postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - ताकाची कढी




नमस्कार 

आज आपण बघुया ताकाची कढी

साहित्य:
१ वाटी दही
१ १/२ वाटी पाणी
१/४ चमचा किसलेले आले
१ हिरवी मिरची बारीक़ चिरलेली
थोडी कोथिंबीर बारीक़ चिरलेली
१/४ चमचा हळद
१/४ चमचा साखर
मीठ
फोडणी साठी:
३ चमचे तेल
१/४ चमचे राई
३-४ कढीपत्ताची पाने
१/४चमचे हिंग

कृती:
१)सर्व प्रथम दह्यात पाणी घालून त्याचे ताक करून घ्या.
२)ताकात आले ,हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, साखर, मीठ,हळद घालून व्यवस्थित एकजीव करा.
३)तयार मिश्रण गॅस वर ठेऊन सतत ढवळा. नाहीतर ताक फुटण्याची शक्यता असते.
४)एकीकडे फोडणीच्या कढईत तेल तापत ठेवा.
५) गॅसवरचे मिश्रण उकळणार असे वाटल्यास लगेच गॅस बंद करा.
६) दुसरीकडे फोडणीचे तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला. राई तडतडल्यावर कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घालून ताकाला फोडणी द्या आणि गरम भातावर वाढा.

टीप:-
१) कढीला थोडा घट्टपणा येण्या करीता त्यात १ चमचा बेसन ४चमचे पाण्यात घालून त्याची पेस्ट ताकात घालावी  

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment