postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - चिकन लॉलीपॉप




नमस्कार 


 दिवाळीत रोज गोडधोड खाऊन आता कंटाळा आला
चला तर आज आपण बनवूया चिकन लॉलीपॉप

साहित्य :

८ चिकन लॉलीपॉप स्टिक (ह्या स्टिक चिकनच्या दुकानात मिळतात.)
२ अंडी
६ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
१/४ चमचे मिरी पावडर
१/४ चमचे गरम मसाला
१/२ चमचे चिली सॉस
१/२ चमचे सोया सॉस
५० ग्रॅम मैदा
१ चमचा आले-लसून पेस्ट
खायचा लाल रंग (चिमुटभर)
१/२ वाटी पाणी
१/२ चमचा मीठ
तेल तळण्यासाठी

कृती:-
१)चिकन लॉलीपॉप स्टिक १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. त्यात १/२ चमचा मीठ घाला.
२)एका भांड्यात हिरव्या मिरचीचे वाटण,सोया सॉस,चिली सॉस, आलं लसूण पेस्ट ,अंडी,मैदा,मीठ,खायचा रंग,,गरम मसाला आणि लागल्यास पाणी हे साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्या. त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करा.
३) एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवा.त्यात चिकन लॉलीपॉप स्टिक वरील मिश्रणात बुडवून तेलात टाळून घ्या.
४) गरम-गरम शेजवान सॉस बरोबर सर्व करा.

टीप :
१)ह्यात तुम्हाला जर आवडत असेल तर १/४चमचा अजिनोमोटो पण घालू शकतात
मी अजिनोमोटो वापरला नाही आहे .



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment