postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #नमकीन #सण #संस्कृती #गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #नमकीन #सण #संस्कृती #गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Friday, 27 September 2019

खाद्यसंस्कृती - नमकीन



नमस्कार,

रोज रोज संध्याकाळी चहा सोबत काय खायला करायच हा प्रश्नच पडतो. म्हणून आज तुम्हाला एक चटपटीत रेसिपी सांगणार आहे .
आजची आपली रेसिपी आहे नमकीन.

साहित्य:-
१कप मैदा
१/२ चमचा ओवा
चवीपुरते मीठ
चाट मसाला
पिठी साखर
पाणी
तेल

कृती:-
१) एका परातीत मैदा घ्यावा त्यात चवी नुसार मीठ घालावे ( नेहमी पेक्षा थोडा कमी )

२) २मोठे चमचे तेल कडकडीत गरम करावे त्यात ओवा टाकावा आणि ते तेलाचे मोहन मैदामध्ये घालावे आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावे.१०-१५ मिनिटे मळलेलं पीठ झाकून ठेवावे

३) एक छोटा गोळा घेऊन त्याची चपाती लाटावी आणि मग लांब लांब पट्टया कापाव्यात

४) गरम तेलात तळून घ्यावे
थोडे गार झाले की त्यावर चाट मसाला आणि थोडी पिठी साखर घालावी .

टीप:
१) अजून तिखट पाहिजे असेल तर पिठात मिरची पावडर घातली तरी चालेल.



माही वैभव जगताप  

www.aapalimahi.blogspot.com