postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - नागपुरी पुडाची वडी





नमस्कार,


आज आपण बघुया नागपुरी पुडाची वडी

साहित्य:
आवरणासाठी:
१/२ वाटी मैदा
१/२ वाटी बेसन
२ चमचे धणे-जिरेपूड
१ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
२ चमचे तेल
सारण:
१ चमचा खसखस, भाजून पूड
१ मध्यम कांदा, बारीक चिरलेला
५ -६लसूण + १ इंच आले +४- ५ मिरच्या सर्व ठेचून घेणे
१/२ वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, भाजून चुरडून घ्यावे.
४कोथिंबीरच्या जुड्या, निवडून धुवून घ्यावी. (निवडल्यावर साधारण३ते ३ १/२ वाटी)
चवीपुरते मिठ
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धणेपूड
१ चमचा लाल तिखट
१ चमचा तेल
तेलाचे मिश्रण:
१ चमचा तेल + १ चमचा गोडा मसाला

कृती:
१) कोथिंबीर निवडून धुवून पंच्यावर पसरून पूर्ण कोरडी होवू द्यावी नाहीतर वड्या लगेच मऊ पडतात. कोथिंबीर कोरडी झाली कि बारीक चिरून घ्यावी.
२) कांदा १ चमचा तेलात खरपूस परतून घ्यावा. ताटात कोथिंबीर, परतलेला कांदा, खसखसपूड, तिखट, धणे-जिरेपूड, आले-लसूण-मिरचीचा ठेचा असे सर्व एकत्र करून सारण तयार करावे.
३) मैदा आणि बेसन एकत्र करावे. त्यात धणे-जिरेपूड, तिखट, हळद, आणि २ चमचे गरम तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मिठ घालून पाण्याने घट्ट मळून घ्यावे. ३० मिनीटे झाकून ठेवावे.
४) मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून अंडाकृती आकारात पातळ लाटून घ्या. गोडामसाल्याचे मिश्रण थोडेसे मध्यभागी लावून त्यावर साधारण २ चमचे सारण लांबट आणि त्रिकोणी आकारात चेपून ठेवावे. दोन्ही मोठ्या बाजू एकावर एक अशा ठेवून चिकटवाव्यात. नंतर छोट्या बाजू फोल्ड कराव्यात. व्यवस्थित बांधून घ्यावी नाहीतर तळताना उंडा सुटून सारण बाहेर येईल.
५) तेल गरम करून मंद आचेवर उंडे खरपूस तळून घ्यावे. कापून गरमा-गरम सर्व्ह करावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment