postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - गुलाबजाम





नमस्कार 

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया गुलाबजाम

साहित्य:
★२५० ग्रॅम गुलाबजामचा खवा
★साखरेचा पाक बनवण्यासाठी
दिड पेला साखर
सव्वा पेला पाणी
१/२ टिस्पून वेलचीपावडर
★इतर साहित्य
तळण्यासाठी तेल किंवा तूप
१ चमचा मैदा
गरजेप्रमाणे दुध
चिमूटभर बेकिंग सोडा

कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत बेकिंग सोडा घालावा. निट एकजीव करावे. किंचीत दुध शिंपडून मळून घ्यावे. लागल्यास अगदी थोडे तूप हाताला लावून मध्यम मळावे. ओल्या कपड्याने हा गोळा झाकून ठेवावा.
२) दिड पेला साखर, सव्वा पेला पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा.त्यात वेलचीपूड घालावी. पाक तयार होत असतानाच मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
३) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम आचेवर गुलाबजाम तळून घ्यावेत .
४) साखरेच्या पाकात हे गुलाबजाम सोडावेत .
गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे. शक्यतो आदल्या रात्री करून मुरवल्यास व्यवस्थित मुरतात.

टीप:
१) काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोज इसेंस घालावा.
२) मैद्याऐवजी आरारूट पावडर किंवा कॉर्न फ्लोर वापरले तरी चालते.
३) गुलाबजाम तळताना तेलाचे तापमान फार महत्त्वाचे असते. जास्त गरम तेल असेल तर गुलाबजामला लगेच लालसर रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. आणि पाकात टाकल्यावर न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही. त्यामुळे सुरूवातीला एकदोन गुलाबजाम टाकून तापमानाचा अंदाज करून घ्यावे.
४) गुलाबजामसाठीचा पाक खुप घट्ट करू नये त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये निट मुरत नाही.
५) गुलाबजामसाठी वेगळा रवाळ असा खवा मिळतो तो वापरावा



मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment