postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - अनारसे







नमस्कार 

 आज आपण बघुया एक पारंपारीक पदार्थ या पदार्थांशिवाय दिवाळी चा फराळ हा अपूर्णच वाटतो .गोड खुसखुशीत असे अनारसे.
चला तर बघुया अनारसे कसे बनवायचे .

साहित्य:
१ वाटी तांदूळ
१ वाटी किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल

कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर किंवा सुती कपड्यावर घालून वाळवून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्या नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा.प्लॅस्टिक चा हवा बंद डबा वापरावा.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे.एक प्लॅस्टिक ची पिशवी घेऊन त्यावर खसखस घालावी आणि खसखशीवर हे पिठाचे गोळे पुरीप्रमाणे लाटावे किंवा थापावेत . हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
६) बऱ्याच वेळा अनारसे तळताना तो फसफसतो अशा वेळे ते कणिक परत बंद करून ठेऊन द्यावे काही दिवस.
हे पीठ ६-७महिने सहज रहाते
७) अनारसे बारीक आचेवर तळून घ्यावे आणि झाऱ्यात उभे ठेवावे.





 मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

No comments:

Post a Comment