postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - मटारची करंजी




नमस्कार,


आज आपण बघूया

साहित्य:
आवरणासाठी
१ वाटी मैदा
दिड चमचा रवा
२-३ चमचे तेल
मीठ
सारणासाठी:
२ वाटी मटार
२ लहान बटाटे
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी:
३ चमचे तेल, १/२ चमचा जिरे, चिमुटभर हिंग, १/२ चमचा हळद
३-४ पाने कढीपत्ता (चिरून घ्यावा)
२ लसूण पाकळ्या बारीक चिरून
१ लहान चमचा मिरपूड
कोथिंबीर
मीठ
तळणासाठी तेल

कृती:
१) आवरणासाठी मैदा आणि रवा एकत्र करावे. तेल कडकडीत तापवून मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे व पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. मटाराची भाजी होईस्तोवर झाकून ठेवावे.
२) बटाटे सोलून लहान लहान फोडी कराव्यात. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि मिरच्या घालून काही सेकंद परतावे. त्यात चिरलेला बटाटा घालावा, मिठ घालावे व ढवळावे. २-३ मिनीटे वाफ काढून मटार घालावेत. वाफ काढावी. मध्ये मध्ये ढवळत राहावे. हि भाजी सुकी झाली पाहिजे.कोथिंबीर घालावी
३) भाजी शिजत आली कि त्यात थोडी मिरपूड घालावी आणि मटार व बटाटा मॅश करून घ्यावेत म्हणजे सारण एकजीव होईल.
४) भाजी झाली कि आवरणासाठीचे पिठ घ्यावे त्याचे सुपारी एवढे गोळे करावे. त्याच्या पुर्या लाटून सारण अर्ध्या गोलावर १ चमचा सारण ठेवावे. पुर्या अगदी पातळ लाटू नयेत. त्याबाजूच्या कडा मोकळ्या ठेवाव्यात. दुसरी अर्धी बाजू सारणावर आणून कडा चिकटवाव्यात. कातणाने जास्तीची कड काढून घ्यावी. जर कातण नसेल तर सुरीने अलगदपणे कडा काढून टाकाव्यात व कड एकदा चेपून घ्यावी. फरक फक्त एवढाच कि कातणामुळे करंज्या सुबक दिसतात.
५) कढईत तेल गरम करून करंज्या गोल्डन ब्राऊन तळून काढाव्यात. 







मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment