postbox media

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - पनीर डिलाईट



पनीर डिलाईट

नमस्कार,


मैत्री ठरवून कधीच होत नाही हा मैत्रीचा फायदा आहे,
आणि मैत्रीला कोणताही नियम नाही हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे .
माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणीना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा !!💐
आज आपण झटपट बनणारी गोडाची रेसिपी बघणार आहोत की त्यात आपला गॅस चा अजिबात वापर करायचा नाही.आज आपण बघणार आहोत पनीर डीलाईट

साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
१ कप डेसिकेटेड कोकोनट
१ कप पिठी साखर
१/२ चमचा वेलची पावडर

कृती :
१) एका भांड्यात पनीर किसून घ्यावे आणि ते हलक्या हाताने मळावे

२) त्यात डेसिकेटेड कोकोनट ,पिठी साखर आणि वेलची घालावी आणि सगळे मिश्रण एकजीव करावे

३) त्याचे लाडू वळून परत डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावे म्हणजे लाडू एकमेकांना चिकटणार नाही .
फ्रीज मध्येये १५ मिनिटे सेट करायला ठेवावे .
झटपट लाडू तयार

टीप:
१) २-३ दिवस हे लाडू फ्रिज मध्ये राहू शकतात.
२) हे लाडू उपवासाला पण खाऊ शकतात.


https://www.postboxmedia.wordpress.com

वैभव जगताप

No comments:

Post a Comment