postbox media

Wednesday 2 October 2019

खाद्यसंस्कृती - चकली



 
नमस्कार 

आज आपण बघुया चकली

साहित्य:-
★भाजणी तयार करण्यासाठी
४ वाट्या तांदूळ
२ वाट्या चणाडाळ
१ वाटी उडीद डाळ
१/२ वाटी मूगडाळ
अर्धी-पाऊण वाटी जिरं
पाव वाटी धणे

कृती :-
१)तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावेत. सुती कपड्यावर वाळत घालावेत.
२)एका कढईत हे सगळे जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान खमंग भाजून घेऊन बारीक दळून आणावे

★चकली साठी
साहित्य:-
१ पेला चकलीची भाजणी
१ पेला पाणी
१ चमचा हिंग
२ चमचा पांढरे तिळ
१/२चमचा ओवा
१ चमचा लाल तिखट
तेल
मिठ

कृती:
१) एका पातेल्यात१ पेला पाणी उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट,१चमचा तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सोर्याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

टीप:-
काहीवेळा चकली बनवता थोडी गडबड झाली की त्या तुटतात की फसतात आशा वेळी
★चकल्या नरम पडण्याची कारणे
१)भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर - सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे.
२)मोहन कमी झाले तर - उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात.
३) चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात.
४)चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास - भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.
५)चकलीचे पिठ गरजेपेक्षा नरम भिजवल्यास - अशावेळी थोडी कोरडी भाजणी घालावी. मळून परत चकली करावी.
६)चकली तेलातून लगेच काढल्यास - चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबूडे येतात नंतर बुडबूडे बंद होवून चकली थोडी खाली बसायला लागेल अशावेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये.
★चकल्या तुटण्याची कारणे:-
चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पिठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे - गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचीत मऊ मळावी.

★चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे:-
पिठात मोहन जास्त झाले तर - थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.



मायरा वैभव जगताप  
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

No comments:

Post a Comment