postbox media

Friday 4 October 2019

खाद्यसंस्कृती - तिळाचे लाडू





नमस्कार 

आज आपण बघुया तिळाचे लाडू
तिळगूळ घ्या गोड गोड बोला !!

साहित्य:
१/२ किलो तिळ( पॉलिश/ साधे)
१/२ किलो चिकीचा गूळ
१ ते दिड वाटी शेंगदाण्याचा भरडसर कूट
१ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी चण्याचं डाळं
१ चमचा वेलची पूड
१ ते २ चमचे तूप

कृती:
१) १/२ किलो तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. पातेल्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करावा. सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो.
पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला कि गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे.
२) पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याचे डाळं, वेलची पूड घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.

टीप:
१) लाडूंमध्ये आवडत असल्यास काजूतुकडा किंवा इतर सुकामेवा घालू शकतो.




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पालक वडी





नमस्कार 


 आज आपण बघुया पालक वडी

साहित्य :
एक जुडी पालक
१ वाटी बेसन
१/२ वाटी तांदळाचे पीठ
१/२ वाटी खोबरं
७ते ८ लसणाच्या पाकळ्या
५ते ६ हिरव्या मिरच्या
थोडं आलं
कोथिंबीर
१/२ चमचा हळद
लाल मिरची पावडर
१/२ चमचा तीळ
तेल
मीठ

कृती :
१)पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं व कोथिंबीर यांचं वाटण तयार करावं. २)चिरलेल्या पालकामध्ये ३ ते ४ चमचे तयार केलेलं वाटण, हळद, लाल मिरची पावडर ,थोडे तीळ व थोडं तेल घालावं. त्यात नंतर मावेल तेवढं चणा डाळीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं एकत्र करा.
३)त्याचे कणकेसारखे लांबट आकाराचे गोळे करा.
४)स्टीलच्या चाळणीला आतून तेल लावून गोळे त्यात ठेवावे. ५)एका गंजात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून १०-१५ मिनिटे हे गोळे वाफवून घ्यावे.
६)त्यानंतर गॅसवरुन उतरवून ते थंड झाल्यावर त्याचे गोल आकारात काप करून तेलात तळावे किंवा परतावे.वरून थोडे तीळ घालावे .
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - तिळाच्या वड्या


 


नमस्कार 



 आज आपण बघुया तिळाच्या वड्या

साहित्य:
१/२ वाटी शेंगदाण्याचा कूट
१/२ वाटी किसून भाजलेले सुके खोबरे
१/२ वाटी तिळ
पाऊण वाटी किसलेला गूळ
१/२ चमचा तूप
१/२ चमचा वेलचीपूड

कृती:
१) तिळ मध्यम आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये अगदी काही सेकंद फिरवावे. तिळाची पूड करू नये, तिळ अर्धवट मोडले गेले पाहिजेत.
२) वड्या करण्यापुर्वी दोन स्टीलच्या ताटांना तूपाचा हात लावून ठेवावा. पातेल्यात तूप गरम करावे. त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ वितळला कि गॅस बंद करावा. लगेच त्यात शेंगदाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत आणि भराभर मिक्स करावे. लगेच वेलचीपूड घालावी . आणि एकजीव करून हे दाटसर मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालून थापावे. मिश्रण गरम असल्याने थापण्यासाठी एखाद्या वाटीच्या बुडाला तूप लावून त्याने थापावे.
३) मिश्रण गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.


 
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - स्पेशल गुळपोळी




नमस्कार 


आज आपण बघुया मकरसंक्रांती स्पेशल गुळपोळी

साहित्य:
★सारण : १/२ किलो गूळ
१ वाटी बेसन
२ सुक्या नारळाच्या वाट्या
३/४ वाटी तिळ
१/२ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी खसखस
१/२ वाटी तेल
★आवरण :
१ १/२ वाटी मैदा
३/४ वाटी कणिक
२ चमचे तेल
२ चमचे बेसन
मीठ

कृती:
१) सुक्या नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईस्तोवर कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे. कमी असल्यास अजून थोडं खोबरं भाजून चुरा करावा.
२) तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
३) शेंगदाणे भाजून त्याची साले काढून टाकावीत आणि एकदम बारीक कूट करून घ्यावा.
४) एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात १/२वाटी तेल गरम करावे. त्यात १ वाटी बेसन खमंग भाजून घ्यावे.
५) गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेले जिन्नस (तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं) गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
६) मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. २ चमचे तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधं तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवणे.
७) सारणाचे सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
८) आवरणासाठी आपल्याला "१ सारण गोळ्याला २ पिठाचे गोळे" हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
९) २ पिठाच्या लाटयांमध्ये १ सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके प्रेस करून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
१०) मिडीयम हाय हिटवर तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो. गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.

टीप:-
पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे.


 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - भोगीची भाजी





नमस्कार 



 तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा
आज खूप दिवसांनी मी ही पोस्ट करत आहे
आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल रेसिपी
भोगीची भाजी

साहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड वाटी)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी
१ वाटी गाजराचे मध्यम तुकडे
१/२ वाटी ओले चणे
१/४ वाटी भिजवलेले शेंगदाणे
१/४ वाटी पावट्याचे दाणे
५-६ तुकडे शेवगा शेंगेचे
★फोडणीसाठी -
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहोरी
१/२ चमचा हिंग
१/४ चमचा हळद
१/२ चमचा लाल तिखट
१/४ चमचे जिरे
३-४ कढीपत्ताची पाने
२ चमचे भाजलेले तिळाचा कूट
२ चमचे मसाला
२ चमचे चिंचेचा दाट कोळ
१ - १ १/२ चमचा किसलेला गूळ
१/४ वाटी ओलं खोबरं
मीठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंचेचा कोळ आणि मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या आधी थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - बिस्कीट केक





नमस्कार 


 आज आपण बघुया बिस्कीट केक

साहित्य:-
४ पॅकेट्स पार्लेजी बिस्कीट
१ चमचा बेकिंग पावडर
१/२ चमचा सोडा
१ ते १/२ कप दूध,
२ चमचे कोको पावडर
१ चमचा व्हेनिला इसेन्स
बदामाचे तुकडे
कृती:-
१)बिस्कीट मिक्सर मधून फिरवून बारीक पावडर करून घ्यायची,नंतर त्यात दूध वगळता सगळे पदार्थ टाकून मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे
२)गरजेनुसार थोडे थोडे दूध टाकून घेऊन केक चे मिश्रण तयार करून घ्यावे.
३)त्यात इसेन्स टाकून परत एकदा मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे.नंतर कुकर च्या डब्याला तेल लावूनयात खाली थोडे बदामाचे तुकडे घालून मिश्रण त्यात टाकून डबा २ ते ३ वेळा नीट टॅप करून घ्यावा.
४) कूकर मध्ये तळाला मीठ टाकून त्यावर केक चे मिश्रण टाकलेला डबा ठेऊन २५ ते ३० मिन. बेक करून घ्यावा.
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चोकॉलटे मॅजिक बॉल




नमस्कार 


आज १ जानेवारी २०१८
सगळ्या खवय्याना माझ्या कडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा
आज आपण झटपट बनणारी चॉकोलेट ची रेसिपी बनवूया
आज आपण बघुया चोकॉलटे मॅजिक बॉल

साहित्य:-
केक
२-३ चमचे डेसिकेटेड कोकोनट
२-३चमचे बदामाचे तुकडे
१चमचा जॅम
मेलटेड चोकॉलटे
पेपर कप

कृती:-
१)एका बाऊल मध्ये केक चे तुकडे घेऊन ते चुरा करा त्यात डेसिकेटेड कोकोनट ,बदामाचे तुकडे ,जॅम घालुन सगळे मिक्स करून घ्या आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्या
२) एका डिश मध्ये पेपर कप ठेवा
३) केक चे बॉल्स मेलटेड चोकॉलेट डीप करून एक एक बॉल पेपर कप मध्ये काढून घ्या
१०-१५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चिकन फ्राय




नमस्कार,


आज आपण बनवूया चिकन फ्राय

साहीत्य:-
२ मोठे चिकनचे तुकडे (बोनलेस)
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
१ मोठा चमचा आले- लसून – हिरवी मिरची पेस्ट
२ मोठे चमचे कोथंबीर चिरून
१ मोठा चमचा सोया सॉस
मीठ चवीनुसार
२ ब्रेडचे स्लाइस (मिक्सर मधून काढून)
१ अंडे (फेटून)
४ टोस्टची पावडर
तेल तळण्यासाठी

कृती:-
१) प्रथम चिकनचे तुकडे धुऊन घ्या. एका भांड्यात चिकनचे तुकडे बुडेल इतके पाणी व चिकन टाकून ५-७ मिनिट मंद आचेवर शीजुद्या (पाणी आटले पाहिजे)
२) त्यामध्ये सोया सॉस टाकून २ मिनिट शीजुद्या. थंड झाल्यावर त्याचे लांबट आकाराचे तुकडे करा.
३)उकडलेले बटाटे सोलून कीसून त्यामध्ये आले-लसून-मिरची पेस्ट, मीठ, कोथंबीर, ब्रेडक्रम व चिकनचे तुकडे घालून एक सारखे करून घ्या व त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे करून ठेवा.
४)तेल तापवून घ्या. अंडे फेटून घ्या व चिकनचे गोळे एक एक करून फेटलेल्या अंडया मध्ये बुडवून मग टोस्टच्या पावडर मध्ये घोळून मग गुलाबी रंगावर तळून घ्या.


 
मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पाव भाजी




नमस्कार 

आज आपण बघुया सगळ्यांची आवडती पाव भाजी

साहित्य:-
२ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे
१ वाटी।फ्लॉवरचे तुरे
१ छोटे गाजर तुकडे
१ भोपळी मिरची बारीक चरलेली
३-४ फरजबी तुकडे मध्यम
१/४ वाटी मटार
१ १/२ टोमॅटो बारीक चिरून
१/२ कोथिंबीर कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१ १/४ चमचा लाल तिखट
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला किंवा २चमचे लसूण पेस्ट
२ मोठे कांदे बारीक चिरलेले
२ ते ३ चमचे एवहरेस्ट पावभाजी मसाला
मीठ चवीप्रमाणे
बटर/ तेल
लादी पाव किंवा स्लाइस ब्रेड

कृती: १
१)कांदा,मटार आणि टोमॅटो सोडून इतर सगळ्या भाज्या १ कप पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या.कुकर थंड झाल्यावर उकडलेल्या भाज्या मॅश करून घ्या.
२) पातेल्यात २ चमचे बटर गरम करा त्यात लसूण घाला. खमंग वास सुटला कि बारीक चिरलेला कांदा २ ते ३ मिनिटे परतून घ्या. मग हळद,तिखट, १ टीस्पून पावभाजी मसाला आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.
३)मॅश केलेल्या भाज्या घालून परता.मटार घाला. मीठ आणि पाव भाजी मसाला घालून मिक्स करा. झाकण ठेवून वाफ आणा. आंबटपणा कमी वाटला तर किंचित आमचूर घाला किंवा लिंबू पिळा.
४)पाव बटर लावून भाजून घ्या.गरम भाजी, पावा बरोबर आणि कांद्या बरोबर सर्व्ह करा.

कृती:- २
ही अगदी झटपट पावभाजी बनवण्याची कृती आहे
१) सिमला मिरची सोडून सगळ्या भाज्या कूकर मधून उकडवून घ्या
कुकर थंडझाला की भाजी मॅश करून घ्या
२) एका कढईत २चमचे तेल घालून त्यावर लसूण पेस्ट घालून परतून घ्या त्यावर सिमला मिरची घालून परतून घ्या सिमला मिरचीचा रंग बदलला की त्यात लालतिखट,हळद आणि पावभाजी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता
३) मॅश केलेल्या भाजीत हे मसाला मिश्रण घालून एकजीव करावे चवी पुरते मीठ, बटर आणि कोथिंबीर घालावी
१-२ उकळी आलीकी गॅस बंद करावा
आपली झटपट पावभाजी तयार

टिप:-
१) झटपट पाव भाजी मध्ये आपला थोडा वेळ वाचतो करण त्या साठी सिमला मिरची आणि पाव भाजीसोबत दिला जाणारा कांदा हा बारीक चिरावा लागतो
बाकी भाज्यांचे मोठे तुडके चालतात
 


मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

Thursday 3 October 2019

खाद्यसंस्कृती - पनीर पसंदा





नमस्कार 

आज आपण बघुया पनीर पसंदा

साहित्य:-
१/२ किलो पनीर तुकडे
१ वाटी काजू भिजवून
सिमला मिरची एक उभी कापून
फ्लॉवर एक वाटी उभा कापून
१ टोमॅटो बारीक चिरलेला
पुदिना बारीक कापलेला दोन चमचे
४ मिरी ठेचून
४ लवंग ठेचून
१ दालचिनी बारीक ठेचून
वाटण ;-
१ कांदा ,काजू ,आला- लसून पेस्ट, पुदिना याचं वाटणं
अमूल बटर दोन चमचे
गरम मसाला पावडर एक चमचा
एक वाटी मलई
एक कप दूध ,
एक चमचा मीठ,
साखर एक चमचा

कृती :-
१) निर्लेप कढईत पनीरचे तुकडे तेलात तळून घ्या व बाजूला काढा
२)कढईत दोन चमचे अमूल बटर टाकून ,
सिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो ,आणि फ्लावर तळून घ्या
३)एक चमचा मीठ टाका ,एक चमचा साखर टाका
त्यात वाटण टाकून व गरम मसाला पावडर टाकून तळून घ्या
एक कप मलई ,एक कप दूध टाकून ढवळा
४)एक उकळी आल्यावर त्यात पनीरचे तळलेले तुकडे टाका
१० मिनिट मंद आचेवर शिजून द्या .

टीप:-
१) आपल्या आवडीनुसार आपण फरसबी ,गाजर पण घालू शकतो 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/