postbox media

Tuesday 1 October 2019

खाद्यसंस्कृती - नारळाच्या दुधातील शेवया





नमस्कार 

आज आनंतचतुर्दशी बघता बघता कसे दिवस निघून गेले कळलंच नाही आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली.
डोळे अगदी पाणावून गेलेत आणि मुखातून एकच वाक्य येत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ..
आज आपण बाप्पासाठी एक खास गोडाची रेसिपी बनवूया
शिरवळ्या(नारळाच्या दुधातील शेवया)
कोकणात प्रसादासाठी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो

साहित्य:-
२वाट्या तांदुळाचे पीठ
नारळाचे दूध
गूळ
तेल
मीठ
वेलचीपूड
जायफळपूड
पाणी

कृती:
१)एका पातेल्यात २वाट्यापाणी घालून त्यात तांदळाचे पीठ आणि कणभर मीठ घालून उकड काढून घ्यावी.
२) उकड मळून झाली की त्याचे लांबट गोळे करावेत जे सोऱ्यात बसतील
३) एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन उकळत ठेवावे
आणि त्यात हे पीठाचे गोळे सोडावेत
पातेलाच्या बुडाला बसलेले गोळे तरंगायला लागले की झाले असे समजावे
४) शेवेच्या सोऱ्याला तेलाचा हात लावून त्यातून शेव पडून घ्यावे
(शक्यतो गरम असताना पाडावे म्हणजे शेव पटापट पडतात)
५) नारळाच्या दुधात गूळ बारीक करून घालावा त्यात वेलची आणि जायफळ पूड घालून एकजीव करावे
(रंग येण्याकरिता त्यात चिमूटभर हळद घालावी)
६) एका बाऊल मध्ये नारळाचे दूध घेऊन त्यात शेवया घालाव्यात
शिरवळ्या तयार

टीप:-
१) काहींना जर नारळाचं दूध आवडत नसेल तर साधं दूध वापरलं तरी चालेल.







 वैभव जगताप

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment