा लावली न्हवती. पण तो मुकादम एकदम अर्वाच भाषेत 'रख भें×× ,आइंदा से हाथ नही लगानेका' असे बोलला ..यावर तो मजुर बोलला 'क्या हुवा मालीक बहुत प्यास लगा था." ..ज्यादा शाना बनता हे क्या निकल'..मजुराला काहीच कळले नाही की असे का ?? 'तहानलेल्याची तहान जानावी' महाराष्ट्राची संस्कृती,संस्कार या मातीने शिकवलेत की 'अथीती देवो भव' घरी दारात आलेल्या प्रत्येकास आपण कमीत कमी पाणी तरी विचारतो.आणी हे सर्व पाहुन 'पाणी आणी त्याचा वाढलेला 'व्यावसायीक पणा' यामुळे 'माणुसकी' कशी हरवत जातेय हेच आपल्याला कळत नाही.पाण्याचे मिनरल,पॅकेज ड्रिंकीग वोटर च्या नावाखाली चाललेली स्पर्धा आणी लयलुट,त्याची 'किमत' सारेच कसे कमर्शीयल 'ब्रॅंडीग' झालेय. पुर्वी गिरगाव,गिरनगाव,दादर आणी शारदा सिनेमागृहाजवळ थंड पाण्याच्या चार चाकी हापसा बसवीलेल्या पाणपोई गाड्या असायच्या. त्या गाडीवर रेखाटलेला लाल रंगाचा माणुस नेहमीच सुस्वागतम करताना पाहीला की ते 25 पैशात मिळनारे पाणी दिवसाची तहान भागवायचे त्यावेळी हायजीनीकली हेल्दी,ओक्सीजन युक्त ,हिमालयीन ड्रिंकीग,मिनरल,पॅकेज ड्रिंकीग असे प्रकार आणी चोचले न्हवते'..असो..त्या मजुराला शिवीगाळ केल्यानंतर बिचारा गरीब तो खुपच 'हुशार' आणी 'स्वाभीमानी' निघाला. तिथे उभा राहुन मी हे सर्व पाहत होतो.थोड्या वेळात तो तिथे आला.त्याच्या हातात 'पुर्ण भरलेली थंडगार 'बिसलेरी' ची बाटली आता त्याने विकत आणली होती. बाटलीचे 'पाणी' पित पित तो त्या मुकादमाच्या समोरुन निघुन गेला. मुकादमाला त्याच्या तोंडात असलेली तंबाखु 'गिळावी' की 'थुंकावी' हेच कळेना अशी त्याची अवस्था झाली.आज त्या मजुराकडे त्याची खरी श्रिमंती होती त्याचा 'स्वाभीमान'. त्याच्या या कृत्याने मुकादमाच्या सनसनीत कानाखाली देखील बसली आणी आवाज सुद्धा झाला नाही. आज कोर्पोरेट आणी खाजगी क्षेत्रात काम करताना बरीच तरुण मंडळी नोकरी टिकवन्यासाठी परीस्थीती पुढे स्वाभीमानाशी फारकत करुन त्याला 'स्मार्ट वे' असे गोण्डस नाव देतात. पण असा एखादा मजुर त्याच्या लहान सहान गोष्टीतुन 'स्वाभीमानाचे' धडे देतो. मुजोरानी सुद्धा धडा घ्यावा...
'तहानेल्याची तहान जानावी, आणी भुकेल्याची भूक हाच खरा धर्म !!
वैभव जगताप

No comments:

Post a Comment