postbox media

Tuesday 1 October 2019

खाद्यसंस्कृती - मूगाचे धिरडे किंवा मूगाचा डोसा






नमस्कार,


आज आपण बघुया मूगाचे धिरडे किंवा मूगाचा डोसा

साहित्य:-
२वाट्या मूग
५-६लसूण पाकळ्या
२हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
१/२ चमचा तिखट
१/२चमचा हळद
१चमचा जिरं
मीठ
पाणी

कृती:-
१) ५-६ तास मूग पाण्यात भिजत ठेवावेत
२)मिक्सरच्या भांड्यात मूग,लसूण,जिरं,मिरच्या,कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून वाटून घ्यावे
३) एका भांड्यात हे सगळे मिश्रण काढून घ्यावेत
ह्या मिश्रणात हळद,तिखट आणि चवीपुरते मीठ घालून सगळे मिश्रण एकजीव करावेत
साधारण डोश्याच्या पिठा प्रमाणे
४) तव्यावर थोडे तेल घालून डोश्या प्रमाणे डोसे करून घ्यावे
मूगाचे धिरडे/ मूग डोसा तयार

टीप:-
१) जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरून घालू शकतात 




मायरा वैभव जगताप  

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - पिठलं भाकरी





नमस्कार,

आज आपण बघूया पिठलं भाकरी

२वाट्या तांदळाचं पीठ
२वाट्या पाणी
१वाटी बेसन
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
४-५ पाने कडीपत्ता
४-५ मिरच्या बारीक चिरलेला
आलं-लसूण ठेचलेले
कोथिंबीर
मीठ
तेल
पाणी
कृती:-
भाकरी :-
१) एका पातेल्यात २पेले पाणी उकळत ठेवा
पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून उकड काढून घ्या
२) एका परातीत सगळे पीठ घेऊन एक वाफ निघून गेल्यावर थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या
थोडं तेलाचा हात लावून परत चांगले मळून घ्या
३) पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून लाटून किंवा थापून भाकरी बनवा
४) भाकरी व्यवस्थित सर्वबाजूंनी पातळ थापली गेली की दोन हातानी अलगद उचलून तव्यावर वरची पिठाची बाजू वरच राहील अशी टाकावी
५) पिठाच्या बाजूला थोडे पाणी सगळीकडे लावून घ्यावे
पाणी सुकल्यासारखे वाटले की भाकरी परतवावी
दोन्ही बाजूने शेकून घ्यावी

पिठलं:-
१)एका कढईत ३-४चमचे तेल घ्यावे त्यात राई, जिरं,हिंग,कडीपत्ता याची फोडणी करावी
२)आलं - लसूण ठेचा घालावा त्यात कांदा घालावा
कांदा गुलाबी झाला की मिरच्या घालाव्यात
हळद आणि चवीनुसार मीठ घालावे
३) एका भांड्यात बेसन आणि पाणी घ्यावे
पिठाचे गोळे अजिबात राहत कामा नये
हे मिश्रण फोडणीत घालावे
आपल्या जसं पातळ जाड पाहिजे त्या नुसार पाणी घालावे
एक झाकण ठेवून चांगली वाफ काढावी
वरून भरपूर कोथिंबीर घालावी

आपलं पिठलं भाकरी तयार

टीप:-
१) झणझणीत पाहिजे असतील तर जर जास्तीच्या मिरच्या घ्याव्यात आणि मिरची पण ठेचून घालावी
२) पिठलं पातळ हवे असेल तर त्यात थोडं पाणी घालावे 



 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - काळ्या वाटण्याचं सांबर





नमस्कार,

आज आपण बघूया काळ वाटण्याचं सांबर.

साहित्य:-
एक वाटी काळे वाटणे ८-१० तास भिजवलेले
१/२ वाटी खवलेला नारळ
२कांदे मध्यम आकाराचे
५-६ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल्याचा तुकडा
१हिरवी मिरची
कोथिंबीर
५-६पाने कडीपत्ता
१/२ चमचा गरम मसाला
१चमचा मालवणी मसाला
१/२ चमचा हळद
१/२ राई
१/२ चमचा जिरं
चिमूटभर हिंग
तेल
पाणी

कृती:-
१) काळे वाटणे कुकर मधून ८-९ शिट्या काढून शिजवून घ्याव्यात
२)कांदा आणि खोबरं थोड्या तेलावर भाजून घ्यावं थोडं गार झालं की आलं,लसूण,मिरची,कोथिंबिर आणि थोडा पाणी हे घालून मिक्सर मधून बारीक वाटण करून घ्यावे
३) एका कढईत २चमचे तेल घेऊन त्यात राई, जिरं,हिंग,कडीपत्ता घालून फोडणी करावी
१/२ बारीक चिरलेला कांदा घालावा
४)कांदा लाल झाला की त्यात हळद, मालवणी मसालाआणि गरम मसाला घालावा त्यावर लगेच वाटलेले वाटण घालावे
५) शिजवलेले जे वाटणे आहेत त्यातले थोडे वाटणे मिक्सर मधून एकदाच फिरवावे (जाडसर भरड काढावी) आणि कढईत घालावे
६)चवीपुरते मीठ घालावे आणि त्याला २-३ उकळी येऊ द्याव्यात.
वाटण्याचे सांबर तयार

टीप:-
१) ह्यात ओले काजू घालून पण सांबर छान लागतं
२)काही जण कोकम पण घालतात 



 वैभव जगताप 
https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - नारळाच्या दुधातील शेवया





नमस्कार 

आज आनंतचतुर्दशी बघता बघता कसे दिवस निघून गेले कळलंच नाही आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली.
डोळे अगदी पाणावून गेलेत आणि मुखातून एकच वाक्य येत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ..
आज आपण बाप्पासाठी एक खास गोडाची रेसिपी बनवूया
शिरवळ्या(नारळाच्या दुधातील शेवया)
कोकणात प्रसादासाठी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो

साहित्य:-
२वाट्या तांदुळाचे पीठ
नारळाचे दूध
गूळ
तेल
मीठ
वेलचीपूड
जायफळपूड
पाणी

कृती:
१)एका पातेल्यात २वाट्यापाणी घालून त्यात तांदळाचे पीठ आणि कणभर मीठ घालून उकड काढून घ्यावी.
२) उकड मळून झाली की त्याचे लांबट गोळे करावेत जे सोऱ्यात बसतील
३) एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन उकळत ठेवावे
आणि त्यात हे पीठाचे गोळे सोडावेत
पातेलाच्या बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले असे समजावे
४) शेवेच्या सोऱ्याला तेलाचा हात लावून त्यातून शेव पडून घ्यावे
(शक्यतो गरम असताना पाडावे म्हणजे शेव पटापट पडतात)
५) नारळाच्या दुधात गूळ बारीक करून घालावा त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून एकजीव करावे
(रंग येण्याकरिता त्यात चिमूटभर हळद घालावी)
६) एका बाऊल मध्ये नारळाचे दूध घेऊन त्यात शेवया घालाव्यात
शिरवळ्या तयार

टीप:-
१) काहींना जर नारळाचं दूध आवडत नसेल तर साधं दूध वापरलं तरी चालेल.







 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - शेवयाचा उपमा





नमस्कार

आज आपण बघूया शेवयाचा उपमा

साहित्य:-
१वाटी शेवया
२कांदे बरीकचिरलेले
१टोमॅटो बारीक चिरलेला
२हिरवी मिरची बारीक चिरलेली
५-६लसूण पाकळ्या ठेचलेल्या
१/२वाटी मटार वाफवलेले
१/२ वाटी स्वीट कॉर्न वाफवलेले
१/२ वाटी गाजर बारीक कापून वाफवलेले
१/२वाटी कोथिंबीर
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
पाव चमचा हिंग
तेल
१ चमचा तूप
मीठ
पाव चमचा साखर

कृती:-
१) एका पातेल्यात ३ पेले पाणी घेऊन गरम करत ठेवावे
२) एका कढईत शेवया थोड्या भाजून घ्याव्यात आणि मग एकया ताटात काढून घ्याव्यात
३) कढईत २-३चमचे तेल टाकून त्यात राई, जिरं,हिंग,कडीपत्ता, याची फोडणी करावी त्यात ठेचलेला लसूण घालावा लसूणाचा रंग बदलला कित्यात मिरची, कांदा आणि टोमॅटो घालावे आणि कांदा टोमॅटो शिजे पर्यंत परतावे
४) मटार ,गाजरआणि स्वीट कॉर्न घालून परातवावे लगेचच त्यात चवीनुसार मीठ ,साखर थोडी कोथिंबीर आणि भाजलेली शेव घालून सगळे मिश्रण एकजीव करावे
५)त्यात गरमकेलेलं पाणी घालावे आणि तूप घालावे शिजवून घ्यावे
(पाणी सगळं आटल पाहिजे )
वरून कोथिंबीर घालावी
आपला शेवयाचा उपमा तयार.



 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - बटाट्याची भाजी




नमस्कार 



आज आपण बघूया बटाट्याची भाजी

साहित्य
४ उकडलेले बटाटे
२हिरव्या मिरच्या
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
पाव चमचा हिंग
५-६पाने कडीपत्ता
कोथिंबीर
मीठ
तेल
चिमूटभर साखर

कृती :-
१)बटाट्याचे बारीक फोडी किंवा तो कुस्करून घ्यावा
२) एका कढईत २चमचे तेल घावे .टेलगरं झाले की त्यात राई, जिरं,हिंग,कडीपत्ता,घालून फोडणी करावी त्यात थोडी कोथिंबीर घालावी.
चवी पुरत मीठ आणि साखर घालावी त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात आणि सगळे मिश्रण एकजीव करावे .
वरून परत थोफी कोथींबीर घालावी .
बटाट्याची भाजी तयार

टीप:-
१) नैवेद्यासाठी खास ही भाजी आहे म्हणून ह्यात कांदा लसूण घालेला नाही
२) ही भाजी शक्यतो सुकी करावी पाण्याचा हात लागता कामा नये .





 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - दह्यातील वांगी





दह्यातील वांगी





नमस्कार 

आज ची आपली रेसिपी आहे दह्यातली वांग्याची भाजी

साहित्य:
अर्धा किलो वांगी (मध्यम फोडी करायच्या)
दोन कांदे बारीक चिरलेले
१ खोबऱ्याची वाटी सुकं खोबरं
१/२ वाटीशेंगदाण्याचा कुट
मालवणी मसाला
पाव वाटी दही
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
४-५ पाने कडीपत्ता
साखर
तेल
पाणी
मीठ

कृती :
१) एक कढई घ्यावी त्यात२-३ चमचे तेल घालावे,तेल गरम झाले की त्यात राई, जिरं,करून बारीक चिरलेला कांदा , सुक्या खोबऱ्याचा बारीक किस आणि लसूण परतून त्यात वांगी घालून परतावी . नंतर मीठ – मसाला घालून , वाफ द्यावी . नंतर दही , थोडीशी साखर, शेंगदाण्याचा जाड कुट घालून तेल सुटेपर्यंत भाजी परतावी.


वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

खाद्यसंस्कृती - भोपळ्याचे घारगे







नमस्कार




गौरीं मातेचं आगमन झाले आहे. तिच्या नैवेद्यासाठी आपण बनवूया भोपळ्याचे घारगे किंवा पुऱ्या

साहित्य:-
१/२ किलो लाल भोपळा किसलेला
१/२ किलो तांदुळाचे पीठ
पाव किलो गूळ
तेल
मीठ

कृती:-
१) एका पातेल्यात तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घाला. कीस चांगला वाफवून घ्या.
२) कीस अगदी मऊ शिजला की त्यात गूळ घाला. गूळ विरघळू द्या. मिश्रणाला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. त्यात चवीपुरते मीठ घाला.नीट मिसळून मिश्रण थंड होऊ द्या.
३) मिश्रण थंड झाल्यावर त्यात तांदळाचं पीठ घाला. हे प्रमाण आपल्या अंदाजानंच घ्यावं लागेल.
४) पुरीला भिजवतो त्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवावे. पाणी वापरू नये.
पुरीला घेतो तेवढा गोळा घेऊन तो वड्या प्रमाणे थापा किंवा लाटून घ्या.
५) कढईत तेल गरम करून घारगे लाल रंगावर तळून घ्या.






मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/ 

खाद्यसंस्कृती - तळलेले मोदक





तळलेले मोदक





नमस्कार 

आज आपण बघणार आहोत तळलेले मोदक.

साहित्य:-
१ खवलेला नारळ
१/२ वाटी साखर किंवा गुळ
वेलचीपूड
१वाटी रवा(बारीक)
१वाटी मैदा
मीठ
पाणी
तेल
तूप

कृती:-
१)एका परातीत रवा,मैदा,चिमूटभर मीठ घ्यावे त्यात २चमचे तेलाचे मोहन घालावे आणि थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घेणे .२०-३०मिनिटे झाकून ठेवावे.
२) कढईत तूप घालून त्यावर खोबरे आणि साखर घालावी आणि परतून घ्यावे आणि त्यात वेलचीपूड घालावी
सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे
३) पिठाचे छोटे गोळे करून पुरी प्रमाणे लाटून घ्यावे त्यात
खोबऱ्याचं सारण घालून पुरीच्या मुखऱ्या(चुण्या) पाडाव्यात
सगळ्या चुण्या एकत्र आणून त्याचे तोंड बंद करावे
४) एका कढईत थोडे तेल घेऊन मंद आचेवर सगळे मोदक तळून घ्यावेत .

टीप:-
१)मी इथे हे साखरेचे मोदक केलेत तुम्हाला पाहीजे तर गुळाचे पण मोदक करू शकतात.
२) आनंतचतुर्दशी झाल्यानंतर जी पहिली संकष्टी येते तिला साखरचौथ असे बोलतात या दिवशी बाप्पाला साखरेचे मोदक दाखवले जातात .



मायरा वैभव जगताप 
https://www.aapalimayra.blogspot.com/

खाद्यसंस्कृती - पनीर चे मोदक





पनीर चे मोदक


नमस्कार

 सगळ्यांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आज आपण बघणार आहोत पनीर चे मोदक
अगदी झटपट बनतात हे मोदक.

साहित्य:-
पाव किलो पनीर
२००ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट
१५० ग्रॅम साखर मिक्सर मधून बारीक केलेली
तूप

कृती :-
१) एका कढईत थोडं तूप घालून त्यात पनीर परतून घ्यावे.
ते कोरडे होईपर्यंत ,पनीर करपवू नये
२) पनीर एका परातीत काढून थोडं गार होऊ द्या
आणि ते चांगले मळून घ्यावे
३) त्यात डेसिकेटेड कोकोनट आणि साखर घालावी
आणि सगळे एकजीव करावे
४) जर मिश्रण कोरडे वाटत असेल तर त्यात थोडं तूप गरम करून घालावे
५)मोदकाच्या साच्याला थोडा तुपाचा हात फिरवून साच्यातून मोदक काढावेत
६) १/२ तास फ्रीज मध्येये सेट करायला ठेवावे
७) मोदक एकमेकांना चिटकू नयेत म्हणून ते डेसिकेटेड कोकोनट मध्येये घोळवून घ्यावे .
आपले पनीर चे मोदक तयार

टीप .
१) शक्यतो हे मोदक लवकर संपवावे
२ ) १-२ दिवस टिकण्यासाठी म्हणून पनीर जरा परतवून घेतलं नुसत पनीर घेतलं तरी चालेल.