postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - सुकट वांग बटाटा





नमस्कार 


आज आपण बघुया सुकट वांग बटाटा

साहित्य:
१/२ वाटी सुकट / सुका जवळा
२कांदे बारीक चिरलेले
७- ८ पाकळ्या ठेचलेला लसूण
१वांग्याच्या मध्यम फोडी
१ बटाटाच्या मध्यम फोडी
३ चमचे मालवणी मसाला
१/२ चमचा हळद
३-४ कोकम
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
मीठ
पाणी

कृती:
१)सुकट निवडून व्यवस्थित धुवा आणि १५ मिनीटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि वापरण्यापूर्वी घट्ट दाबून पिळुन पाणी काढुन टाका.
२)पॅनमध्ये किंव्हा छोट्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण व कांदा घालून गुलाबी रंगावर परतावे.
त्यात हळद घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मसाला व घट्ट दाबून पिळुन घेतलेली सुकट टाका आणि जरा वेळ परता.
३)त्यात वांगी, बटाटा, मीठ आणि कोकम टाका.
ज्या प्रमाणात रस्सा हवा त्यानुसार थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करावे आणि कुकरच्या १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. बाहेर शिजवणार असाल तर बटाटा शिजल्यावरच कोकम टाकावे.
वरून कोथिंबीर घालावी

टीप:
१)जर हि सुकट कुकरमध्ये करणार नसाल तर वांग-बटाटा शिजत आल्यावरच कोकम किंव्हा इतर आंबट घाला. नाहीतर बटाटा शिजणार नाही.
२)या भाजीत कच्चे/हिरवे टोमॅटो पण यात छान लागतात.
येथे मी सुकट वापरली आहे परंतु आम्ही अश्या प्रकारचा रस्सा सुकट, अंबाडीची सुकट, सोडे किंव्हा ताजी कोलंबी वापरून सुद्धा करू शकतो.
३)सुकट वांगी, घेवडा, वाल पापडी, कांद्याची पात, बारीक मेथी इत्यादी भाज्या घालून केली जाते.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment