postbox media

Showing posts with label #खाद्यसंस्कृती #नारळाच्या वड्या# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts
Showing posts with label #खाद्यसंस्कृती #नारळाच्या वड्या# सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक. Show all posts

Friday, 27 September 2019

खाद्यसंस्कृती - नारळाच्या वड्या



नमस्कार,

सन आयलय गो नारली पुनवे चा
मनी आनंद मायेना आगरी-कोल्यानच्या दुनियेला...
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबांधनाच्या शुभेच्छा💐💐
नारळी भात तर आपण अगोदर बघितलाच आहे आज आपण नारळी पौर्णिमा साठी खास पदार्थ बघणार आहोत, नारळाच्या वड्या

साहित्य:
१ खवलेला नारळ ( पांढरे खोबरे घेणे)
२ वाट्या साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) कढईमध्ये २ ते ३ चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.

२) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा. ४-५ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल त्यात अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागेल.

३) एका ताटाला तूप लावून घ्यावे आणि त्यात हे मिश्रण ओतावे आणि पसरून घ्यावे थोडं जाडसर पसरावे .

७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात.

टिप:
१) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.




 वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com