postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - डाळ पालक




नमस्कार 


आज आपण बघुया डाळ पालक

साहित्य:
१ जुडी पालक
१/२ वाटी तुरीची डाळ
१ मध्यम बारीक चिरलेला कांदा
१टोमॅटो बारीक चिरलेला
५-६ लसूण पाकळ्या चिरून
१ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धनेपूड
१/२ चमचा जिरेपूड
तेल

कृती:
१)कुकरमध्ये पाणी घालून डाळ शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ घोटून घ्या. पालक बारीक चिरून ठेवा.
२)पातेल्यात चमचे तेल गरम करा. लसूण फोडणीला घाला. कांदा परतून घ्या.
३)२-३ मिनिटे कांदा परता मग त्यात हळद, लाल तिखट ,धने-जिरेपूड घालून परता.
४) घोटलेली डाळ घाला. मीठ, साखर आणि टोमॅटो घालून ढवळा.
५) डाळ खूप जाड असेल तर थोडेसे पाणी घालून पात्तळ करा.
३-४ मिनिटे उकळत ठेवा.
६)चिरलेला पालक घालून ढवळा. २-३ मिनिटे उकळा.
७) गरम गरम डाल पालक भातावर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

टीप :
आंबट पणा येण्यासाठी आमचूर पावडर किंवा चिंच घातली तरी चालेल. पालक कुकरमध्ये डाळीबरोबर शिजवल्यास किंवा सर्वात आधी घातल्यास पालकाचा हिरवा रंग बदलतो आणि त्यातली जीवनसत्त्वं कमी होतात. डाळ-पालक जेवायच्या खूप आधी करून ठेवले तर न झाकता तसेच ठेवा. म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment