postbox media

Showing posts with label #girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes. Show all posts
Showing posts with label #girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes. Show all posts

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - पुरणाच्या करंज्या




नमस्कार 


आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार . ह्या दिवशी देवीला वरणा पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो.आज आपण पुरणाची एक गोड पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे
पुरणाच्या करंज्या
त्याच बरोबर आजची आपली ही १०० रेसिपी आहे.
तुमच्या उदंड प्रतिसाद बद्दल मी तुमची खूप आभारी आहे .
चला तर बघुया पुरणाच्या करंज्या
साहित्य:
१ वाटी पुरण (पुरणपोळीला करतो तसेच पुरण)
१ वाटी गव्हाचे पीठ (कणिक)
२ चमचे तेल
तेल किंवा तूप तळण्यासाठी
चिमूटभर मीठ

कृती:
१) पुरण बनवण्यासाठी चणाडाळ कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळून टाकावे. या पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
२) पुरण बनवायला जेवढी चणाडाळ घेतली असेल तेवढाच गुळ घ्यावा, गोड जास्त हवे असेल तर २ चमचे गुळ जास्त घालावा. शिजलेली डाळ गरम असतानाच त्यात गुळ घालावा. आणि घट्ट होईस्तोवर पुरण ढवळावे. १/२ चमचा वेलची पूड आणि २ चिमटी जायफळ पूड घालावी.
३) २ चमचे गरम तेल गव्हाच्या पिठात घालावे. त्यात १ चिमटी मीठ घालावे. पाणी घालून घट्टसर माळून घ्यावे. पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) पीठाचे १ इंचाचे गोळे करावे. गोळे लाटून त्यात मध्यभागी पुरण ठेवावे. कडा जोडून करंजी बनवावी. कातण्याने कडा कापून घ्याव्यात. करंज्या घट्ट पिळलेल्या सुती कपड्याखाली झाकाव्यात. अशाप्रकारे सर्व करंज्या करून तुपात तळून घ्याव्यात.
करंज्या गरमच छान लागतात. वाढताना चमचाभर पातळ तुप घालावे.



वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - गुलगुले




नमस्कार 

 आज आपण बघुया एक वेगळा पदार्थ त्याचा नाव आहे गुलगुले

साहित्य:
१ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी गूळ
१चिमटी बेकिंग सोडा
थोडीशी बडीशेप
पाणी
तूप

कृती :
१) गव्हाचं पीठ आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या.
२) गूळ किसून एका वाडग्यात ठेवा आणि त्यावर १ वाटी उकळतं पाणी घाला.
३) पाण्यात गूळ विरघळू द्या. गूळ पूर्णतः विरघळल्यावर, गव्हाच्या पिठावर ओता. त्यात बडीशेप घालून, मिश्रण चांगलं फेटा. मिश्रण जरा घट्ट असायला हवं.
४)कढईत तूप गरम करून, त्यात डावाने किंवा चमच्याने या मिश्रणाचे लहान-लहान गुलगुले सोडा. गुलगुले गरम तुपात लालसर तळून घ्या. गरमागरम गुलगुले सायीच्या दह्यासोबत सर्व्ह करा.


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - नारळीभात






नमस्कार



अस म्हंटलं जात की चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी गोडाने केली जाते. म्हणूनच तुमच्यासाठी खास आज एक मराठमोळी पारंपारीक पदार्थ सांगणार आहे.
श्रावणपोर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन.
ह्या पौर्णिमेचे महत्व असे आहे की
कोळीबांधव ह्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात आणि ह्या दिवशी कोळी बांधव सोन्याचा नारळ अर्पण करून सागरेश्वरा कडून आशीर्वाद घेतात आणि घरी बनवला जातो तो खास नारळीभात.

साहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.



 वैभव जगताप

खाद्यसंस्कृती - लापशी रवा





नमस्कार 


 आज आपण बघुया लापशी

साहित्य:
१ कप दलिया किंवा लापशी रवा
३/४ कप किसलेला गूळ
२ चमचे तूप
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ कप पाणी
१/४ कप गरम दूध
१/४चमचा वेलची पूड
चिमूटभर मिठ
३ चमचे काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप
१ चमचा बेदाणे

कृती:
१) २ चमचे तूप कढईत गरम करावे. त्यात लापशी रवा खमंग भाजून घ्यावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे.
२) रवा भाजताना दुसर्‍या गॅसवर ३ कप पाणी गरम करावे. त्यात चिमूटभर मिठ घालावे.
३) रवा चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी आणि दूध घालावे. निट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर २ वाफा काढाव्यात. ताजा नारळ घालून मिक्स करावे.
४) रवा शिजल्यावर किसलेला गूळ घालून ढवळावे. गूळ वितळला कि बेदाणे घालावे.
५) झाकण लावून मध्यम आचेवर वाफ काढावी. वेलचीपूड घालून मिक्स करावे.
गरम गरम सर्व्ह करावा.
 


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - कैरीचे पन्हं





नमस्कार 


आज आपण बघुया कैरीचे पन्हं

साहित्य:
१/२ वाटी कैरीचा गर
२ वाटी साखर
१ चमचा वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती:
१) साधारण एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२)एक्का पातेल्यात हा गर काढून घ्यावा त्यात साखर आणि थोडे पाणी घालावे त्यात केशर आणि वेलचीपूड घालून ढवळून घ्यावे. काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ चमचे मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.

टीप:-
१) साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकतो . 


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - आंबेडाळ





नमस्कार 

 
गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा
आज आपण बघुया क पारंपरिक पदार्थ आंबेडाळ

साहित्य:-
२ वाटी चणाडाळ
१ कैरी किसलेली
१ चमचा मोहरी
१/२ चमचा हळद
१/२ चमचा साखर
५-६ पाने कडीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
हिंग
मीठ
तेल

कृती:-
१) चणाडाळ ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सरमध्ये पाणीन घालता डाळ आणि २-३ कडीपत्ताची पाने वाटून घ्यावी
२) एका भांड्यात वाटलेली डाळ घ्यावी त्यात किसलेली कैरी थोडी कोथिंबीर ,चवीपुरते मीठ,थोडी साखर घ्यावी
३)एका बाजुला २-३ चमचे तेल घ्यावे त्यात मोहरी ,कडीपत्ता, हिंग, हळद यांची फोडणी करून घ्यावी
आणि ही फोडणी वाटलेल्या डाळीत घालून एकजीव करून घ्यावे
आपली आंबेडाळ तयार 


 
वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - सामोसे





नमस्कार,


आज आपण बघुया सामोसे

साहित्य :-
२ वाटी मैदा
१ मोठा चमचा दही
१मोठा चमचा तूप
अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा चिमुटभर सोडा
१चमचा मीठ .

सारण :-
१ वाटी मटार वाफवलेले
४बटाटे उकडून बारीक चिरून
२टोमॅटो
१चमचा मीठ
१कांदा + कोथिंबीर एक वाटी + १ चमचा गरम मसाला + ५-६मिरच्या यांचं मिश्रण
तेल .

कृती :-
१) तेल गरम करून त्यातच टोमॅटो चिरून घालावे . कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं . त्यातच वाटण घालून परतावं .
२) खरपूस झालं की गॅस बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट एकजीव करून घ्यावे
३) मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं . तूपाचे मोहन घालावे
४) त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं . अर्धा तास झाकून ठेवावं .
५) नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरी सारख करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे .
६) प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत . अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं . (पाणी लावून चिकटवावं) .
७) नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत . चाट करताना मधोमध फोडून कांदा , चटणी , शेव घालून दयावं .

 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - पुरणपोळी




नमस्कार,

 
होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया पुरणपोळी

साहित्य :-
३ वाट्या हरभरा डाळ
३ वाट्या चिरलेला गूळ
१ वाटी साखर
अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
३ वाट्या कणीक
३ चमचा मैदा
चिमुटभर मीठ
पाऊन वाटी तेल
तांदळाची पिठी

कृती :-
१)हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
२)प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी.
३)शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. ह्या पाण्याला पुरणाचा कट म्हणतात. पुरणपोळी बरोबर त्याचीच आमटी करतात. पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते.
४)डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
५)पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. शिजवताना प्रथम पातळ होते व नंतर झाऱ्याला घट्ट लागू लागते.
६)पुरणयंत्राला बारीक जाळीची ताटली लावावी व शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
७) कणीक व मैदा चाळणीने चाळून घ्यावा व चिमुटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक सैलसर भिजवावी.
८)२ तास कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली तिंबावी. पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा. कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
९)वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. तांदळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
१०)पोळपाटावर पिठी घेवून हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - बुंदीचे लाडू


 
नमस्कार 


आज आपण बघुया बुंदीचे लाडू

साहित्य:
१ वाटी बेसन
१ वाटी साखर
वेलची पूड
केशर
तळण्यासाठी तूप किंवा तेल
बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे

कृती:
१) बेसनात १ चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.
३) कढईवर झारा धरून भिजवलेल्या पीठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या कि दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तूपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.
४) झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुवून पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.
५) साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधून मधून ढवळावे. पाक शोषला गेला कि लाडू वळावेत.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - स्ट्रॉबेरी मिल्कशेक




नमस्कार 

आज आपण बघुया स्ट्रॉबेरी मिल्कशेक

साहित्य:
१५ स्ट्रॉबेरीज
१ वाटी स्ट्रॉबेरी आईसक्रीम
१/४ पेला थंड दूध
२ चमचे मिल्क पावडर
१ ते २ चमचे साखर

कृती:
१) मिल्क पावडर दुधात नीट मिक्स करावी.
२) दूध पावडर+ दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज, आणि आईसक्रिम मिक्सरमध्ये फिरवावे.
३) २ ग्लासेस मध्ये ओतावे. स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करावे. लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) स्ट्रॉबेरीवर बारीक बिया असतात. त्या कधीकधी मिक्सरवर बारीक वाटल्या जात नाहीत. अशावेळी स्ट्रॉबेरी सुरीने हलकेच सोलून घ्यावे.
२) मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घालावेत. मिल्कशेक पिताना मधेमधे चांगले लागतात.
३) स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर वरती आईसक्रीमचा स्कूप किंवा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकतो.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पोपटी




नमस्कार 


आज आपण एक आगळी वेगळी डिश बघणार आहोत ती म्हणजे पोपटी
नाव ऐकून जरा वेगळच वाटले ना
रायगड जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती चा हा एक भाग आहे पोपटी.
गोड्या वालाच्या शेंगांचा मोसम आणि थंडीचा संयोग जुळून आला की, निमित्त काढून अशा पार्ट्या करण्याची इथली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली.देशावर जशी हुरडा पार्टी केली जाते, तशीच उत्तर कोकणातील ही पोपटी पार्टी केली जाते .
थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्चअखेरपर्यंत हा सिलसिला सुरू रहातो.
चला तर आपण बघुया पोपटी कशी बनवतात ते

साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा दोन किलो
एक किलो चिकन (मोठे तुकडे)
एक डझन अंडी
बटाटे अर्धा किलो
एक वाटी आलं +लसूण +मिरची +कोथिंबीर पेस्ट
1/2चमचा हळद
1चमचा तिखट
जाडे मीठ/ बारीक मीठ
चवीपुरता ओवा
मध्यम आकाराचं मातीचं मडकं
भांबुर्डीचा पाला
लाकडं किंवा गोवऱ्या.

कृती :
1)सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्यावा.
2)चिकनलाहिरवीपेस्ट हळद आणि मीठ लावून 1/2तास मॅरीनेट कार्याला ठेऊन द्यावे
बटाट्याला देखील चिरा पडून त्यात हेय वाटण भरून घ्यावे 3) मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे बटाटे ठेवावीत. नंतर थोडासा ओवा व मीठाची पखरण करावी. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं अगदी काळजीपूर्वक बंद करावं.

* पोपटी लावण्याची पद्धत :
मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा वितभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलटं ठेवावं. (काहीजण तीन विटांवरही मडकं उलटं ठेवतात.) मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्याव्यात. जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं. चोहीबाजूनं लागणाऱ्या जाळामुळं भांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परांत एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती यादरम्यान होत असते. अर्धा-पाऊणतासाने मडक्यावर पाणी मारून पाहावं. ‘चर्र’ असा आवाज झाल्यास पोपटी शिजली असं समजावं.
त्यानंतर मडक्याशेजारील लाकडं, गोवऱ्या बाजूला कराव्यात. त्यावर पाणी मारावं व जाड फडक्यानं मडकं अलगद बाहेर काढावं. लगेचंच आतील पोपटी एका पेपरवरकिंवा परातीत काढून घ्यावी. त्यातला भांबुर्डीचा पाला बाजूला काढून पाणी आणि तेलाशिवाय शिजलेल्या या अनोख्या पदार्थाचा मनमुराद आनंद घ्यावा.

टीप:-
1)वेज पोपटी पण केली जाते त्यासाठी बटाटे ,रताळी,वांगी,कंद आणि वालाच्या शेंगा वापरले जातात
2) जर भांबुर्डी चा पाला नाही मिळाला तर केळीच्या पाना मध्ये चिकन चे तुकडे बांधून ठेवावेत
मडक्यात प्रथम केल्याचे पान ठेवावे त्यावर शेंगा घालाव्यात मग चिकन
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - गाजराची वडी





नमस्कार 


आज आपण बघुया गाजराची वडी

साहित्य:
१/२ किलो गाजर
साखर १ कप
१/२ लिटर दूध
१ वाटी खवा
३ मोठे चमचे तूप
१/४ छोटा चमचा वेलची पूड
१/२ वाटी बदाम, काजू, मनुका
पिस्ताचे काप

कृती:
१)गाजर स्वच्छ धुवून घ्यावे.
साल काढून किसुन घ्यावी व बाजूला करून ठेवावे.
२)जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे व त्यात किसलेले गाजर घालून मंद गॅसवर परतून घ्यावे.
३)साधारणतः १५-२० मिनिटांनी गजराचा रंग बदलू लागेल.
लगेचच दूध घालून गॅस थोडा मोठा करावा व दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहावे.
४)दूध आटले की खवा व वेलची पूड घालावी.
मिश्रण खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
५)दूध व खवा पूर्ण आटल की साखर घालावी.
मिश्रण घट्ट होवून गोळा होवू दयावा.
६)बदाम, काजूचे काप व मनुका घालावे.
७)एका ट्रेला तूप लावून त्यावर हे मिश्रण छान पसरून घ्यावे व साधारण २ तास सेट होण्यासाठी ठेवावे.
८)तुकडे पडून त्यावर पिस्ताचे काप लावून सर्व्ह करा.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - खिमा कटलेट





नमस्कार 


 आज आपण बघुया खिमा कटलेट

साहित्य:-
१/२ किलो मटन खिमा
४-५ कांदे बारीक चिरलेले
१ वाटी उकडलेला मटर
४उकडलेले बटाटे
३-४ हिरवी मिरची
१/२ चमचा लाल तिखट
२चमचे आलं लसूण पेस्ट
१चमचा गरम मसाला पावडर
१चमचा जीरा पावडर
१/२चमचा मिरी पावडर
१ चमचा हळद
१/२ वाटी ब्रेड क्रम
१लिंबाचा रस
२ अंडी
तेल
मीठ

कृती:-
१) कुकर मध्ये खिमा आणि घालून५-६ शिट्या देऊन शिजवून घ्यावा
२) एका पॅन मध्ये कांदा ,आलं लसूण मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे कांदा गुलाबी झाला की त्यात हळद, गरम मसाला ,तिखट, जिरं पावडर, मिरी पावडत,लिंबाचा रस ,मीठ घालून परतून घ्यावे
३) शिजवलेला खिमा , उखडलेला बटाटा आणि मटार घालून परतून घ्यावे १०-१५ मिनिटे परतावे
४)मिश्रण थंड झाले की त्याचे लहान लहान गोळे करावे
५)दुसऱ्या बाजूला अंडी फेटून घ्यावीत . खिम्याचे गोळे अंड्यामध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम मध्ये घोळवून गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यावे .
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - भरलेले पापलेट






नमस्कार,


आज आपब बघुया भरलेले पापलेट

साहित्यः
२ मध्यम आकाराची पापलेट,
१/२ नारळाचा चव,
३ हिरव्या मिरच्या,
पाव चमचा हळद,
१० लसूण पाकळ्या,
थोडेसे आले,थोडासा पुदिना
थोडीशी चिरलेली कोथिंबीर,
१/२ लिंबाचा रस,
१/२ वाटी तांद्ळाचे पीठ
तेल.

कृती:
१)पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.
वरूनही आड्व्या चिर्‍या द्याव्यात.
२)नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.
३)हलक्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून तेलात तळुन घ्यावे.


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती -वांग्याचे भरीत




नमस्कार 

आज आपण बघुया वांग्याचे भरीत

साहित्य:
१ मोठे वांगे
२ मध्यम कांदे, बारीक चिरलेले
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरलेला
फोडणीसाठी:
२ चमचे तेल
२ चिमटी मोहोरी
१/२ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
१/४ चमचा लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरलेले
मीठ
कोथिंबीर

कृती:
१) वांग्याला थोडं तेल लावून वांग भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मटारची करंजी




नमस्कार,


आज आपण बघूया

साहित्य:
आवरणासाठी
१ वाटी मैदा
दिड चमचा रवा
२-३ चमचे तेल
मीठ
सारणासाठी:
२ वाटी मटार
२ लहान बटाटे
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी:
३ चमचे तेल, १/२ चमचा जिरे, चिमुटभर हिंग, १/२ चमचा हळद
३-४ पाने कढीपत्ता (चिरून घ्यावा)
२ लसूण पाकळ्या बारीक चिरून
१ लहान चमचा मिरपूड
कोथिंबीर
मीठ
तळणासाठी तेल

कृती:
१) आवरणासाठी मैदा आणि रवा एकत्र करावे. तेल कडकडीत तापवून मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे व पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. मटाराची भाजी होईस्तोवर झाकून ठेवावे.
२) बटाटे सोलून लहान लहान फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि मिरच्या घालून काही सेकंद परतावे. त्यात चिरलेला बटाटा घालावा, मिठ घालावे व ढवळावे. २-३ मिनीटे वाफ काढून मटार घालावेत. वाफ काढावी. मध्ये मध्ये ढवळत राहावे. हि भाजी सुकी झाली पाहिजे.कोथिंबीर घालावी
३) भाजी शिजत आली कि त्यात थोडी मिरपूड घालावी आणि मटार व बटाटा मॅश करून घ्यावेत म्हणजे सारण एकजीव होईल.
४) भाजी झाली कि आवरणासाठीचे पिठ घ्यावे त्याचे सुपारी एवढे गोळे करावे. त्याच्या पुर्या लाटून सारण अर्ध्या गोलावर १ चमचा सारण ठेवावे. पुर्या अगदी पातळ लाटू नयेत. त्याबाजूच्या कडा मोकळ्या ठेवाव्यात. दुसरी अर्धी बाजू सारणावर आणून कडा चिकटवाव्यात. कातणाने जास्तीची कड काढून घ्यावी. जर कातण नसेल तर सुरीने अलगदपणे कडा काढून टाकाव्यात व कड एकदा चेपून घ्यावी. फरक फक्त एवढाच कि कातणामुळे करंज्या सुबक दिसतात.
५) कढईत तेल गरम करून करंज्या गोल्डन ब्राऊन तळून काढाव्यात. 







मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - नागपुरी पुडाची वडी





नमस्कार,


आज आपण बघुया नागपुरी पुडाची वडी

साहित्य:
आवरणासाठी:
१/२ वाटी मैदा
१/२ वाटी बेसन
२ चमचे धणे-जिरेपूड
१ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
२ चमचे तेल
सारण:
१ चमचा खसखस, भाजून पूड
१ मध्यम कांदा, बारीक चिरलेला
५ -६लसूण + १ इंच आले +४- ५ मिरच्या सर्व ठेचून घेणे
१/२ वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, भाजून चुरडून घ्यावे.
४कोथिंबीरच्या जुड्या, निवडून धुवून घ्यावी. (निवडल्यावर साधारण३ते ३ १/२ वाटी)
चवीपुरते मिठ
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धणेपूड
१ चमचा लाल तिखट
१ चमचा तेल
तेलाचे मिश्रण:
१ चमचा तेल + १ चमचा गोडा मसाला

कृती:
१) कोथिंबीर निवडून धुवून पंच्यावर पसरून पूर्ण कोरडी होवू द्यावी नाहीतर वड्या लगेच मऊ पडतात. कोथिंबीर कोरडी झाली कि बारीक चिरून घ्यावी.
२) कांदा १ चमचा तेलात खरपूस परतून घ्यावा. ताटात कोथिंबीर, परतलेला कांदा, खसखसपूड, तिखट, धणे-जिरेपूड, आले-लसूण-मिरचीचा ठेचा असे सर्व एकत्र करून सारण तयार करावे.
३) मैदा आणि बेसन एकत्र करावे. त्यात धणे-जिरेपूड, तिखट, हळद, आणि २ चमचे गरम तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मिठ घालून पाण्याने घट्ट मळून घ्यावे. ३० मिनीटे झाकून ठेवावे.
४) मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून अंडाकृती आकारात पातळ लाटून घ्या. गोडामसाल्याचे मिश्रण थोडेसे मध्यभागी लावून त्यावर साधारण २ चमचे सारण लांबट आणि त्रिकोणी आकारात चेपून ठेवावे. दोन्ही मोठ्या बाजू एकावर एक अशा ठेवून चिकटवाव्यात. नंतर छोट्या बाजू फोल्ड कराव्यात. व्यवस्थित बांधून घ्यावी नाहीतर तळताना उंडा सुटून सारण बाहेर येईल.
५) तेल गरम करून मंद आचेवर उंडे खरपूस तळून घ्यावे. कापून गरमा-गरम सर्व्ह करावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - तिळाचे लाडू





नमस्कार 

आज आपण बघुया तिळाचे लाडू
तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!

साहित्य:
१/२ किलो तिळ( पॉलिश/ साधे)
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप

कृती:
१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टीप:
१) लाडूंमध्ये आवडत असल्यास काजूतुकडा किंवा इतर सुकामेवा घालू शकतो.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पालक वडी





नमस्कार 


 आज आपण बघुया पालक वडी

साहित्य :
एक जुडी पालक
१ वाटी बेसन
१/२ वाटी तांदळाचे पीठ
१/२ वाटी खोबरं
७ते ८ लसणाच्या पाकळ्या
५ते ६ हिरव्या मिरच्या
थोडं आलं
कोथिंबीर
१/२ चमचा हळद
लाल मिरची पावडर
१/२ चमचा तीळ
तेल
मीठ

कृती :
१)पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं व कोथिंबीर यांचं वाटण तयार करावं. २)चिरलेल्या पालकामध्ये ३ ते ४ चमचे तयार केलेलं वाटण, हळद, लाल मिरची पावडर ,थोडे तीळ व थोडं तेल घालावं. त्यात नंतर मावेल तेवढं चणा डाळीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं एकत्र करा.
३)त्याचे कणकेसारखे लांबट आकाराचे गोळे करा.
४)स्टीलच्या चाळणीला आतून तेल लावून गोळे त्यात ठेवावे. ५)एका गंजात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून १०-१५ मिनिटे हे गोळे वाफवून घ्यावे.
६)त्यानंतर गॅसवरुन उतरवून ते थंड झाल्यावर त्याचे गोल आकारात काप करून तेलात तळावे किंवा परतावे.वरून थोडे तीळ घालावे .
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - तिळाच्या वड्या


 


नमस्कार 



 आज आपण बघुया तिळाच्या वड्या

साहित्य:
१/२ वाटी शेंगदाण्याचा कूट
१/२ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी तिळ
पाऊण वाटी किसलेला गूळ
१/२ चमचा तूप
१/२ चमचा वेलचीपूड

कृती:
१) तिळ मध्यम आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवावे. तिळाची पूड करू नये, तिळ अर्धवट मोडले गेले पाहिजेत.
२) वड्या करण्यापुर्वी दोन स्टीलच्या ताटांना तूपाचा हात लावून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करावे. त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. लगेच त्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत आणि भराभर मिक्स करावे. लगेच वेलचीपूड घालावी . आणि एकजीव करून हे दाटसर मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालून थापावे. मिश्रण गरम असल्याने थापण्यासाठी एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून त्याने थापावे.
३) मिश्रण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.


 
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/