postbox media

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - नारळाचे लाडू


नमस्कार,
नारळी पौर्णिमा आता जवळ आली असल्याने आजची आपली दुसरी रेसिपी बघूया नारळाचे लाडू.

साहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ (नारळाचा पांढरा भाग (खोबरे)घ्यावे)
दिड कप साखर
३ ते ४ टेस्पून तूप
१ कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पूड
थोडीशी जायफळ पूड
बेदाणे
केशर

कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ते ५ मिनीटे कोरडाच भाजावा. सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही.
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे आणि १०-१५मिनिटे तसेच राहू देणे.
३) ऐका कढई मध्ये तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. १० ते १२ मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि ५ते ६ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच रवा-नारळाचे मिश्रण पाकात ओतावे आणि मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड ,थोडी जायफळ पूड आणि चिमुट भर केशर घालावा .मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि त्याचे लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.

टीप:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत.
७-८ दिवस टिकतात.



 वैभव जगताप 


https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment