postbox media

Saturday 28 September 2019

खाद्यसंस्कृती - वालाचे बिरडं




नमस्कार




आज श्रावणातील शेवटचा शनिवार आज ची आपली खास रेसिपी आहे वालाचे बिरडं . सणासुवरी किंवा कोणत्याही शुभकार्यात जेवण बिरड्याशिवाय अपूर्णच .

पूर्वतयारी:
बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मूग या कडधान्यापासून बिरड केली जातात. पण सगळ्यात लोकप्रिय आहे ते "वालाचे बिरडे". कडवे वाल हे बिरड्यासाठी उत्तम समझले जातात.
दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा जर बिरडे शनिवारी करायचे असेल तर गुरुवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
साधारण वाल रात्रभर कोमट पाण्यात किंवा १०तास तरी भिजत ठेवावे.
सकाळी पाणी काढून टाकून धुवून घ्यावे. वाल एका
सुती कापडात बांधून ठेवावे. हे गाठोडं एका भांड्यात किंवा डब्यात ठेऊन उबदार जागी ठेवावे .वालाला मोड येण्यासाठी साधारण १८ ते २० तास लागतात. (उष्ण हवामान असेल तर लवकर मोड येतात आणि थंड हवामान असेल तर मोड यायला वेळ लागतो. )
मोड आलेले वाल सोलण्याच्या वेळी त्यात कोमट पाणी घालावे म्हणजे ते पटापट सोलले जातात .बोटाच्या चिमटीत दाबून साले काढावीत.

साहित्य:
२ वाटी मोड आणून सोललेले वाल
१/२वाटी खवलेला नारळ
१चमचा जिरं
१/२चमचा राई
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
२-३ चमचे मालवणी मसाला
२-३ कोकम
५-६ कडीपत्ता ची पाने
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ इंच आल्याचा तुकडा
गुळ
तेल
मीठ

कृती:-
१) मोड आलेले वाल प्रथम स्वच्छ धुवून पाण्यामध्येये ठेवावे
( पाण्यात वाल ठेवले तर त्याचा रंग बदलत नाही पाण्याचा बाहेर ठेवले तर ते काळे पडतात)

२) एका कढईत ४-५चमचे तेल घ्यावे . तेल गरम झाले की त्यात राई,जिरं,हिंग, कडीपत्ता ची फोडणी करून घ्यावी.

३) मिक्सर मध्ये खोबरे,थोडसं जिरं, आलं, थोडी कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून वाटावे

४) फोडणी च्या कढईत हळद ,मालवणी मसाला घालावा आणि त्यावर वाटण घालावे थोडं परतावे त्यात सोललेले वाल घालावे पाणी घालून कढईवर झाकण ठेवून १-२ वाफ काढावी
५) वाल साधारण शिजले की त्यात कोकम , मीठ,गूळ घालावे.आणि ५-७ मिनिटं शिजून द्यावे .

६) ५-७ मिनिटांनी गॅस बंद केल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी

टीप:-

१) नैवेद्यासाठी वालाच बिरड असल्याने ह्यात कांदा लसूण वापरलेला नाही
२) कोकम वाल शिजल्यावर घालावे नाहीतर कोकमाचा आंबट पणामुळे वाल शिजणारा नाहीत
३) बटाटा आवडत असेल तर त्यात घातला तरी चालेल.



 वैभव जगताप 





#खाद्यसंस्कृती # सण #संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक
संस्कृती#गृहिणी #स्वयंपाक #देव#देश#महाराष्ट्र #खाद्य#पदार्थ#जेवण#नाष्टा#फूड#आई#घरचे जेवण #आहार #निरोगी आहार #खानावळ#शाकाहारी #मांसाहारी #हॉटेल #रेस्टोरंट#भटकंती#सहल #शाळा #व्यायाम #चपाती भाजी #पोळी भाजी #पोळी भाजी केंद्र #घरगुती #घरगुती जेवण #खादाड #खाद्यसेवा

#girl #cooking #food #home #home food #homemade #lunch #breakfast #mood #yummy #recipes

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment