postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - मुगाचे कढण




नमस्कार 

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा आज आपण बघुया मुगाचे कढण

साहित्य:-
१मोठी वाटी मूग डाळ
१वाटी गुळ
१/२चमचा वेलची पूड
१/२वाटी काजू तुकडा
१पेला नारळाचे जाड दूध
पाणी
कणभर मीठ

कृती:-
१) एका पातेल्यात ५-६पेले पाणी तापत ठेवा
२) दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात मुगाची डाळ भाजून घ्या .डाळीचा रंग बदलला की त्यात गरम पाणी घाला आणि डाळ चांगली शिजू दया.(पूर्ण डाळ शिजवायची नाही डाळ अख्खी दिसली पाहिजे)
३) त्यात गुळ घाला .गुळ विरघळला की त्यात वेलचीपूड,काजू तुकडा आणि कणभर मीठ घाला आणि चांगली उकळी येऊद्या
जर डाळ घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घाला
४) छान उकळल्यावर त्यात नारळाचे दूध घालावे
आणि मिश्रण चांगले एकजीव करावे आणि परत एक उकळी येऊ द्या.

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment