postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - पोपटी




नमस्कार 


आज आपण एक आगळी वेगळी डिश बघणार आहोत ती म्हणजे पोपटी
नाव ऐकून जरा वेगळच वाटले ना
रायगड जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती चा हा एक भाग आहे पोपटी.
गोड्या वालाच्या शेंगांचा मोसम आणि थंडीचा संयोग जुळून आला की, निमित्त काढून अशा पार्ट्या करण्याची इथली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली.देशावर जशी हुरडा पार्टी केली जाते, तशीच उत्तर कोकणातील ही पोपटी पार्टी केली जाते .
थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्चअखेरपर्यंत हा सिलसिला सुरू रहातो.
चला तर आपण बघुया पोपटी कशी बनवतात ते

साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा दोन किलो
एक किलो चिकन (मोठे तुकडे)
एक डझन अंडी
बटाटे अर्धा किलो
एक वाटी आलं +लसूण +मिरची +कोथिंबीर पेस्ट
1/2चमचा हळद
1चमचा तिखट
जाडे मीठ/ बारीक मीठ
चवीपुरता ओवा
मध्यम आकाराचं मातीचं मडकं
भांबुर्डीचा पाला
लाकडं किंवा गोवऱ्या.

कृती :
1)सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्यावा.
2)चिकनलाहिरवीपेस्ट हळद आणि मीठ लावून 1/2तास मॅरीनेट कार्याला ठेऊन द्यावे
बटाट्याला देखील चिरा पडून त्यात हेय वाटण भरून घ्यावे 3) मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे बटाटे ठेवावीत. नंतर थोडासा ओवा व मीठाची पखरण करावी. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं अगदी काळजीपूर्वक बंद करावं.

* पोपटी लावण्याची पद्धत :
मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा वितभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलटं ठेवावं. (काहीजण तीन विटांवरही मडकं उलटं ठेवतात.) मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्याव्यात. जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं. चोहीबाजूनं लागणाऱ्या जाळामुळं भांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परांत एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती यादरम्यान होत असते. अर्धा-पाऊणतासाने मडक्यावर पाणी मारून पाहावं. ‘चर्र’ असा आवाज झाल्यास पोपटी शिजली असं समजावं.
त्यानंतर मडक्याशेजारील लाकडं, गोवऱ्या बाजूला कराव्यात. त्यावर पाणी मारावं व जाड फडक्यानं मडकं अलगद बाहेर काढावं. लगेचंच आतील पोपटी एका पेपरवरकिंवा परातीत काढून घ्यावी. त्यातला भांबुर्डीचा पाला बाजूला काढून पाणी आणि तेलाशिवाय शिजलेल्या या अनोख्या पदार्थाचा मनमुराद आनंद घ्यावा.

टीप:-
1)वेज पोपटी पण केली जाते त्यासाठी बटाटे ,रताळी,वांगी,कंद आणि वालाच्या शेंगा वापरले जातात
2) जर भांबुर्डी चा पाला नाही मिळाला तर केळीच्या पाना मध्ये चिकन चे तुकडे बांधून ठेवावेत
मडक्यात प्रथम केल्याचे पान ठेवावे त्यावर शेंगा घालाव्यात मग चिकन
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment