postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - रवा डोसा






नमस्कार 


आज आपण बघुया झटपट रवा डोसा कसा बनवायचा

साहित्य:-
१ वाटी बारीक रवा
१ वाटी तांदळाची पिठी
१ वाटी मैदा
१ वाटी आंबट दही
तेल
मीठ

कृती:-
१)डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.
२)त्यात २ चमचे कडकडीत तेलाचे मोहन आणि चवीला मिठ घालावे.
३)डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment