postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - चिकन बिर्याणी




नमस्कार,
 

आज आपण बिर्याणी स्पेशल रेसिपी मध्येये बघुया चिकन बिर्याणी

साहित्य :-
१/२ किलो चिकन
★मॅरीनेट करण्यासाठी-
२ चमचे दही+ १ चमचा सोया सॉस+ १" आले,४ -५ लसूण पाकळ्या,२ हिरव्या मिरच्या यांची पेस्ट
( सगळा मसाला लावून चिकन २ -३ तास आधी मॅरीनेट करून ठेवा.)
★भातासाठी-
१ १/२ पेला बासमती तांदूळ
३ पेले पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलदोडे, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी)
★चिकनच्या ग्रेवीसाठी -
१ १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ १/२ चमचा लाल तिखट
१ तमालपत्र
★मसाला वाटण १ :- १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, खसखस
★मसाला वाटण २ :- १ चमचा धने, १ चमचा शहाजिरे / जिरे, ३-४ लवंगा, ५-६ काळी मिरी, १" दालचिनीचा तुकडा
तळण्यासाठी- १ कप उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू,
तेल
मीठ चवीप्रमाणे
केवडा इसेन्स (optional )
केशर चिमुटभर आणि ४ चमचे दुध (optional)

कृती :
१)सर्व प्रथम तांदूळ १० मिनिटे आधी धुवून ठेवा.
एका पातेल्यात 3 चमचे तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट (इथे 3 पेले) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.
२) भात पूर्ण शिजला कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे.चमच्याने भात वर खाली करा म्हणजे भाताचे शीत मोडणार नाही. आणि भात छान मोकळा होईल.
३)एकीकडे कढईत पुरेसे तेल गरम करा. तेलात काजू तळून घ्या. काजू लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
४)नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत टाळून घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर चिकनच्या ग्रेवीसाठी त्याच्यातच ठेवून द्या.
५)खसखस गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे ती शिजेल.
६)मसाला वाटण no.१ मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
७) मसाला वाटण no.२ ची बारीक पावडर करून घ्या.
( रेडीमेड गरम मसाला पावडर १/४ च. वापरली तरी चालेल.)
८)उरलेल्या तळणीच्या तेलात तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
९) मग मसाला वाटण no.१ घालून परता. खमंग वास सुटला कि. मसाला वाटण no.२ घालून परता.
१०)१-२ मिनिटे परतल्यावर हळद,१ चमचा लाल तिखट , मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
११)मग मॅरीनेट केलेले चिकन घालून २-३ मिनिटे परता. झाकण ठेवून १ वाफ काढा.
१२) १ १/४ पेले पाणी घाला. वरून झाकण ठेऊन चिकन छान शिजू द्या.
१३)चिकनची ग्रेवी तयार झाली कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. १ चमचा कोमट दुधात केशर खलून ठेवा.
१४)नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात सर्वात खाली भाताचा थोडा जाड थर करा.त्यावर तळलेला कांदा, काजू घाला. वरती थोडी चिकनची ग्रेवी घाला. मग परत भाताचा थर.वरती कांदा, काजू वरती चिकनच्या ग्रेवीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काज,कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालून सजवा
१५)थरांना चमच्याच्या दांड्याने वेगवेगळ्या जागी ३-४ छोटी भोकं पाडा.
त्यातून केशरी दुध आणि १ झाकण केवडा इसेन्स घाला.
१६)भोक बुजवा आणि झाकण ठेऊन १-२ वाफा काढा.
१७)बिर्याणी उभा डाव घालून थर न मोडता रायत्या सोबत सर्व्ह करा .


 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment