postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - कोलंबी भात




नमस्कार,

आज आपण बघणार आहोत कोलंबी भात किंवा कोलंबीची खिचडी

साहित्य:
१ वाटी सोललेल्या कोलंब्या
२पेले बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)
२कांदे उभे चिरलेले
२टोमॅटो बारीक चिरलेला
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
३-४ चमचे मालवणी मसाला किंव्हा (२ चमचे लाल तिखट + १ चमचा गरम मसाला)
१/२ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१ चमचा लिंबाचा रस
मीठ
तेल
१चमचा साजुक तूप
१चमचा शहाजिरे
२-३ तमालपत्र
२ चाक्रीफुल
२ मसाला वेलची
७-८ काळीमिरी
४-५ लवंगा
२ इंच दालचिनी तुकडा
१ वाटी नारळाचे दुध
३ पेले गरम पाणी
१/२वाटी कोथिंबीर

कृती:
१)कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास मुरत ठेवावी.
२)तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा.
३)पातेल्यात३-४ चमचे तेल गरम करा. अख्खे/खडे मसाले फोडणीला घाला.
त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा.
मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता.
४)तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला.
एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला.
५)हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.

टीप :
१)मोठ्या कोलंबी पेक्षा लहान कोलंबी या भातात चांगला लागतो.
२)नारळाचे दुध नसेल तर पूर्ण पाणी वापरले तरी चालेल. (म्हणजे २ पेले तांदूळ = ४ पेले पाणी)
३) बटाटा आवडत असेल २बटाट्याच्या मध्यम फोडी करून घालाव्यात .




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment