postbox media

Friday 27 September 2019

खाद्यसंस्कृती - रव्याच्या पाटोळ्या




नमस्कार, 


आजची आपली रेसिपी आहे रव्याच्या पाटोळ्या.

साहित्य :-
१ वाटी खवलेला नारळ
१/२ वाटी गूळ
१ मध्यम काकडीचा किस
१पेला रवा
खसखस
ड्रायफ्रुट ची पूड
१/२ छोटा चमचा वेलचीपूड
जायफळ
तेल
तूप

कृती:-
१) एका पातेल्यात काकडीचा किस, चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी घालून ५मिनिटे शिजवावे . त्यात रवा घालून त्याची उकड काढावी
२) एका परातीत १/२ चमचा तेल घेऊन त्यात ही उकड घालून चांगले मळून घ्यावी.
३) एका कढईत तूप,खोबरे आणि गुळ घालून चव बनवावी .
त्यात वेलचीपूड, जायफळ पूड, खसखस, ड्रायफ्रुट पूड घालावी. मिश्रण एकजीव करून घेणं.
४) एक केळीचे पान मध्यम आकारात कापून घ्यावे(साधारण ४ तुकडे करावेत)
५) केळीच्या पानावर पाणी आणि तेल लावून पीठ थापून घावे आणि त्यावर खोबऱ्याचं सारण घालून कारंजी प्रमाणे पानासहित दुमडावे
६) एका स्टिमर किंवा कुकर मध्ये पाणी घालून त्याच्यावर चाळण ठेऊन उकडून घ्यावे.





मायरा वैभव जगताप 
www.aapalimayra.blogspot.com 



No comments:

Post a Comment