postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मेथी मलाई मटार




नमस्कार 


बाजारात मेथी आणि मटार जास्त प्रमाणात बघितले जातात तर चला मग आज आपण बघुया मेथी मलाई मटार

साहित्य:
१जुडी मेथीची फक्त पाने
१/२ वाटी मटार
१ हिरवी मिरची
१ कांदयाची पेस्ट
१ चमचा बटर
२ काळ्या मिरी
१ वेलची
१ लहान दालचिनीचा तुकडा
१/२ पेला दुध
मिठ

कृती:
१) कढईत बटर गरम करावे त्यात हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे. नंतर मिरी, वेलची आणि दालचिनीचा तुकडा घालून त्यांचा छान वास येईस्तोवर परतावे.
२) या फोडणीत कांद्याची पेस्ट घालावी. मध्यम आचेवर परतावे. कांद्यातील सर्व पाणी निघून जाऊन कांदा शिजला कि त्यात धुवून स्वच्छ केलेली मेथीची पाने घालावीत. मध्यम आचेवर मेथी परतावी. शिजवताना कढईवर झाकण ठेवू नये, मेथीचा रंग बदलतो.
३) पाने थोडी शिजली कि त्यात मटार आणि दूध घालावे आणि मंद आचेवर शिजवावे. चवीनुसार मिठ घालावे. १ ते २ टेस्पून क्रिम घालावे आणि थोडावेळ मंद आचेवर शिजवावे.
हि भाजी छान मिळून यायला वेळ लागतो त्यामुळे शिजवताना घाई करू नये.

टीप:
१) आलेलसूण पेस्ट आवडीनुसार फोडणीत घालू शकतो.परंतु, त्यामुळे मेथीचा स्वाद एकदम कमी होतो आणि भाजी तेवढी चविष्ट लागत नाही.मेथी चा फ्लेवर जातो
२) फ्रेश क्रिममुळे भाजीला थोडी गोडसर चव येते. पण वाटल्यास चिमूटभर साखर घालावी.

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment