postbox media

Saturday 28 September 2019

खाद्यसंस्कृती - उकडीचे मोदक



https://www.aapalimayra.blogspot.com/






नमस्कार



उकडीचे मोदक

उदया आपल्या घरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे .
बाप्पाला मोदक हे खूप प्रिय आहेत तर,आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक.

साहित्य:-
१खवलेला नारळ
१ वाटी गुळ
२-३ वाट्या तांदुळाची पीठ (बासमती / आंबेमोहोर)
१चमचा वेलची पूड
१/२ चमचा जायफळाची पूड
१ चमचा तूप
तेल
पाणी

कृती:-
१) एका भांड्यात २वाट्या पाणी घालून उकळून घ्यावे त्यात १/२ चमचा तेल किंवा तूप घालावे नंतर तांदळाचे पीठ घालून हलक्या हाताने पीठ एकत्र करून घ्यावे . भांड्यावर झाकण ठेवून ऐक वाफ काढावी
२) दुसऱ्या बाजूला एक कढईत १चमचा तूप घालावे .
तूप वितळले की त्यात खोबरं आणि गूळ घालावे आणि मंद आचेवर सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे .
३) गूळ वितळला की गॅस बंद करावा (मिश्रण कोरडे करूनये आणि खोबरं पण करपवू नये )
त्यात वेलची आणि जायफळ पूड घालावी .
४) उकड काढलेलं पीठ परातीत घेऊन त्यातली थोडी वाफ निघून गेल्यावर थोडं तेल आणि पाणी घालून चांगला मळून घ्या. (पिठाचे गुठळ्या राहता कामा नये).
५) पिठाचा मध्यम आकाराच्या एक गोळा घेऊन त्याची पारी करावी. त्यात चमचाभर सारण घालून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सगळ्या चुण्या एकत्र करून मोदक बंद करावा.
६) मोदक पात्रात थोडे पाणी घ्यावे त्यावर चाळणी ठेवुन त्यावर एक सुती कपडा किंवा केळीचे पान ठेवावे त्यावर मोदक सुटसुटीत ठेवावे ,एकावर एक ठेऊ नये .
७) मोदक पत्रावर झाकण ठेऊन १५ मिनिटे वाफवावे.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/ 




#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment