postbox media

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - पालक राईस





नमस्कार 

आज आपण बघुया पालक राईस

साहित्य:
३/४ पेला बासमती तांदूळ
१ जुडी बारीक चिरलेली पालकाची पाने
१/२ पेला पाणी
३/४ पेला गरम पाणी
१ चमचा बटर
१ चमचा बारीक चिरलेले आले
१ चमचा बारीक चिरलेले लसूण
१ बारीक चिरलेला कांदा
१ लहान हिरवी मिरची
आख्खे गरम मसाले - २ तमालप्रत्र, १ हिरवी वेलची, २ लवंगा
चवीपुरते मिठ

कृती:
१) तांदूळ साध्या पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवावा. १० मिनीटांनी पाणी काढून टाकावे. आणि हा तांदूळ १० मिनीटे निथळत ठेवावा.
२) १/२ पेला साधं पाणी आणि पालक एकत्र करून बारीक प्युरी करून घ्यावी.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये १ चमचा बटर किंवा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि आख्खे मसाले घालावे. ५ ते १० सेकंद परतून आले-लसूण आणि मिरची घालावी. कांदा घालून परतावा.
४) निथळत ठेवलेला तांदूळ आता घालून व्यवस्थित कोरडा होईस्तोवर परतावा. सतत परतत राहा म्हणजे तांदूळ जळणार नाही. तांदूळ पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजला गेला पाहिजे.
५) ३/४ कप गरम पाणी, मिठ आणि पालकाची प्युरी घालून मोठ्या आचेवर भात शिजू द्यावा. भाताच्या पृष्ठभागावर (सरफेस) पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच मिडीयम आणि लो च्यामध्यावर ठेवावी आणि पॅनवर झाकण ठेवावे. साधारण १० मिनीटे वाफ काढावी.

टीपा:
१) भात अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मटार, गाजर, फरसबी अशा भाज्याही घालू शकतो.त्याच प्रमाणे काजूपं घालू शकतो.
२) तांदूळ चांगला भाजला गेल्याने भात मोकळा होतो. तसेच भात मोकळा होण्यासाठी गरम पाणी वापरावे.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

No comments:

Post a Comment