postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - खजुराचे लाडू






नमस्कार  

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
गोड तिखट तेलकट आणि तुपकट या फराळाच्या चवीचा आस्वाद ज्यांची पथ्य पाणी चालू आहे त्यांना घेता येत नाही म्हणूनच आजची रेसिपी खास पथ्यकरणाऱ्यांसाठी आहे आणि लहान मोठ्यानं ही आवडेल अशी झटपट शुगर फ्री रेसिपी खजुराचे लाडू



साहित्य:
१ वाटी खजूर बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर काढून घेणे)
१/२ वाटी बदाम,पिस्ता,काजू भरड काढलेली
१/२ वाटी किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
१ चमचा तूप
१ चमचा खसखस

कृती:
१) खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, पिस्ता, काजू,खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
२)सगळे मिश्रण एकजीव झाले कि ताटात काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.
शक्यतो लाडूचा आकार लहान असावा.कारण खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

टीपा:
१) साध्या खजूराप्रमाणेच काळ्या खजूराचेही अशाप्रकारे लाडू करू शकतो.
२)लाडूच्या ऐवजी त्याचे रोल पण करू शकतो
३) तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

No comments:

Post a Comment