postbox media

Thursday, 3 October 2019

खाद्यसंस्कृती - पनीर पसंदा





नमस्कार 

आज आपण बघुया पनीर पसंदा

साहित्य:-
१/२ किलो पनीर तुकडे
१ वाटी काजू भिजवून
सिमला मिरची एक उभी कापून
फ्लॉवर एक वाटी उभा कापून
१ टोमॅटो बारीक चिरलेला
पुदिना बारीक कापलेला दोन चमचे
४ मिरी ठेचून
४ लवंग ठेचून
१ दालचिनी बारीक ठेचून
वाटण ;-
१ कांदा ,काजू ,आला- लसून पेस्ट, पुदिना याचं वाटणं
अमूल बटर दोन चमचे
गरम मसाला पावडर एक चमचा
एक वाटी मलई
एक कप दूध ,
एक चमचा मीठ,
साखर एक चमचा

कृती :-
१) निर्लेप कढईत पनीरचे तुकडे तेलात तळून घ्या व बाजूला काढा
२)कढईत दोन चमचे अमूल बटर टाकून ,
सिमला मिरची बारीक चिरलेला टोमॅटो ,आणि फ्लावर तळून घ्या
३)एक चमचा मीठ टाका ,एक चमचा साखर टाका
त्यात वाटण टाकून व गरम मसाला पावडर टाकून तळून घ्या
एक कप मलई ,एक कप दूध टाकून ढवळा
४)एक उकळी आल्यावर त्यात पनीरचे तळलेले तुकडे टाका
१० मिनिट मंद आचेवर शिजून द्या .

टीप:-
१) आपल्या आवडीनुसार आपण फरसबी ,गाजर पण घालू शकतो 



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - चिकन तंदुरी





नमस्कार 


 आज मी तुम्हाला एक चिकन ची खास रेसिपी सांगणार आहे की जिचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सूटं
चला तर आज आपण बघुया चिकन तंदुरी

साहित्य:
४०० ग्रॅम चिकन विथ बोन्स
२ चमचे आलं-लसूण पेस्ट
२ ते ३ चमचे घट्ट दही
२ चमचे तंदूर मसाला
१ १/२ चमचा लाल तिखट (बेडगी)
१/२ चमचा धनेपूड
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा हळद
२ चमचा लिंबू रस
लाल फूड कलर (Optional )
मीठ चवीप्रमाणे
१ चमचा तेल
२ चमचा बटर
१ चमचा चाट मसाला वरून घालण्यासाठी
सॅलडसाठी-
१ कांदा, उभा चिरलेला
१ वाटी कोबी उभा आणि पात्तळ चिरलेला
सॅलडला लावण्यासाठी तिखट,मीठ,लिंबू

कृती:
१)दही गाळण्यात घालून ५-१० मिनिटे एखाद्या बाउलवर ठेवा. म्हणजे जास्तीचं पाणी गळून घट्ट दही मिळेल.
२)मॅरीनेट करण्याचा मसाला बनवण्यासाठी घट्ट दह्यात , आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला,लाल तिखट, हळद, धने-जिरेपूड,मीठ, १ चमचा तेल आणि लिंबू रस घाला. चमच्याने चांगलले फेटून घ्या.
३) चिकनच्या थाय आणि लेग्जना सगळ्या बाजुनी सुरीने चीर द्या. उरलेल्या चिकनचे ३" चे तुकडे करा सगळ्या चिकनला तयार केलेला मसाला लावून ७-८ तास मॅरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
४)ओव्हन ४०० F तापमानाला प्रीहीट करा. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या आणि त्यावर चिकनचे पिसेस अरेंज करा. प्रीहीटेड ओव्हनमध्ये चिकन ३० मिनिटे बेक करा. १५ मिनिटांनी चिकन उलटं करून वरून किंचित बटर सोडा आणि उरलेली १५ मिनिटे बेक करा.
५)तंदुरी भाजायची एक घरगुती पद्धत म्हणजे तंदूरभट्टी जर ती नसेल तर चार किलो डालडाचा डबा घ्या . त्या डब्याचा वरचा व खालचा गोलाकार भाग काढून टाकल्यावर डबा पोकळ राहिल .
६)तो डबा गैसवर ठेवावा . व त्यावरून कोंबडी लावलेली शिग ठेवावी म्हणजे चिकन सगळीकडून भाजून निघेल . परोठा व नान भाजायचा असल्यास हीच घरगुती भट्टी उपयोगी पडेल .
५)गरम तंदुरी चिकनवर लिंबुरस आणि चाट मसाला भुरभुरा बरोबर कांदा आणि कोबीचं सॅलड सर्व्ह करा.

टीप:
१) चिकन थाय आणि लेग्जना चीर दिल्यावर मॅरीनेट करण्याचा मसाला आत पर्यंत जाईल याची काळजी घ्या.
२) चिकन जास्ती वेळ बेक केल्यास चिवट होण्याची शक्यता असते.
३)चिकनला जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर एक सोपी टीप,
कोळश्याचा छोटा तुकडा चिमट्यात पकडून गॅसच्या फ्लेमवर किंवा मेणबत्तीवर लाल होईपर्यंत गरम करा. एका वाटीत हा तुकडा घालून तंदुरी चिकनच्या प्लेटमध्ये मधोमध ठेवा. कोळश्याच्या तुकड्यावर चमचाभर तूप घाला म्हणजे धूर यायला लागेल लगेचच वरून एखादं पातेलं ठेवून बंद करा. ५-७ मिनिटे तसंच झाकून ठेवा म्हणजे चिकनला कोळश्याचा मस्त फ्लेवर येईल  


 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - क्रीम बिस्कीट ब्लास्ट




नमस्कार 


आज आपण बघुया क्रीम बिस्कीट ब्लास्ट

साहित्य:-
५ कोणतीही चोकॉलटे बिस्किटे(मी बौर्बोन ची बिस्कीट घेतली)
१ चमचा इन्स्टंट कॉफी
१/४ कप कोमट पाणी
१ कप थंड दूध
२चमचे साखर
विप क्रीम
चॉकलेट वर्मसील/ चोकॉलेट चिप्स
१ चॉकलेट बिस्कीट चा जाडसर चुरा

कृती :-
१)एका बाऊल मध्ये बिस्किटे तोडून ठेवावी
२) दुसऱ्या एका बाऊल मध्ये १ चमचा कॉफी घ्या त्यात १/४ कप कोमट पाणी घालून त्या पाण्यात बिस्किटे विरघळवून घ्यावी
३) हे मिश्रण आणि १कप थंड दूध , साखर मिक्सर मध्ये किंवा ब्लेंडेर ने २-३ मिनिटे फिरवून घ्यावे
४) एका ग्लास मध्ये काढून घ्यावे ग्लास पूर्ण भरू नये त्यावर थोडे विप क्रीम घालावे परत बिस्कीट चा जाडा चुरा आणि परत विप क्रीम ने सजवावे वरून चोकॉलेट वर्मसील घालवे

टीप:-
१) कोणत्याही क्रीम बिस्कीट चे बनऊ शकतो पण चोकॉलेट फ्लेवर जास्त छान लागतो 

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - बनाना कप केक




नमस्कार 


आज आपण बघुया बनाना कप केक

साहित्य:-
१२० ग्रॅम मैदा
पाव चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा बेकिंग पावडर
४५ ग्रॅम रिफाइंड तेल
१२० ग्रॅम कॅस्टर शुगर
पाव चमचा दालचिनी पूड
२कुस्करलेली केळी
सजावटी साठी:-
२००ग्रॅम डार्क चॉकलेट
१०० ग्रॅम फ्रेश क्रीम

कृती:-
१) मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा एकत्र चाळून घ्यावे
२) तेल ,कॅस्टर शुगर,दालचिनी पावडर,कुस्करलेले केळ २-३ मिनिटं ब्लेंडेर ने फेटून घ्या त्यात मैदा चे मिश्रण घालून एकत्र करा
३)कप केक च्या साच्यात लायनर्स लावून त्यामध्ये हे मिश्रण अर्ध्या पेक्षा जास्त भरा
४) १८०℃वर प्री हीट ओव्हन मध्ये १०-१२ मिनिटे बेक करा
केक बेक झाला की थोडा वेळ थंड होऊ द्या
५) एका भांड्यात डार्क चोकॉलटे चे तुकडे करून घ्या. एका जडबुडाच्या भांड्यात मंद आचेवर क्रीम उकळी येई पर्यंत गरम करा.चोकॉलटे च्या तुकड्यावर गरम क्रीम घालून वर्ण २-३ मिनिटं झाकण लावून ठेवा
६) सगळे मिश्रण एकत्र करून अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवा
७) मिश्रण गार झाले की आयसिंग बॅग मध्ये भरून केक वर डिझाईन करा.





मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - ओरिओ बिस्कीट केक




नमस्कार 


आज आपण बनवुया ओरिओ बिस्कीट केक

साहित्य :-
२० ओरिओ बिस्कीट
४चमचे पिठी साखर
पाव लिटर दूध
२चिमटी बेकिंग पावडर
२चमचे मैदा
तेल / बटर
सजावटी साठी:-
२ कप विप क्रीम
५-६ ओरिओ बिस्कीट चा जाडसर चुरा किंवा १/२ वाटी चॉकोलेट फ्लेक्स

कृती:-
१) ओरिओ बिस्कीटे मिक्सर मधून बारीक करून घ्यावीत
२) ४चमचे पिठी साखर घालून परत एकदा मिक्सर मधून फिरून घ्यावीत
३)एका बाऊल मध्ये बारीक केलेले मिश्रण काढून घ्यावी त्यात हळू हळू दूध मिक्स करावे त्यात २चिमटी बेकिंग पावडर घालून सगळे मिश्रण एकजीव करावे
४) केक टिनला प्रथम तेल किंवा बटर लावावे आणि नंतर मैदा लावून ठेवावा
५) सगळे मिश्रण केक तीन मध्ये काढावे अतिरिक्त हवेचे बुडबुडे जाण्याकरिता केक टिन ओट्यावर २-३ वेळा हलकेच ठोकावे
६) ओव्हन ५मिनिटे प्री हिट करावा
१८०℃ वर १५ मिनिटे केक बेक करा
७) एका नोझल बॅग मध्ये नोझल घालून बॅग खालून कापा म्हणजे क्रीम ची डिझाईन बाहेर पडेल
आपल्या आवडीनुसार केक डिझाईन करा
चॉकलेट आणि ओरिओ बिस्कीट ने सजवा 




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - कुकर केक







नमस्कार 


आज आपण बघुया प्रेशर कुकर केक

साहित्य:
३/४ कप मैदा
२५० ते ३०० ग्रॅम कंडेन्स मिल्क (१/२ ते ३/४ कप )
१/४ कप बटर (मीठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)
२-३ कप मीठ

कृती:
१) प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. कुकरच्या बुडाशी मीठाचा थर लावावा आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा. साधारण ८ ते १० मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे. केकटीनला आतून बटरचे कोटींग करावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. बॅटर एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेपुरतेच बॅटर एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे. खुप जास्त फेटल्याने केक मध्यभागी सिंक होतो.
५) तयार बॅटर केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकटीन ठेवावा. झाकण लावावे आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. २५ मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये. बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण २५ मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा. तरीही मध्यभागी टूथपिकने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून १०-१२ मिनीटे केक बेक होवू द्यावा.
७) १०-१२ मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे. केकटीन पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.

टीपा:
१) कंडेन्स मिल्क आवडीनुसार वाढवावे. वरील प्रमाणात बेताचा गोड होतो. काहीजणांना कमीगोड लागू शकतो, म्हणून बॅटर तयार झाले कि त्याची चव पाहावी, लागल्यास थोडे कंडेन्स मिल्क वाढवावे.
२) कूकरची रींग आणि शिट्टी काढायला विसरू नये. तसेच कूकरमध्ये पाणी घालू नये.
३) केकटीन जाड हिंडालियमचा असावा. पातळ मेटल घेऊ नये. उष्णतेमुळे भांड्याला तडा जाऊ शकते.
४) जर दोन कलरमध्ये केक बनवयाचा असेल तर केक बॅटरचे २ भाग करावे. एक भाग तसाच ठेवावा, दुसर्‍या भागात २ ते ३ टेस्पून डार्क कोको पावडर आणि थोडे कंडेन्स मिक्स घालावे. आधी पांढरा तसाच ठेवलेला भाग केकटीनमध्ये ओतावा. त्यावर कोको घातलेले बॅटर घालावे.आणि बेक करावे.
५) केकटीन कूकरमध्ये निट राहतो आहे कि नाही ते आधी तपासून पाहावे. नाहीतर कूकर लहान असल्यास काही करता येणार नाही.
६) केकचे बॅटर केकटीनमध्ये अर्ध्यापेक्षा किंचीत जास्त भरावे. भांडे पूर्ण भरू नये त्यामुळे केक फुलल्यावर भांड्याच्या बाहेर येतो.

 

मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - प्लम केक




नमस्कार


 ख्रिसमस आता जवळ येतो चला यार आपण बघुया प्लम केक कसा बनवायचा ते

सामग्री-
१ १/२ कप प्‍लम स्‍लाइस
१कप मैदा
३अंडी फेटलेली
१/२ कप बटर
१/२ कप बारीक साखर
१ चमचा लेमन जेस्‍ट
१/२ चमचा व्हेनिला इसेन्स
१ चिमटी बेकिंग पाउडर
कृती:-
१) ओवन 325 डिग्री वर प्रीहीट करून घ्या.
२) केक पॅनला बटर लावून ग्रीस करून घ्या
३) एका भांड्यात साखर आणि बटर मिक्स करून घ्या.एका वेगळ्या भांड्यात अंडी आणि लेमन जेस्ट मिक्सकरून घ्यावे आणि नंतर साखर आणि बटर वाल्या मिश्रणात परत मिक्स करावे .
४)बटर वाल्या मिश्रणात मैदा , व्हेनिला इसेन्स आणि बेकिंग पावडर घालून चांगले मिक्स करावे
५) तयार मिश्रणाला केकच्या भांड्यात काढून घ्यावे त्यावर प्लम स्लाइस लावा
६) ४५ मिनिट साठी ओव्हन मध्ये बेक करत ठेवा .

टीप:-
१)केक साठी सगळे साहित्य हे आपल्या रूम टेम्प्रेचर प्रमाणे वापरावे . फ्रिज मध्ये जरी समान असेल तरी त्याचा गार पणा गेल्यावर वापरावे .
२) काजू आणि बदाम चे काप पण वापरू शकतात .



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - बन पुरी किंवा केळ्याची पुरी







नमस्कार 


 बरेच वेळा केळी जास्त असतील तर खराब होतात किंवा त्याचा काय करायचं प्रश्न पडतो आज अशीच एक वेगळी रेसिपी बघुया बन पुरी किंवा केळ्याची पुरी

साहित्य :-
४ वाटी गव्हाचं पीठ
२-३ पिकलेली केळी
१/२ वाटी साखर किंवा गुळ
चिमूटभर सोडा
कणभर मीठ
तेल पाणी

कृती:-
१) एका भांड्यात गव्हाचं पीठ,साखर,सोडा,मीठ घ्यावे त्यात केळी कुस्करून घ्यावीत
२) लागेल तेवढं पाणी घेऊन सगळं पीठ मळून घ्यावे थोडं तेल लावावे
३) हे पीठ साधारण ८ -१० तास बाजूला ठेऊन द्यावे
साधारण सकाळी करायचे असेल आदल्या दिवशी रात्री मळून ठेवावे
४) ८-१० तासांनी पीठा चे छोटे गोळे करून (जरा जाडसर ठेवावे )त्याच्या पुऱ्या लाटाव्यात आणि तळाव्यात
आपली बन पुरी तयार

टीप:-
१) मी इथे गव्हाचं पीठ वापरलं ह्या पुऱ्यांसाठी मैदा वापरला तरी चालतो
२) गोडा चे प्रमाण आपल्यावर आहे कमी जास्त गोड हवे असेल त्या प्रमाणे साखर किंवा गुळ वापरणे
३) केळी जास्त पिकलेली असतील तरी चालतील 




मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मटण पाय सूप





नमस्कार 


 आज आपण बघुया मटण पाय सूप

साहित्य:-
बोकडाच्या पायाचे साफ केलेले तुकडे १५-२० (धुवून)
२ मध्यम आकाराचे कांदे चिरलेले
१ लसुणाचा कांदा सोलून ठेचून.
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
८-१० काळी मिरी
५-६ दालचीनीचे छोटे तुकडे
३-४ तमालपत्र
२ मोठे चमचे तेल/ तूप
गरजेनुसार पाणी
मीठ

कृती:-
१) पाय स्वच्छ धुवून घ्या
२) कुकरमध्ये तेल /तूप चांगले गरम करून त्यावर वरील गरम मसाले व लसुण टाकुन फोडणी द्या.
३) त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर शिजवा. शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद व जर तिखट हवे असेल तर तिखट किंवा मिरची कोथिंबीर पेस्ट टाका. (मी टाकलेली नाही लहान मुलांना प्यायचे असल्याने.)
४)पायाचे तुकडे टाका, मीठ टाका. सर्व ढवळून त्यावर गरजेनुसार पाणी घाला.
५)कुकरचे झाकण बंद करुन पहिली शिट्टी आल्यावर गॅस मंद करुन साधारण पाऊण तास तरी शिजवत ठेवा.
६)पाया शिजायला वेळ लागतो. म्हणून टोपात न शिजवता सरळ कुकरमध्येच शिजवा. शिट्टी गेल्यावर गरमागरमच सर्व्ह करा.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - मेथी मुठिया





नमस्कार

साहित्य:
१/२ वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने
१ ते दिड चमचा दही
दिड चमचा बेसन
दिड चमचा तांदूळ पिठ
दिड चमचा गव्हाचे पिठ
१ चमचा तेल
३-४ लसूण पाकळ्यांची पेस्ट
१ चमचा ओवा
१ चमचा तिळ
१ चमचा जिरे
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) सर्व जिन्नस एकत्र करून मळावे. पाणी अजिबात घालू नये. जर खुपच कोरडे वाटले तर अजून थोडे दही घालावे.
२) एकत्र मळलेल्या या मिश्रणाचे १ इंचाचे लांबुडके गोळे करावे. तळण्यासाठी तेल गरम करावे आणि मंद आचेवर तळून घ्यावे.



मायरा वैभव जगताप
https://www.aapalimayra.blogspot.com/