postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मुशी मसाला





नमस्कार 

आज आपण बघुया मोरी मसाला /मुशीचे मसाला .
बेबी शार्क म्हणजेच मुशी किंवा मोरी असं या मशाल बोललं जाते

साहित्य :-
२-३ मुशी साफ करून बारीक तुकडे केलेले
१/२ वाटी नारळ
२ मोठेे कांदे
(१- १/२ उभा चिरलेला वाटाणा साठी आणि १/२ फोडणीसाठी)
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ वाटी कोथिंबीर
५-६ लसूण पाकळी
१/२ इंच आल्याचा तुकडा
१/२ चमचा आलं
२-३चमचे मालवणी मसाला
१चमचा धणे
३-४कोकम
पाणी
तेल

कृती:-
१) मुशी २-३ पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावी त्याला थोडं मीठ,हळद आणि मसाला लावून १०-१५ मिनिटे मुरत ठेवावे
२) एका पॅन मध्ये १ चमचा तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर होइपर्यंत भाजा त्यात खोबरं घालून चांगलं खरपूस भाजून घ्यावे त्यात धणे घालावे आणि थोडं पाणी घालून वाटून घ्यावे
३)मिरच्या,लसूण ,आलं आणि कोथिंबीरीच हिरवं वाटण करून घ्यावे
४) एका भांड्यात २-३ चमचे तेल घ्यावे त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा तो लाल झाला की त्यात हिरवं वाटण घालावं आणि परतुन घ्यावं
५)मालवणी मसाला आणि हळद घालावी आणि परतावे
आणि लगेच खोबऱ्याचे वाटण घालावे आणि पालटून घ्यावे त्या मुशी आणि पाणी घालावे
साधारण एक उकळी आलीकी त्यात कोकम आणि मीठ घालावे मुशी चांगली शिजून द्यावी

टीप:-
१) मुशी ३-४ पाण्यातून स्वच्छ धुवून काढावी नाहीतर त्याला वैस वास येतो
२)मीठ घालताना पहिलं जरा कमी घाला करण आपण मुशीला पण मीठ लावलेलं आहे
३)मालवणी मसाला नसेल तर २चमचे लाल तिखट+१ चमचा गरम मसाला घ्यावा.




मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment