postbox media

Tuesday 1 October 2019

खाद्यसंस्कृती - पिठलं भाकरी





नमस्कार,

आज आपण बघूया पिठलं भाकरी

२वाट्या तांदळाचं पीठ
२वाट्या पाणी
१वाटी बेसन
१/२ चमचा राई
१/२ चमचा जिरं
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
४-५ पाने कडीपत्ता
४-५ मिरच्या बारीक चिरलेला
आलं-लसूण ठेचलेले
कोथिंबीर
मीठ
तेल
पाणी
कृती:-
भाकरी :-
१) एका पातेल्यात २पेले पाणी उकळत ठेवा
पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घालून उकड काढून घ्या
२) एका परातीत सगळे पीठ घेऊन एक वाफ निघून गेल्यावर थोडे पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या
थोडं तेलाचा हात लावून परत चांगले मळून घ्या
३) पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून लाटून किंवा थापून भाकरी बनवा
४) भाकरी व्यवस्थित सर्वबाजूंनी पातळ थापली गेली की दोन हातानी अलगद उचलून तव्यावर वरची पिठाची बाजू वरच राहील अशी टाकावी
५) पिठाच्या बाजूला थोडे पाणी सगळीकडे लावून घ्यावे
पाणी सुकल्यासारखे वाटले की भाकरी परतवावी
दोन्ही बाजूने शेकून घ्यावी

पिठलं:-
१)एका कढईत ३-४चमचे तेल घ्यावे त्यात राई, जिरं,हिंग,कडीपत्ता याची फोडणी करावी
२)आलं - लसूण ठेचा घालावा त्यात कांदा घालावा
कांदा गुलाबी झाला की मिरच्या घालाव्यात
हळद आणि चवीनुसार मीठ घालावे
३) एका भांड्यात बेसन आणि पाणी घ्यावे
पिठाचे गोळे अजिबात राहत कामा नये
हे मिश्रण फोडणीत घालावे
आपल्या जसं पातळ जाड पाहिजे त्या नुसार पाणी घालावे
एक झाकण ठेवून चांगली वाफ काढावी
वरून भरपूर कोथिंबीर घालावी

आपलं पिठलं भाकरी तयार

टीप:-
१) झणझणीत पाहिजे असतील तर जर जास्तीच्या मिरच्या घ्याव्यात आणि मिरची पण ठेचून घालावी
२) पिठलं पातळ हवे असेल तर त्यात थोडं पाणी घालावे 



 वैभव जगताप 

https://www.postboxmedia.wordpress.com

No comments:

Post a Comment