postbox media

Showing posts with label #मुंबई #मराठी. Show all posts
Showing posts with label #मुंबई #मराठी. Show all posts

Friday 4 October 2019

अरे म्हणा ना मुंबई आमची


 
 
 
अरे म्हणा ना मुंबई आमची...!!

काल 'जिग्नेश' मला पुण्हा भेटला. तोंडात मावा आणी हातात गाडीची चावी गोल गोल फिरवत खांद्यावर हात टाकत..'अरे मोटा भाय कसा काय..मी म्हणालो 'मस्त',
"तु बी ना भावा आमचे मागे लागलाय जवासी हे इलेक्क्षन चालु झाला'..आपन बघ टेंशन नाय घेत, तो म्हणाला..त्याच्या अंगावरच्या डिवोच्या सुंगंधाने जरा गरगरायला होत होत मला. मी विचारले 'क्या भाय किधरसे आ रे ला हे..तसा हसत हसत म्हणाला.."अरे तु बी ना येडा काय बी पुछते",...'सांस्क्रुतीक कार्यक्रम'.. होता ना आमचे दोस्त लोग चा..
"अछा 'गरबा' मी म्हणालो...'नाय रे' तो पटकन म्हणाला..'डांस बार मंदी रे येडा' अरे पन ते तर कवाच बंद झाला ना मी पटकन म्हनालो...'ते तुमच्या साठी'..आमा लोकाना समदे अड्डे माहीती छे नी..!!
हे तुमच 'आबा' ला बोल किती बी 'एल.बी.टी' आण आणी किती बी वेला डांस बार बंद कर, आमी मुंबई मधुन जानार नाय उलटा तुमा 'घाटी लोग' ला हाकलेल...'धंदा करताना जो आडवा येतो त्याला एक तर 'भाउ' बनवायचा, नायतर 'बरबाद' करायचा' हे आमचा धंद्यातला 'उसुल' हाय'...साले समदे 'गांधी चे आगे झुकते ना'..
गांधी बी आमचे गुजरातचा'..
"गांधी कधी आणी कुठे वापरायचा" हे आमा गुजराती लोग ला चांगलाच माहीती हाय' असे म्हणत पुण्हा रस्त्यावरच पिंक टाकत हसला.
खांद्यावर पुण्हा हात ठेवत किरीट मेहता म्हनाला.."भाउ, तुमी लोग कोणत्या दुनियेत जगते ते कलत बी नाय बघ तुमालाच..
आम्ही चमडी विकुन जवा आमचा दादाजी या मुंबई त आला तवा तुझा दादाजी पन गोदीत,आनी पक्याचा बाप बी मील मध्येच कामाला जायचा आणी "राशन" आमचे दुकानातुन घ्यायचा..हलु हलु दादाजी ने चाल बांधली तिथे तुमी "पागडी सिस्टम" ने राहयला आला, दादाजी चे उपकार विसरलात काय तुमी घाटी लोग ??..
तुमी आमचे गुजराती लोग ला 'थॅंक यु' बोलले पाहीजे ..तु बी इलेक्षन पासुन आमचे मागे लागलाय...शेवटी मी जिग्नेश ला आता न राहावून बोललो..
'अछा'
साला तुमी लोग 'भ्रष्टाचारावर' बोलता..
खरे भ्रष्टाचारी तुमीच...तुझ्या बापुस ने धंदा करताना एक रुपयाची वस्तु नफ्यासहीत किती रुपयाला विकली सांग ना सांग मेहनतीने पैसा कमावनारी आम्हा 'स्थानीक' लोकांची चाळ बळकावलीत..'अर्धी जागा मधी 'जैन सोसायटी' बांधलीत तिथे आम्हा मराठी लोकाना मास मछी खातात म्हनुन घर देत नाही. अर्धी चाळ ची जागा स्वता डेवलप करायला घेतलीत तुझ्या गुजराती पार्ट्नर बरोबर. आता आमी सर्व चाळीतील भाउ बहीन, शेजारी- पाजारी 'विरार,डोंबीवली वसई,पनवेल,अंबरनाथ' आणी इतर ठीकानी फेकलो गेलो..तिथे पण तुमी..?? जे नडले त्याच्यावर तुमी केस टाकलीत,आता काय गावी जायचे काय??..हसत हसत तो म्हणाला "मोटा भाय हे समदा धंदा असते बघ..तु बी 'हिंदु' मी बी हिंदु' याचा अर्थ तु आणी मी भाउ ना' 'हिंदु हिंदु भाउ ना' सगला हिंदु भाउ बहीन ना आपला' थोडा समजदारीने घे नी..आता लवकर 'शहाणा' व्हायचा ..मग कर ना वोट आपल्या माणसाला 'प्रकाश सोमैय्या' ला त्याला बी "भाउ पाहिजे' ना, त्याच्या कडे भारी स्कीम हाय तो निवडुन आला ना की डायरेक्ट 'डबल' बग ...तुला बी घेते त्यात..आता इतक्या गोड गळ्याने 'भाउ' बोलल्यावर...' मी पण लगेच... ????????????
 
 
वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com