postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - चिकन तंदुरी





नमस्कार 


 आज मी तुम्हाला एक चिकन ची खास रेसिपी सांगणार आहे की जिचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सूटं
चला तर आज आपण बघुया चिकन तंदुरी

साहित्य:
४०० ग्रॅम चिकन विथ बोन्स
२ चमचे आलं-लसूण पेस्ट
२ ते ३ चमचे घट्ट दही
२ चमचे तंदूर मसाला
१ १/२ चमचा लाल तिखट (बेडगी)
१/२ चमचा धनेपूड
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा हळद
२ चमचा लिंबू रस
लाल फूड कलर (Optional )
मीठ चवीप्रमाणे
१ चमचा तेल
२ चमचा बटर
१ चमचा चाट मसाला वरून घालण्यासाठी
सॅलडसाठी-
१ कांदा, उभा चिरलेला
१ वाटी कोबी उभा आणि पात्तळ चिरलेला
सॅलडला लावण्यासाठी तिखट,मीठ,लिंबू

कृती:
१)दही गाळण्यात घालून ५-१० मिनिटे एखाद्या बाउलवर ठेवा. म्हणजे जास्तीचं पाणी गळून घट्ट दही मिळेल.
२)मॅरीनेट करण्याचा मसाला बनवण्यासाठी घट्ट दह्यात , आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला,लाल तिखट, हळद, धने-जिरेपूड,मीठ, १ चमचा तेल आणि लिंबू रस घाला. चमच्याने चांगलले फेटून घ्या.
३) चिकनच्या थाय आणि लेग्जना सगळ्या बाजुनी सुरीने चीर द्या. उरलेल्या चिकनचे ३" चे तुकडे करा सगळ्या चिकनला तयार केलेला मसाला लावून ७-८ तास मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
४)ओव्हन ४०० F तापमानाला प्रीहीट करा. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या आणि त्यावर चिकनचे पिसेस अरेंज करा. प्रीहीटेड ओव्हनमध्ये चिकन ३० मिनिटे बेक करा. १५ मिनिटांनी चिकन उलटं करून वरून किंचित बटर सोडा आणि उरलेली १५ मिनिटे बेक करा.
५)तंदुरी भाजायची एक घरगुती पद्धत म्हणजे तंदूरभट्टी जर ती नसेल तर चार किलो डालडाचा डबा घ्या . त्या डब्याचा वरचा व खालचा गोलाकार भाग काढून टाकल्यावर डबा पोकळ राहिल .
६)तो डबा गैसवर ठेवावा . व त्यावरून कोंबडी लावलेली शिग ठेवावी म्हणजे चिकन सगळीकडून भाजून निघेल . परोठा व नान भाजायचा असल्यास हीच घरगुती भट्टी उपयोगी पडेल .
५)गरम तंदुरी चिकनवर लिंबुरस आणि चाट मसाला भुरभुरा बरोबर कांदा आणि कोबीचं सॅलड सर्व्ह करा.

टीप:
१) चिकन थाय आणि लेग्जना चीर दिल्यावर मॅरीनेट करण्याचा मसाला आत पर्यंत जाईल याची काळजी घ्या.
२) चिकन जास्ती वेळ बेक केल्यास चिवट होण्याची शक्यता असते.
३)चिकनला जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर एक सोपी टीप,
कोळश्याचा छोटा तुकडा चिमट्यात पकडून गॅसच्या फ्लेमवर किंवा मेणबत्तीवर लाल होईपर्यंत गरम करा. एका वाटीत हा तुकडा घालून तंदुरी चिकनच्या प्लेटमध्ये मधोमध ठेवा. कोळश्याच्या तुकड्यावर चमचाभर तूप घाला म्हणजे धूर यायला लागेल लगेचच वरून एखादं पातेलं ठेवून बंद करा. ५-७ मिनिटे तसंच झाकून ठेवा म्हणजे चिकनला कोळश्याचा मस्त फ्लेवर येईल  


 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment