postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मटण पाय सूप





नमस्कार 


 आज आपण बघुया मटण पाय सूप

साहित्य:-
बोकडाच्या पायाचे साफ केलेले तुकडे १५-२० (धुवून)
२ मध्यम आकाराचे कांदे चिरलेले
१ लसुणाचा कांदा सोलून ठेचून.
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
८-१० काळी मिरी
५-६ दालचीनीचे छोटे तुकडे
३-४ तमालपत्र
२ मोठे चमचे तेल/ तूप
गरजेनुसार पाणी
मीठ

कृती:-
१) पाय स्वच्छ धुवून घ्या
२) कुकरमध्ये तेल /तूप चांगले गरम करून त्यावर वरील गरम मसाले व लसुण टाकुन फोडणी द्या.
३) त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर शिजवा. शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद व जर तिखट हवे असेल तर तिखट किंवा मिरची कोथिंबीर पेस्ट टाका. (मी टाकलेली नाही लहान मुलांना प्यायचे असल्याने.)
४)पायाचे तुकडे टाका, मीठ टाका. सर्व ढवळून त्यावर गरजेनुसार पाणी घाला.
५)कुकरचे झाकण बंद करुन पहिली शिट्टी आल्यावर गॅस मंद करुन साधारण पाऊण तास तरी शिजवत ठेवा.
६)पाया शिजायला वेळ लागतो. म्हणून टोपात न शिजवता सरळ कुकरमध्येच शिजवा. शिट्टी गेल्यावर गरमागरमच सर्व्ह करा.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment