postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #चंपाकळी #सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #चंपाकळी #सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - चंपाकळी



नमस्कार, 




आजची आपली एक गोडाची रेसिपी आहे पण नेहमी पेक्षा थोडी वेगळी आहे . लहान मुलं देखील आवडीने हा पदार्थ खातील.
आजची आपली रेसिपी आहे चंपाकळी (चंपाकली)

साहित्य:-

२वाटी मैदा
१वाटी साखर
१/२चमचा वेलची पावडर
पाणी
तेल

कृती :-
१) एक परातीत मैदा घावा.
त्यात २चमचे तेलाचे मोहन घालावे आणि थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे. १० ते १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे .

२) पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुरी सारखे लाटून घ्यावे

३) लाटलेल्या पुरीच्या मधोमध सुरीने उभ्या चिरा द्याव्यात
नंतर ते गुंडाळून घेऊन कडेने बंद करावे .

४) गरम तेलात मंद आचेवर तळावे

५) ऐका पातेल्यात साखर घ्या .
साखर बुडेल त्याचा थोडं जास्त पाणी घ्या आणि त्याचा पाक बनवा
६) पाक थोडा गार झाला की आपल्या चंपाकळी पाकातून घोळवून घावे
आपल्या चंपाकली तयार.






वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com