postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मसूर ची बिर्याणी






नमस्कार 

आज आपण बघुया मसूर ची बिर्याणी

साहित्य:
::भातासाठी ::
दिड पेला बासमती तांदूळ
३ पेले गरम पाणी
१ चक्री फूल
२ तमालपत्र
2 लवंगा
१ चमचा तूप
१/२चमचा मिठ
::मसूर ग्रेवी ::
१/२ वाटी मसूर
१ चमचा तूप
२ वेलची
२-३ काळी मिरी
१/४ चमचा हळद
१ चमचा लाल काश्मिरी तिखट
१ बारीक चिरलेला कांदा
२ चमचे आलं लसूण पेस्ट
१/२ वाटी दही
१ १/२ चमचा धणेजिरंपूड
१ चमचा गरम मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) मसूर रात्रभर किंवा ७ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवावे. कूकरमध्ये १ शिट्टी करून मसूर पाणी ना घालता शिजवून घ्यावे. शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वेलची आणि मिरी घालावी आणि परतावे. हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईतोवर परतावे.
३) आता शिजलेले मसूर आणि १/२ पेला पाणी घालावे. थोडेसेच मिठ घालावे कारण आधी मसूर शिजताना मिठ घातले होते. थोडा वेळ शिजू द्यावे. आता गरम मसाला, धणे-जिरेपूड घालून एकजीव करावे. चव पाहून गरजेनुसार मसाला घालावा. गॅसवरून बाजूला काढावे. ही ग्रेव्ही घट्टसरच असावी कारण थंड झाल्यावर यात नंतर दही घालायचे आहे.
४) ग्रेव्ही जरा गार झाली की त्यात घोटलेले दही घालून निट मिकस करावे. लागल्यास थोडे मिठ घालावे.
५) बासमती तांदूळ १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर पाणी काढून टाकावे आणि तांदूळ २० मिनिट्स निथळत ठेवावा.
६) एक मिडीयम पॅन गरम करावा. त्यात तूप घालून वितळू द्यावे. चक्री फुल, तमालपत्र, आणि लवंगा घालून परतावे. निथळलेला तांदूळ घालून चांगला कोरडा होईस्तोवर परतावे.
७) तांदूळ चांगला परतला गेला की गरम पाणी घालून ढवळून झाकण न ठेवता मोठ्या आचेवर उकळू द्यावे. भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच लहान करावी आणि झाकण ठेवून भाताला वाफ काढावी. भात नीट शिजू द्यावा.
शिजलेला भात थोडावेळ तसाच ठेवावा. कारण गरम भातात ग्रेव्ही मिक्स केली तर भाताची शीते मोडतील.
८) थोडे तूप घालून मिक्स करावे. आणि १० मिनीटे एकदम मंद आचेवर झाकण ठेवून भात गरम होऊ द्यावा.

टीप :-
१) तांदूळ मोठ्या आचेवर ६ ते ८ मिनीटे भाजल्याने भात मोकळा होतो.
२) जर मसूर भिजावायला जास्त वेळ नसेल तर २ तास एकदम गरम पाण्यात मसूर भिजवावेत.
३) तूप जर कमी वापरायचे असल्यास ग्रेव्ही तेलात बनवावी आणि शेवटी जे तूप घालायचे आहे ते घालू नये.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment