postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - भोपळ्याचे भरीत




नमस्कार,



आज आपण बघुया भोपळ्याचे भरीत

साहित्य:
पाव किलो लाल भोपळ्याच्या मध्यम फोडी (साल काढून)
१/२ चमचा तूप
१/२ चमचा जिरे
३ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
१/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
५-६ पाने कडीपत्ता
१पेला दही
मिठ
साखर

कृती:
१) भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर चमच्याने मॅश करून घ्याव्यात. खुप गुठळ्या राहू देवू नये.
२) लहान कढईत तूप गरम करावे. तूप गरम झाले कि जिरे,कडीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळा त्यात घालावा.आणि गॅस बंद करावा चवीनुसार मिठ आणि किंचीत साखर घालावी. दही आणि कोथिंबीर घालून निट एकजीव करावे.

टीप:
१) हे भरीत उपवासालाही चालते. उपवासाव्यतिरिक्त दिवशी फोडणीत हळद, हिंग, राई घातली तरी चालते.
२) शेंगदाण्याचा कूट घातल्यास चव छान येते.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment