postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - तिळाचे लाडू





नमस्कार 

आज आपण बघुया तिळाचे लाडू
तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!

साहित्य:
१/२ किलो तिळ( पॉलिश/ साधे)
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप

कृती:
१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टीप:
१) लाडूंमध्ये आवडत असल्यास काजूतुकडा किंवा इतर सुकामेवा घालू शकतो.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment