postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - काजूकतली






नमस्कार 

 भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत की ती सगळ्यांच्या आवडीची आहे मिठाई मधली राणी काजूकतली .
चला तर आपण बघुया काजूकतली

साहित्य:
सव्वा पेला काजूची बारीक पूड
१/२ पेला साखर
१ चमचा तूप
१/४ चमचा वेलचीपूद
पाणी
चांदीचा वर्ख सजावटीसाठी

कृती:
१) एका नॉनस्टिक पॅन मध्ये पाव पेला पाणी घ्यावे त्यात साखर घालून एकतारी पाक बनवावा
२) पाकामध्ये काजूची पावडर घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या
३) मिश्रण जरा आळले कि त्यात तूप आणि वेलचीपूड घालावी आणि सगळे मिश्रण अळून द्यावे.
४) पोळपाटाला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

टीपा:
१) काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केलेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.
२) काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध मिश्रणात घालावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment