postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मुगाची खिचडी




नमस्कार 

आज आपण बघुया मुगाची खिचडी कशी बनवायची

साहित्य'-
१ पेला तांदूळ
१/२ वाटी मूग डाळ
३पेले गरम पाणी
फोडणीसाठी:-
१/२छोटा चमचा राई
१/४ चमचे जिरे
१ चिमूटभर हिंग
१/४ चमचा हळद
१/४ चमचा लाल तिखट
१/२ वाटी मटार
१ चमचा गोडा मसाला
पाणी
तूप
मिठ
तेल

कृती:
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
२) लहान कूकरमध्ये किंवा पातेल्यात तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि तिखट घालून फोडणी करावी. नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
३) डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी. लागल्यास मिठ, किंवा लाल तिखट घालावे.
४) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
खिचडीवर १ चमचा तूप घालावे.

टीप:
१) मूगाच्या पिवळ्या डाळीऐवजी, मूगाची सालासकट डाळ किंवा तूरडाळ, मसूर डाळही वापरता येते.
२)खिचडी जर मऊ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे व फडफडीत हवी असल्यास किंचीत कमी करावे.
३) तांदूळ चांगले भाजल्याने खिचडीचा गोळा होत नाही आणि शितं वेगवेगळी राहतात. भाजताना फक्त ते जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) मटारऐवजी बटाटा, फ्लॉवर, भोपळी मिरची, कांदा, गाजर इत्यादी घालू शकतो.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment