postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - नारळीभात






नमस्कार



अस म्हंटलं जात की चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नेहमी गोडाने केली जाते. म्हणूनच तुमच्यासाठी खास आज एक मराठमोळी पारंपारीक पदार्थ सांगणार आहे.
श्रावणपोर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन.
ह्या पौर्णिमेचे महत्व असे आहे की
कोळीबांधव ह्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात आणि ह्या दिवशी कोळी बांधव सोन्याचा नारळ अर्पण करून सागरेश्वरा कडून आशीर्वाद घेतात आणि घरी बनवला जातो तो खास नारळीभात.

साहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.



 वैभव जगताप

खाद्यसंस्कृती - लापशी रवा





नमस्कार 


 आज आपण बघुया लापशी

साहित्य:
१ कप दलिया किंवा लापशी रवा
३/४ कप किसलेला गूळ
२ चमचे तूप
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ कप पाणी
१/४ कप गरम दूध
१/४चमचा वेलची पूड
चिमूटभर मिठ
३ चमचे काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप
१ चमचा बेदाणे

कृती:
१) २ चमचे तूप कढईत गरम करावे. त्यात लापशी रवा खमंग भाजून घ्यावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे.
२) रवा भाजताना दुसर्‍या गॅसवर ३ कप पाणी गरम करावे. त्यात चिमूटभर मिठ घालावे.
३) रवा चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी आणि दूध घालावे. निट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर २ वाफा काढाव्यात. ताजा नारळ घालून मिक्स करावे.
४) रवा शिजल्यावर किसलेला गूळ घालून ढवळावे. गूळ वितळला कि बेदाणे घालावे.
५) झाकण लावून मध्यम आचेवर वाफ काढावी. वेलचीपूड घालून मिक्स करावे.
गरम गरम सर्व्ह करावा.
 


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - कैरीचे पन्हं





नमस्कार 


आज आपण बघुया कैरीचे पन्हं

साहित्य:
१/२ वाटी कैरीचा गर
२ वाटी साखर
१ चमचा वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती:
१) साधारण एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२)एक्का पातेल्यात हा गर काढून घ्यावा त्यात साखर आणि थोडे पाणी घालावे त्यात केशर आणि वेलचीपूड घालून ढवळून घ्यावे. काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ चमचे मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.

टीप:-
१) साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकतो . 


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - आंबेडाळ





नमस्कार 

 
गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा
आज आपण बघुया क पारंपरिक पदार्थ आंबेडाळ

साहित्य:-
२ वाटी चणाडाळ
१ कैरी किसलेली
१ चमचा मोहरी
१/२ चमचा हळद
१/२ चमचा साखर
५-६ पाने कडीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
हिंग
मीठ
तेल

कृती:-
१) चणाडाळ ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावी. मिक्सरमध्ये पाणीन घालता डाळ आणि २-३ कडीपत्ताची पाने वाटून घ्यावी
२) एका भांड्यात वाटलेली डाळ घ्यावी त्यात किसलेली कैरी थोडी कोथिंबीर ,चवीपुरते मीठ,थोडी साखर घ्यावी
३)एका बाजुला २-३ चमचे तेल घ्यावे त्यात मोहरी ,कडीपत्ता, हिंग, हळद यांची फोडणी करून घ्यावी
आणि ही फोडणी वाटलेल्या डाळीत घालून एकजीव करून घ्यावे
आपली आंबेडाळ तयार 


 
वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - सामोसे





नमस्कार,


आज आपण बघुया सामोसे

साहित्य :-
२ वाटी मैदा
१ मोठा चमचा दही
१मोठा चमचा तूप
अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा चिमुटभर सोडा
१चमचा मीठ .

सारण :-
१ वाटी मटार वाफवलेले
४बटाटे उकडून बारीक चिरून
२टोमॅटो
१चमचा मीठ
१कांदा + कोथिंबीर एक वाटी + १ चमचा गरम मसाला + ५-६मिरच्या यांचं मिश्रण
तेल .

कृती :-
१) तेल गरम करून त्यातच टोमॅटो चिरून घालावे . कडेनं तेल सुटेपर्यंत परतावं . त्यातच वाटण घालून परतावं .
२) खरपूस झालं की गॅस बंद करावा व मिश्रण थोडं चिरडून त्यात मटार , बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट एकजीव करून घ्यावे
३) मैदा , मीठ , बेकिंग पूड , सोडा एकत्र चाळावं . तूपाचे मोहन घालावे
४) त्यातच मग दही घालावं व लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं . अर्धा तास झाकून ठेवावं .
५) नंतर पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरी सारख करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे .
६) प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत . अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं . (पाणी लावून चिकटवावं) .
७) नंतर गरम तेलात बदामी रंगावर तळावेत . चाट करताना मधोमध फोडून कांदा , चटणी , शेव घालून दयावं .

 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - पुरणपोळी




नमस्कार,

 
होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघुया पुरणपोळी

साहित्य :-
३ वाट्या हरभरा डाळ
३ वाट्या चिरलेला गूळ
१ वाटी साखर
अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
३ वाट्या कणीक
३ चमचा मैदा
चिमुटभर मीठ
पाऊन वाटी तेल
तांदळाची पिठी

कृती :-
१)हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
२)प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी.
३)शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. ह्या पाण्याला पुरणाचा कट म्हणतात. पुरणपोळी बरोबर त्याचीच आमटी करतात. पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते.
४)डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
५)पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. शिजवताना प्रथम पातळ होते व नंतर झाऱ्याला घट्ट लागू लागते.
६)पुरणयंत्राला बारीक जाळीची ताटली लावावी व शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
७) कणीक व मैदा चाळणीने चाळून घ्यावा व चिमुटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक सैलसर भिजवावी.
८)२ तास कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली तिंबावी. पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा. कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
९)वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. तांदळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
१०)पोळपाटावर पिठी घेवून हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - बुंदीचे लाडू


 
नमस्कार 


आज आपण बघुया बुंदीचे लाडू

साहित्य:
१ वाटी बेसन
१ वाटी साखर
वेलची पूड
केशर
तळण्यासाठी तूप किंवा तेल
बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे

कृती:
१) बेसनात १ चमचा तूप घालावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. पीठ घट्टही नको आणि पातळसुद्धा नको. गुठळ्या राहू देउ नयेत.
२) कढईत तूप गरम करून आच मध्यम ठेवावी.
३) कढईवर झारा धरून भिजवलेल्या पीठातील थोडे पीठ घालावे. बुंदी पाडाव्यात. बुंदी तळल्या गेल्या कि दुसऱ्या झाऱ्याने बुंदी तूपातून काढाव्यात. पेपरवर काढाव्यात.
४) झाऱ्यावर लागलेले पीठ हाताने साफ करून झारा धुवून पुसून घ्यावा. परत तीच कृती करून सर्व बुंदी तळून घ्याव्यात.
५) साखरेमध्ये साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक बनवावा. पाकात वेलची केशर घालावे. पाकात बुंदी घालून ढवळावे. मिश्रण अधून मधून ढवळावे. पाक शोषला गेला कि लाडू वळावेत.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - स्ट्रॉबेरी मिल्कशेक




नमस्कार 

आज आपण बघुया स्ट्रॉबेरी मिल्कशेक

साहित्य:
१५ स्ट्रॉबेरीज
१ वाटी स्ट्रॉबेरी आईसक्रीम
१/४ पेला थंड दूध
२ चमचे मिल्क पावडर
१ ते २ चमचे साखर

कृती:
१) मिल्क पावडर दुधात नीट मिक्स करावी.
२) दूध पावडर+ दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज, आणि आईसक्रिम मिक्सरमध्ये फिरवावे.
३) २ ग्लासेस मध्ये ओतावे. स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करावे. लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) स्ट्रॉबेरीवर बारीक बिया असतात. त्या कधीकधी मिक्सरवर बारीक वाटल्या जात नाहीत. अशावेळी स्ट्रॉबेरी सुरीने हलकेच सोलून घ्यावे.
२) मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घालावेत. मिल्कशेक पिताना मधेमधे चांगले लागतात.
३) स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर वरती आईसक्रीमचा स्कूप किंवा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकतो.
 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पोपटी




नमस्कार 


आज आपण एक आगळी वेगळी डिश बघणार आहोत ती म्हणजे पोपटी
नाव ऐकून जरा वेगळच वाटले ना
रायगड जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती चा हा एक भाग आहे पोपटी.
गोड्या वालाच्या शेंगांचा मोसम आणि थंडीचा संयोग जुळून आला की, निमित्त काढून अशा पार्ट्या करण्याची इथली परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली.देशावर जशी हुरडा पार्टी केली जाते, तशीच उत्तर कोकणातील ही पोपटी पार्टी केली जाते .
थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्चअखेरपर्यंत हा सिलसिला सुरू रहातो.
चला तर आपण बघुया पोपटी कशी बनवतात ते

साहित्य :
वालाच्या ताज्या शेंगा दोन किलो
एक किलो चिकन (मोठे तुकडे)
एक डझन अंडी
बटाटे अर्धा किलो
एक वाटी आलं +लसूण +मिरची +कोथिंबीर पेस्ट
1/2चमचा हळद
1चमचा तिखट
जाडे मीठ/ बारीक मीठ
चवीपुरता ओवा
मध्यम आकाराचं मातीचं मडकं
भांबुर्डीचा पाला
लाकडं किंवा गोवऱ्या.

कृती :
1)सर्वप्रथम मडकं, शेंगा आणि भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्यावा.
2)चिकनलाहिरवीपेस्ट हळद आणि मीठ लावून 1/2तास मॅरीनेट कार्याला ठेऊन द्यावे
बटाट्याला देखील चिरा पडून त्यात हेय वाटण भरून घ्यावे 3) मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाल्याचा थर व्यवस्थित पसरावा. त्यावर अर्ध्या शेंगा, थोडं चिकन, अर्धा डझन अंडी, अर्धे बटाटे ठेवावीत. नंतर थोडासा ओवा व मीठाची पखरण करावी. पुन्हा भांबुर्डीचा पाला व उरलेल्या जिन्नसाचा असाच एक थर लावावा. त्यानंतर मडक्याचं तोंड पाल्यानं अगदी काळजीपूर्वक बंद करावं.

* पोपटी लावण्याची पद्धत :
मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडाहून थोडा मोठा वितभर खोल खड्डा खणावा. त्यात थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलटं ठेवावं. (काहीजण तीन विटांवरही मडकं उलटं ठेवतात.) मडक्याभोवती सुकी लाकडे, सुकलेला पाला किंवा सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या व्यवस्थित लावून पेटवून द्याव्यात. जाळ जास्त असल्यास अर्धा तास, अन्यथा पाऊणतास हे मिश्रण शिजवावं. चोहीबाजूनं लागणाऱ्या जाळामुळं भांबुर्डीसह इतर जिन्नसांचा स्वाद परस्परांत एकरूप होऊन एका भन्नाट चवीची निर्मिती यादरम्यान होत असते. अर्धा-पाऊणतासाने मडक्यावर पाणी मारून पाहावं. ‘चर्र’ असा आवाज झाल्यास पोपटी शिजली असं समजावं.
त्यानंतर मडक्याशेजारील लाकडं, गोवऱ्या बाजूला कराव्यात. त्यावर पाणी मारावं व जाड फडक्यानं मडकं अलगद बाहेर काढावं. लगेचंच आतील पोपटी एका पेपरवरकिंवा परातीत काढून घ्यावी. त्यातला भांबुर्डीचा पाला बाजूला काढून पाणी आणि तेलाशिवाय शिजलेल्या या अनोख्या पदार्थाचा मनमुराद आनंद घ्यावा.

टीप:-
1)वेज पोपटी पण केली जाते त्यासाठी बटाटे ,रताळी,वांगी,कंद आणि वालाच्या शेंगा वापरले जातात
2) जर भांबुर्डी चा पाला नाही मिळाला तर केळीच्या पाना मध्ये चिकन चे तुकडे बांधून ठेवावेत
मडक्यात प्रथम केल्याचे पान ठेवावे त्यावर शेंगा घालाव्यात मग चिकन
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - गाजराची वडी





नमस्कार 


आज आपण बघुया गाजराची वडी

साहित्य:
१/२ किलो गाजर
साखर १ कप
१/२ लिटर दूध
१ वाटी खवा
३ मोठे चमचे तूप
१/४ छोटा चमचा वेलची पूड
१/२ वाटी बदाम, काजू, मनुका
पिस्ताचे काप

कृती:
१)गाजर स्वच्छ धुवून घ्यावे.
साल काढून किसुन घ्यावी व बाजूला करून ठेवावे.
२)जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे व त्यात किसलेले गाजर घालून मंद गॅसवर परतून घ्यावे.
३)साधारणतः १५-२० मिनिटांनी गजराचा रंग बदलू लागेल.
लगेचच दूध घालून गॅस थोडा मोठा करावा व दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहावे.
४)दूध आटले की खवा व वेलची पूड घालावी.
मिश्रण खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
५)दूध व खवा पूर्ण आटल की साखर घालावी.
मिश्रण घट्ट होवून गोळा होवू दयावा.
६)बदाम, काजूचे काप व मनुका घालावे.
७)एका ट्रेला तूप लावून त्यावर हे मिश्रण छान पसरून घ्यावे व साधारण २ तास सेट होण्यासाठी ठेवावे.
८)तुकडे पडून त्यावर पिस्ताचे काप लावून सर्व्ह करा.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/