postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - पुरणाच्या करंज्या




नमस्कार 


आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार . ह्या दिवशी देवीला वरणा पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो.आज आपण पुरणाची एक गोड पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे
पुरणाच्या करंज्या
त्याच बरोबर आजची आपली ही १०० रेसिपी आहे.
तुमच्या उदंड प्रतिसाद बद्दल मी तुमची खूप आभारी आहे .
चला तर बघुया पुरणाच्या करंज्या
साहित्य:
१ वाटी पुरण (पुरणपोळीला करतो तसेच पुरण)
१ वाटी गव्हाचे पीठ (कणिक)
२ चमचे तेल
तेल किंवा तूप तळण्यासाठी
चिमूटभर मीठ

कृती:
१) पुरण बनवण्यासाठी चणाडाळ कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळून टाकावे. या पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
२) पुरण बनवायला जेवढी चणाडाळ घेतली असेल तेवढाच गुळ घ्यावा, गोड जास्त हवे असेल तर २ चमचे गुळ जास्त घालावा. शिजलेली डाळ गरम असतानाच त्यात गुळ घालावा. आणि घट्ट होईस्तोवर पुरण ढवळावे. १/२ चमचा वेलची पूड आणि २ चिमटी जायफळ पूड घालावी.
३) २ चमचे गरम तेल गव्हाच्या पिठात घालावे. त्यात १ चिमटी मीठ घालावे. पाणी घालून घट्टसर माळून घ्यावे. पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) पीठाचे १ इंचाचे गोळे करावे. गोळे लाटून त्यात मध्यभागी पुरण ठेवावे. कडा जोडून करंजी बनवावी. कातण्याने कडा कापून घ्याव्यात. करंज्या घट्ट पिळलेल्या सुती कपड्याखाली झाकाव्यात. अशाप्रकारे सर्व करंज्या करून तुपात तळून घ्याव्यात.
करंज्या गरमच छान लागतात. वाढताना चमचाभर पातळ तुप घालावे.



वैभव जगताप
https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment